भगवान श्रीरामाच्या अपमानामुळे बांगलादेशील हिंदू संतप्त !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात भगवान श्रीरामाच्या अपमानाचा निषेध करत हिंदु समुदायाने १९ जूनच्या रात्री ढाकामध्ये मशाल मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व करणार्या हिंदु विद्यार्थ्यांनी आरोप केला की, अलीकडेच धर्मांध मुसलमानांच्या हिंसक जमावाने भगवान श्रीरामाच्या प्रतिमेवर बूट ठेवून त्यांचा अपमान केला. हा भगवान श्रीराम आणि हिंदु समुदायाचा घोर अपमान आहे. जर ७२ घंट्यांत दोषींना अटक करण्यात आली नाही, तर धार्मिक व्यवहार मंत्रालयाला निवेदन दिले जाईल. तसेच पंतप्रधान तारिक रहमान यांच्या भेटीव्यतिरिक्त विविध मोर्चे आणि कार्यक्रम आयोजित करून विरोध व्यक्त केला जाईल.
बांग्लादेश में मजहबी भीड़ द्वारा भगवान राम का अपमान और राममूर्ति के काम को रुकवाने के विरोध में, बांग्लादेश की राजधानी ढाका की सड़कों पर लाखों हिंदुओं की भीड़ उतर कर भयंकर विरोध कर रही है ।
भारत के हिंदुओं अगर हो सके तो इनके संघर्ष को सोशल मीडिया से बैकअप जरूर दे देना | ✊ pic.twitter.com/bBISqMuXYV
— Satire Anuj (@AnujBajpai_) June 21, 2026
१. ढाक्यामधील विशाल मशाल मोर्चा शाहबाग चौकापासून चालू होऊन शाहबाग स्क्वेअरवरून मोतेश्वर भवन मार्गे ‘नॅशनल प्रेस क्लब’पर्यंत पोचला. मोर्चामध्ये सहभागी झालेल ‘जय श्रीराम’ आणि इतर घोषणा देत होते.
२. भगवान श्रीरामाच्या अपमानाचा निषेध करण्यासाठी १९ जूनला सकाळी ढाक्यामध्ये २ वेगवेगळे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. ‘हिंदु महाजोत’ नावाच्या संघटनेच्या २ गटांनी वेगवेगळे कार्यक्रम केले. यातील एक कार्यक्रम ‘नॅशनल प्रेस क्लब’समोर आणि दुसरा ‘ढाका रिपोर्टर्स युनिटी’मध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आला.
३. ‘नॅशनल प्रेस क्लब’समोर मानवी साखळी करून हिंदूंनी कट्टरतावाद्यांचा निषेध केला. भगवान श्रीरामाच्या अपमानाचा निषेध करण्यासाठी ‘नॅशनल कमिटी फॉर पूजा सेलिब्रेशन्स’ने देशभरात निषेध आंदोलने करण्याची घोषणा केली आहे.
४. ढाका येथील घटनेपूर्वी उत्तर बांगलादेशातील गाईबांधा जिल्ह्यातील पोलाश बाडी येथेही त्यांनी भगवान श्रीरामाच्या अपमानाविरोधात निदर्शने केली होती.
देशातील सर्व ६४ जिल्ह्यांमध्ये बांधली जाणार श्रीराममंदिरे !
मोर्चामधील सहभागी हिंदूंनी सांगितले की, आता केवळ पोलाश बाडी येथेच नाही, तर बांगलादेशातील सर्व ६४ जिल्ह्यांमध्ये एकामागून एक श्रीराममंदिरे बांधली जातील. तारिक रहमान सरकार कट्टरतावाद्यांप्रती मवाळ भूमिका घेत असल्याविषयी त्यांनी संताप व्यक्त केला. सरकारच्या या मवाळ भूमिकेमुळे हिंदूंचा छळ करण्याच्या घटना वाढत आहेत. सरकारने हिंदूंच्या सुरक्षेची व्यवस्था सुनिश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली.
काय आहे प्रकरण ?
गाईबांधाच्या पोलाश बाडी येथे ८१ फूट उंच भगवान श्रीरामाच्या मूर्तीसह श्रीराममंदिराचे बांधकाम चालू होते. ही मूर्ती स्थानिक हिंदू त्यांच्याच भूमीवर बांधलेल्या मंदिरात स्थापन करत होते; परंतु याविरोधात जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वाखाली कट्टरतावादी मुसलमानांनी मोहीम चालू केली. कट्टरतावाद्यांच्या एका जमावाने मंदिराबाहेर जोरदार घोषणाबाजी केली आणि बनवण्यात येत असलेल्या श्रीरामाच्या मूर्तीवर बूट फेकले. हिंदु समुदायाने या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवला; मात्र अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आली नाही. यामुळे हिंदूंमध्ये संताप वाढत आहे. आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदु समाज आता ठिकठिकाणी मोर्चे काढत आहे.
बांगलादेशातील हिंदूंनी अशाच प्रकारे संघटित होऊन धर्मांधांच्या अत्याचारांचा प्रतिकार करत राहणे आवश्यक आहे ! भारत आणि भारतातील हिंदू अन् त्यांच्या संघटना साहाय्य करतील, या भ्रमात न रहाता स्वतः स्वतःचे रक्षण करावे ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती







