Menu Close

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतले ताब्यात

अहमदनगर : शनिशिंगणापुरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश द्या अशी मागणी करणाऱ्या भूमाता ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिशिंगणापूरमध्ये शनीच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश द्यावा या मागणीसाठी तृप्ती देसाई गावकऱ्यांशी आणि विश्वस्तांशी चर्चा करण्यासाठी जात होत्या.

पोलिसांनी रस्त्यातच त्यांना अडवून ताब्यात घेतले आहे. तृप्ती देसाई यांच्यासोबत भुमाता ब्रिगेडच्या पदाधिकारी तसंच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या प्रदेश उपाध्यक्षा शहनाज शेख देखील उपस्थित होत्या. विश्वस्त आणि गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार होती. मात्र त्याअगोदरच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

संदर्भ : लोकमत

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *