Menu Close

पाकिस्तानात प्राचीन हिंदु मंदिराचे मशिदीत रूपांतर !

भारतात मुसलमान असुरक्षित असल्याचा टाहो फोडणारे साम्यवादी आणि सेक्युलरवादी यांना पाकिस्तानात हिंदूंवर होणारे आघात दिसत नाहीत का ? – संपादक 

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधा येथे हिंदूंच्या एका मंदिराचे मशिदीत रूपांतर करण्यात आले आहे. पाकिस्तानी ब्लॉगर (जनतेपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून विविध विषय पोचवणारी व्यक्ती) माखनराम जयपाल यांनी या मंदिराला भेट देऊन मंदिराचे मशिदीत रूपांतर केल्याचे सत्य ‘व्हिडिओ’द्वारे समोर आणले.

https://www.facebook.com/100090281264842/videos/1172331173951960/

मशिदीत रूपांतरित झालेल्या या मंदिराच्या भिंतींवर अजूनही हिंदु धर्मातील मंत्र स्पष्टपणे दिसत आहेत. माखनराम यांनी सांगितले की, पूर्वी या मंदिराचे नाव ‘सनातन धर्म मंदिर’ असे होते.

स्त्रोत: दैनिक् सनातन प्रभात 

Related News