Menu Close

देहू-आळंदी येथून वारी निघण्यापूर्वी पशूवधगृहाचे आरक्षण रहित करावे – हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी !

पुणे – तीर्थक्षेत्र आळंदीक्षेत्रात आणि पवित्र इंद्रायणीच्या काठावर पशूवधगृहासाठी जागा आरक्षित करणे, हा समस्त वारकरी आणि हिंदु यांचा अवमान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे. देहू-आळंदी येथून वारी निघण्यापूर्वी पशूवधगृहासाठीचे आरक्षण रहित करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली आहे. याविषयी श्री. सुनील घनवट यांनी २ जून या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना ‘एक्स’द्वारे संदेश पाठवला आहे.

या संदेशामध्ये श्री. सुनील घनवट यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी आळंदी तीर्थक्षेत्र आणि इंद्रायणी नदीच्या पावनतीरी मोशी-डुडुळगाव मार्गावर (स.न. ३२५) येथे ३.७८ एकर जागेत पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या ‘वेदश्री तपोवन वेदपाठशाळे’च्या जवळ पशूवधगृहासाठी आरक्षण घोषित केले आहे. हा हिंदु समाजाच्या श्रद्धेचा आणि वारकरी संप्रदायाच्या भावनांचा घोर अवमान आहे. याविषयी वारकरी संप्रदाय आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संतप्त आहेत.

Related News