मुलांनो, ‘लवकर निजा व लवकर उठा’ !

हल्ली मुलांना अभ्यासाच्या कारणास्तव रात्री उशिरापर्यंत जागरण करण्याची व सकाळी ८-९ वाजेपर्यंत उठण्याची चुकीची सवय लागली आहे. जागरण करणे, हे आरोग्यदृष्ट्या अपायकारक आहे. याउलट 'लवकर निजे व लवकर उठे, त्यास आरोग्य व धनसंपत्ती मिळे!', असे म्हटले आहे. पहाटे केलेला अभ्यास जास्त चांगला लक्षात रहातो. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ब्राह्ममुहूर्तावर उठून वेदपठण करत असत. रात्री वातावरणात रज-तमाचे प्राबल्यही असते, तर पहाटे वातावरण सात्त्विक असते. याचा अभ्यासावर चांगला परिणाम होतो. तसेच सात्त्विकतेचा लाभही होतो.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, सुसंस्कार आणि चांगल्या सवयी