गडमाथ्यावर जाताना दुसर्या दरवाजाच्याजवळ एक गुहा आहे. गडमाथा म्हणजे एक पठारच होय.माथ्यावर दोन ते तीन पाण्याची टाकी आहेत.एक सुंदर बांधीव तलाव आहे. दोन तीन वाडांचे अवशेष आपले अस्तित्व टिकवून आहेत. बाकी गडावर काही नाही. गडावरून मुल्हेरचे पठार व माची,हरगड,मांगी-तुंगी,न्हावीगड,तांबोळ्या,हनुमान टेकडी यांचे विहंगम दृश्य दिसते.
गडावर जाण्याच्या वाटा
मोरागडावर जाणारी एकच वाट आहे. ती मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावरून जाते.मुल्हेरमाचीवर असणार्या सोमेश्र्वर मंदिरापासून वर जाणारी वाटसुद्धा मोरागडावर जाते.पुढे या दोन्ही वाटा एकमेकांना मिळतात. मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावर भडंगनाथाच्या मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर उजवीकडे वर जाणारी वाट पकडावी. या वाटेने थोडे वर गेल्यावर समोरच खाली मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. येथून मोरागडावर जाण्यास अर्धा तास पुरतो. गडावर जातांना तीन दरवाजे लागतात
भरतगड
यशवंतगड
अर्नाळा
पद्मगड
तळगड
नळदुर्ग