Menu Close

‘वासनेसाठी मुस्लिम पुरूष बायका बदलतात’ – स्वामी प्रसाद मौर्य

बस्ती (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बहुजन समाज पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेले व मंत्री स्वामी प्रसाद मौर्य ‘तीन तलाक संदर्भात म्हणाले कि, ‘आपली वासना शमविण्यासाठीच मुस्लिम पुरुष तीन तलाक देऊन सतत बायका बदलत असतात. तीन तलाकाच्या मुद्द्यावर भाजप मुस्लिम महिलांसोबत आहे.’

उत्तर प्रदेशातील बस्ती येथे एका कार्यक्रमात बोलताना मौर्य यांनी हे विधान केले. ‘मुस्लिम लोक विनाकारण आणि मनमानीपणे मनाला वाटेल तेव्हा त्यांच्या पत्नीला तलाक देतात. तलाक देऊन ते एकप्रकारे आपली वासनाच शमविण्याचे काम करतात. याच तलाकामुळे त्यांच्या पत्नी आणि मुलांना रस्त्यावर भीक मागण्याची वेळ येते,’ असे ते म्हणाले.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *