काळदुर्ग

ठाणे जिल्हयातील पालघर विभागात अनेक डोंगरी किल्ले आहेत. शहरी भागापासून फारसे लांब नसल्यामुळे, ठाणे व जव्हारच्या सीमेवर असणारे हे किल्ले मुंबईकरांना एका दिवसात आरामात पाहता येतात. जंगल खूप असल्याने आदिवासी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आजही सारा परिसर मागासलेल्या अवस्थेत आहे.

इतिहास :खरे पहिले तर काळदुर्गला गड म्हणने योग्य नाही, कारण गड असल्याची कोणतीही खुण यावर नाही. हे एक टेहाळणीचे स्थान असावे असे वाटते.

गडावरील ठिकाणे : हा किल्ला दोन स्तरांत विभागला आहे. एक, गडमाथा म्हणजे चौकोनी आकाराचा कातळकडाच होय. या कातळामुळे हा गड लांबूनही नजरेत येतो. गडाचे क्षेत्रफळ अर्धा एकर असावे. दुसरा विभाग म्हणजे, गडमाथ्याच्या खालच्या पठारावर पाण्याचे मोठे टाके आहे. एक कुंडदेखील आढळते.
पठारावरुन गडमाथ्यावर जाण्यास पायर्या आहेत. पठारावर पाण्याचे एक टाके आहे. किल्ल्यावरुन सर्व घाटमाथ्यावर नजर ठेवता येते.

गडावर जाण्याच्या वाटा :वाघोबा खिंड मार्गे: मुंबईहुन विरारमार्गे पालघर गाठावे, किंवा कल्याणहुन एस. टी. ने पालघरला यावे. पालघरहुन मनोरे ला जणारी बस पकडावी व ‘वाघोबा’ नावच्या देवळाच्या थांब्यावर उतरावे. येथुनच, देवळाच्या उजवीकडे जाणार्या वाटेने आपण गडावर पोहचू शकता.

Leave a Comment