Menu Close

पावसाळ्यानंतर मालेगाव भुईकोट गड अतिक्रमणमुक्त करणार – नितेश राणे, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. सतीश सोनार यांनी घेतली नितेश राणे यांची भेट

मुंबई – काही दिवसांपूर्वी मालेगाव भुईकोट गडाची संरक्षक भिंत पाडण्यात आली. गडाला हिरवा रंग देण्यात आला. ही माहिती मला मिळाली आहे. या सर्व प्रकारांवर माझे लक्ष आहे. मी स्वत: तेथे जाऊन आलो आहे. पावसाळ्यानंतर मालेगाव भुईकोट गड अतिक्रमणमुक्त करणार आहोत, असे विधान मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव भुईकोट गडावरील अतिक्रमण हटवण्याविषयी ९ जुलै या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. सतीश सोनार यांनी नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

‘अतिक्रमण करणार्‍यांना मालेगाव महानगरपालिकेने पर्यायी जागा सुचवली आहे. तेथे त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. सरकार या संदर्भात लक्ष ठेवून आहे. याविषयी सकारात्मक निर्णय येईल’, असे नितेश यांनी म्हणाले.

‘भुईकोट गडप्रेमी समिती मालेगाव’ ही भुईकोट गडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी वर्ष २०१७ पासून न्यायालयीन लढा देत आहे. समितीने तेथील अतिक्रमणाच्या विरोधात पुरातत्व विभागाकडेही तक्रार केली असून सध्या या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात चालू आहे.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Latest News