‘बालसंस्‍कार’ अ‍ॅप विषयी

देशाचे भवितव्‍य आणि आदर्श पिढी निर्माण करण्‍यास साहाय्‍य करणारे ‘बालसंस्‍कार’ अ‍ॅप !

मुले हे पालक, समाज आणि संपूर्ण जग यांचे भवितव्‍य आहे. मुलांची जडण-घडण जशी होते, तशीच जडण-घडण जगाचीही होत असते. आपल्‍या मुलांना सुसंस्‍कृत करून त्‍यांना जगाचे आदर्श नागरिक बनवण्‍याचे दायित्‍व सध्‍याच्‍या वडीलधार्‍या मंडळींवर आहे. हे लक्षात घेऊन आम्‍ही ‘बालसंस्‍कार’ हे ‘अ‍ॅप’ इंग्रजी, हिंदी, मराठी आणि कन्‍नड या ४ भाषांमध्‍ये उपलब्‍ध करत आहोत.

विविध विषयांवर मार्गदर्शन करणारे ‘बालसंस्‍कार’ अ‍ॅप

‘बालसंस्‍कार’ या ‘अ‍ॅप’वर पुढील विषयांवर मार्गदर्शनपर माहिती उपलब्‍ध आहे,

१. मुलांवर चांगले संस्‍कार करणे

२. लहान वयातच मुलांमध्‍ये धर्माचरणाचे बीज रुजवणे

३. प्रामाणिकपणा, देशभक्‍ती इत्‍यादी गुण लहानपणीच आत्‍मसात करणे

४. आदर्श भावी पिढी निर्माण व्‍हावी, यासाठी पालकांना योग्‍य दृष्‍टीकोन उपलब्‍ध करून देणे

५. आदर्श व्‍यक्‍तीमत्त्व घडवणे

६. आपल्‍या राष्‍ट्राची, म्‍हणजेच हिंदु राष्‍ट्राची आदर्श भावी पिढी निर्माण करणे

मुलांच्‍या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन करणारा आणि भारताचा वैभवशाली अन् तेजोमय इतिहास सांगणारे ‘बालसंस्‍कार’ अ‍ॅप

‘बालसंस्‍कार’ अ‍ॅप मध्‍ये ‘अभ्‍यास कसा करावा ? वेळेचे नियोजन योग्‍य प्रकारे कसे करावे ? व्‍यक्‍तीमत्त्वाचा विकास, गुणसंवर्धन आणि आपल्‍या पाल्‍यांचा सर्वांगीण विकास’ या संदर्भात पालकांसाठी मार्गदर्शनपर सूत्रे असणारे विविध लेख उपलब्‍ध आहेत. भारताचा वैभवशाली आणि तेजोमय इतिहासाचा समावेशही या ‘अ‍ॅप’मध्‍ये केला आहे. तो इतिहास वाचून मुले अधिक शिकण्‍यासाठी उद्युक्‍त होतील आणि आपल्‍या इतिहासाविषयी त्‍यांच्‍या मनात अभिमान निर्माण होईल.

बोधप्रद गोष्‍टी : लहान लहान बोधप्रद गोष्‍टी हे शिक्षणाचे एक माध्‍यम आहे. यांतून मुले मूलभूत तत्त्वे, उदा. आदर करणे, काळजी घेणे, सत्‍यवादीपणा, प्रामाणिकपणा, शौर्य, चाणाक्षपणा इत्‍यादी लवकर शिकतात.

‘आपल्‍या मुलांना आदर्श बनवण्‍यासाठी ‘बालसंस्‍कार’ अ‍ॅप मार्गदर्शक ठरो’, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना !