Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सावर्डे येथे ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ या विषयावर सभा

छत्रपती शिवप्रभु आणि धर्मवीर संभाजी महाराज यांनी पराक्रमाने राखलेल्या हिंदु धर्माचे रक्षण करणे हे हिंदूंचे कर्तव्य ! – डॉ. हेमंत चाळके

हिंदु जनजागृती समितीचे डॉ. हेमंत चाळके

सावर्डे (महाराष्ट्र) – आज हिंदु धर्मावर अनेक प्रकारे जिहादी आक्रमणे होत आहेत. भारत देशाला स्वातंत्र्य मिळत असतांना धर्माच्या आधारे या देशाची फाळणी झाली. बहुसंख्यांक मुसलमान असलेला पाकिस्तान जर इस्लामी राष्ट्र होऊ शकते, तर बहुसंख्यांक हिंदू असलेला भारत हिंदु राष्ट्र घोषित करणे अपेक्षित होते; मात्र मूठभर नेत्यांच्या हट्टाने हा देश निधर्मी घोषित केला गेला. त्याचे अनेक दुष्परिणाम येथील हिंदू आजही भोगत आहेत. अल्पसंख्यांक समाजाला त्यांच्या धार्मिक शिक्षण देणार्‍या संस्थाना सरकारी अनुदान मिळण्याची व्यवस्था निधर्मी शासन करते; मात्र हिंदूंच्या भावी पिढीला धर्मशिक्षण देणार्‍या गुरुकुलांना सरकारी अनुदान दिले जात नाही, हा हिंदूंवरील अन्याय आहे.

आज देशातील ९ राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक झाला आहे. हिंदू संघटित न झाल्यास हिंदूंना स्वत:चे अस्तित्व राखण्याचे संकट उभे राहील; म्हणूनच छत्रपती शिवप्रभु आणि धर्मवीर संभाजी महाराज यांनी पराक्रमाने राखलेल्या हिंदु धर्माचे रक्षण करणे, हे हिंदूंचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. हेमंत चाळके यांनी व्यक्त केले. चिपळूण तालुक्यातील ढोक्रवली येथील श्री वाग्देवी मंदिर सहाण या ठिकाणी ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ या विषयावर सभा आयोजित करण्यात आली होती. गावप्रमुख धाकटू रत्ना गावकर यांच्या पुढाकाराने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित हिंदु बांधवांनी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली. या सभेच्या आयोजनात  सर्वश्री विनायक कांगणे, राम जंगम, रामदास घाग, दयानंद जड्यार, विजय सकपाळ आणि  सुनील गांधी यांनी सहभाग घेतला.

अभिप्राय –

१. दत्तात्रय महाडिक : पाश्चात्त्य शिक्षण आणि जीवन पद्धतीच्या आहारी जाऊन आपण आपली धर्म संस्कृती सोडणे धोकादायक आहे. यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.

२. गणपत गावकर आणि अजय राणीम : ज्यांना स्वधर्माचा अभिमान आहे, तोच धर्माचे रक्षणासाठी पुढाकार घेईल. त्यासाठी हिंदु धर्म आणि संस्कृतीचा अभिमान हिंदूंमध्ये निर्माण केला पाहिजे.

Related News