वासुदेव बळवंत फडके

लोकमान्य टिळक यांच्या काळात ज्यांच्या नुसत्या नामोच्चारानेही तरुणांत राष्ट्रभक्ती जागी व्हायची, असे वासुदेव बळवंत फडके होते. हे भारतीय स्वातंत्रसंग्रामातील आद्य क्रांतीकारक होते. त्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सशस्त्र मार्गाचा अवलंब केला. सातारच्या बेडर आणि स्वामीनिष्ठ रामोशी जमातीशी संधान बांधले. धन जमा करण्यासाठी पुणे, पनवेल परिसरातील सावकारांवर धाड घातली. इंग्रजांविरुद्ध बंड करण्यासाठी लोकांना चेतवण्याचे काम वासुदेव बळवंत फडके यांनी केले. २०.७.१८७९ या दिवशी विजापूर येथे त्यांना पकडण्यात आले. अभियोग चालू होऊन त्यांना जन्मठेप काळयापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. अत्याचाराने खंगून गेल्याने एडनच्या कारागृहात त्यांचे निधन झाले.