Menu Close

नाशिक : मंदिर सरकारीकरणाला महंत सुधीरदास महाराज यांचा विरोध

देवधन लुबाडणार्‍यांच्या चुकांवर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न देवस्थानांच्या सरकारीकरणातून होत आहे ! – महंत सुधीरदास महाराज, नाशिक

नाशिक : ज्या पद्धतीने मठ-मंदिरे कह्यात घेण्याचा सरकारने सपाटा लावला आहे, ते पहाता काँग्रेस सरकार बरी म्हणायची. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थानांच्या जागेमध्ये पूर्वी काकडा आरती व्हायची, तसेच गायरान जागा, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज, पेशवे आणि ब्रिटीश यांच्या कालखंडातही कुणी हात लावला नाही, त्या वेळेपासून त्याला ‘देवधन’ संबोधले जायचे. आज तेच देवधन, तेथील जमिनी राजकीय लोकांनी लुबाडल्या असून तेथे अनधिकृत बांधकामे केली आहेत. त्या जागा बळकावून तेथील लोकांना हुसकावले. त्यांच्या जमिनी घेतल्या. असे करणार्‍यांच्या चुकांवर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न या देवस्थानांचे सरकारीकरण करण्याच्या माध्यमातून केला जात आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *