Menu Close

अमरावती, अकोला, यवतमाळ येथे ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषद’ संपन्न

१. अमरावती

मंदिर सरकारीकरण आणि वक्फ बोर्डाचे अतिक्रमण यांच्या विरोधात लढण्याचा निर्धार

  • हिंदूंच्या मागण्या शासनाकडे पोचवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार, भाजप

  • विश्वस्तांकडून स्वसंरक्षण आणि गोशाळा चालू करण्याची मागणी  

डावीकडून श्री. पूंजाजी नेमाडे, खासदार डॉ. अनिल बोंडे, बोलतांना श्री. सुनील घनवट, श्री. अनुप जयस्वाल आणि श्री. श्रीकांत पिसोळकर

अमरावती – मंदिरांच्या भूमीच्या रक्षणासाठी लढा देत असतांनाच मंदिरांचे रक्षण करणेही आवश्यक आहे. याकडे विश्वस्तांनी अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. पूजा-अर्चेसह मंदिरांच्या माध्यमातून तरुण पिढीसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग, व्यायामशाळा आणि गोशाळा यांसारखे समाजोपयोगी उपक्रम चालू झाले पाहिजेत. मंदिर विश्वस्तांनी काळानुसार संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. सध्या कोणत्याही पक्षाचे सरकार असले, तरी प्रशासनातील काही अधिकार्‍यांच्या अयोग्य मानसिकतेमुळे अशा प्रकारच्या जाचक कायद्यांची निर्मिती होते. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून याकडे गांभीर्याने पहात असून हिंदूंच्या मागण्या शासनाकडे पोचवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी करीन, असे आश्वासन भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दिले. येथे आयोजित केलेल्या ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषदे’त ते बोलत होते.

परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, तसेच राष्ट्रीय मंदिर महासंघाचे संघटक श्री. सुनील घनवट यांच्यासह विदर्भातील १५० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त उपस्थित होते. शासनाने ‘देवस्थान इनाम निर्मूलन कायद्या’चे प्रारूप स्थगित करणे, हा हिंदूंच्या संघटितशक्तीचा विजय असून ‘पुढील लढा मंदिरांच्या भूमी वक्फ बोर्डाच्या कह्यातून मुक्त करण्याचा असेल’, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

मंदिर विश्वस्त संघटित झाल्यास देशातील ४ लाख मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होतील ! – सुनील घनवट, संघटक, राष्ट्रीय मंदिर महासंघ

मंदिर विश्वस्तांसमवेत मंदिर महासंघ खंबीरपणे उभा राहिल्यामुळे संघटनशक्ती निर्माण झाली आहे. यामुळे सरकारला ‘इनाम निर्मूलन प्रारूप’ काही दिवसांत स्थगित करावे लागले. मंदिर संस्कृतीवर आघात झाल्यावर सर्व मंदिर विश्वस्त रस्त्यावर उतरत आहेत. कोणत्याही एका मंदिराची समस्या म्हणजे संपूर्ण हिंदु समाजाची समस्या आहे. याच बळाने लढल्यास एक दिवस केंद्र सरकारला देशातील ४ लाख मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्याची घोषणा करावीच लागेल.

मंदिराची भूमी बळकावणार्‍यांच्या विरोधात ‘अँटी-लँड ग्रॅबिंग’ कायदा हवा ! – अनुप जयस्वाल, राज्य पदाधिकारी, महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिर महासंघाने राज्यभर जागृती केल्यामुळेच देवस्थान इनाम निर्मूलन कायदा रोखण्यात आला. मंदिरांच्या भूमी हडप करणार्‍या भूमाफियांविरोधात आणि अतिक्रमणांविरोधात शासनाने कडक ‘अँटी-लँड ग्रॅबिंग’ (भूमी अधिग्रहण) कायदा आणण्याची आवश्यकता आहे.

हिंदु मंदिरे संस्कृतीरक्षणाची केंद्रे व्हावीत ! – श्रीकांत पिसोळकर, विदर्भ समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

सर्व हिंदु मंदिरांनी संघटन, समन्वय आणि सुरक्षा या त्रिसूत्रीवर काम करायला हवे. मंदिरे हिंदु संस्कृतीच्या रक्षणाची मुख्य केंद्रे होण्यासाठी प्रयत्न व्हावेत.

या वेळी अमरावतीतील जिल्हा हिंदु संघटक श्री. प्रदीप गर्गे हेही उपस्थित होते.


२. अकोला

मंदिर सरकारीकरण आणि वक्फ बोर्डाच्या अतिक्रमणाविरोधात लढा तीव्र करण्याचा निर्धार !

मंच पर उपस्थित (बाएं से) श्री श्रीकांत पिसोलकर, श्री प्रमोद अग्निहोत्री, श्री सुनील घनवट, श्री दिनकर ठाकरे, श्री प्रशांत देशमुख तथा श्री अरविंद देठे

अकोला – सरकारने ‘देवस्थान इनाम निर्मूलन कायद्या’चे प्रारूप स्थगित करणे हा हिंदूंच्या संघटित शक्तीचा मोठा विजय असून पुढील लढा मंदिरांच्या भूमी वक्फ बोर्डाच्या कह्यातून मुक्त करण्याचा असेल आणि मंदिर भूमी बळकावणार्‍यांच्या विरोधात ‘अँटी-लँड ग्रॅबिंग’ (भूमी अधिग्रहण) कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार, असा निर्धार येथे आयोजित केलेल्या ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषदे’त व्यक्त करण्यात आला. या परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, तसेच राष्ट्रीय मंदिर महासंघाचे संघटक श्री. सुनील घनवट यांच्यासह अकोला अन् विदर्भातील विविध मंदिरांचे १५० विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी श्री. सुनील घनवट यांनी सांगितले, ‘‘मंदिर विश्वस्तांनी संघटित झाल्यास देशातील ४ लाख मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होतील.’’ हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी परिषदेची प्रास्ताविक भूमिका मांडली. त्यांनी महाराष्ट्र मंदिर महासंघाने आतापर्यंत केलेले कार्य आणि मिळालेले ऐतिहासिक यश यांचा आढावा घेतला.

या प्रसंगी व्यासपिठावर श्री चंडिकादेवी संस्थानचे अध्यक्ष श्री. प्रशांत देशमुख, स्वयंभू महादेव अंत्रीचे अध्यक्ष श्री. अरविंद देठे, हनुमान मंदिराचे विश्वस्त श्री. प्रमोद अग्निहोत्री, मूर्तीजापूर मंदिर महासंघाचे विश्वस्त दिनकर ठाकरे आदी उपस्थित होते.


३. यवतमाल

यवतमाळ येथे ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषद’ पार पडली !

परिषदेला उपस्थित मंदिर विश्वस्त आणि मान्यवर

यवतमाळ – येथे १५ जून या दिवशी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषद’  पार पडली. या परिषदेला यवतमाळ शहर आणि विविध तालुके येथून ६५ हून अधिक मंदिरांचे विश्वस्त अन् पुजारी आले होते. परिषदेला मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभलेले मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी देवस्थान इनाम भूमीविषयीचा धर्मशास्त्रीय दृष्टीकोन मांडला. या वेळी त्यांनी देवस्थान भूमी संरक्षण कायद्याविषयी पुढील दिशा स्पष्ट केली, तसेच मंदिरांच्या रक्षणासाठी व्यापक संघटनाची आवश्यकता असल्याचे सांगितले. हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी परिषदेची प्रास्ताविक भूमिका मांडली. त्यांनी महाराष्ट्र मंदिर महासंघाने आतापर्यंत केलेल्या कार्याचा आणि मिळालेल्या ऐतिहासिक यशाचा आढावा दिला.

उपस्थित मंदिर विश्वस्तांनी त्यांच्या मंदिरांच्या भूमी वाचवण्यासाठी केलेल्या संघर्षाचे आणि प्रयत्नांचे अनुभवकथन केले, तसेच सध्या मंदिरांचे व्यवस्थापन करतांना येणार्‍या विविध अडचणी आणि आव्हाने यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

Read more on Mandir Mahasangh

Latest News