Menu Close

जळगाव येथे धर्मांधांचे महानगरपालिकेच्या कर्मचार्यांवर प्राणघातक आक्रमण

गेली अनेक वर्षे धर्मांधांचे लांगूलचालन झाल्याचेच हे दुष्परिणाम आहेत ! शासकीय नियमांना धाब्यावर बसवणार्यां धर्मांधांना वेळीच कठोर शासन झाले असते, तर त्यांच्या मुजोरीला आळा बसला असता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

जळगाव : येथे महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या धर्मांध मांस विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचार्यांवर धर्मांधांनी शिवीगाळ करत प्राणघातक आक्रमण केले. (चोर तो चोर आणि वर शिरजोर अशा वृत्तीच्या उद्दाम धर्मांधांवर कठोर कारवाई कधी करणार, हे महापालिकेने जनतेला सांगावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) तांबापूर भागातील इकबाल नगरात अवैधपणे मांस विक्रीचा व्यवसाय चालू आहे. धर्मांधांकडून कर्मचार्यांपवर दगडफेक करून चाकू घेऊन मारहाण करण्यात आली, तसेच पुन्हा या भागात आल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आली. काही धर्मांधांनी कर्मचार्यां नी कह्यात घेतलेले वजनकाटे पळवून नेले. त्यानंतर मारहाणीचा पुरावा नष्ट करण्यासाठी धर्मांधांनी रस्ता पाण्याने धुतला तसेच दगड विटांचा खचही झाडून स्वच्छ केला. याप्रकरणी शेख मुक्तार, शेख अब्रार, आणि मोगली यांच्यावर एम्आयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *