इतिहास
इतिहासात फारसा या गडाचा उल्लेख नाही कारण येथे कोणती मोठी लढाई झाली नाही. मुल्हेर गावात गेल्यावर हरगडचे दर्शन होते. समोर दिसणारा मुल्हेर,डावीकडे मोरागड आणि उजवीकडचा हरगड. या गडाची उंची मुल्हेरपेक्षा थोडी जास्त आहे.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
गडमाथा तसा विस्तीर्ण आहे. गडमाथा म्हणजे एक पठारच होय. या पठारावर काही तटबंदीचे अवशेष आहेत. पाण्याची दोन टाकी आढळतात. एक पडके मंदिर आहे. वाड्यांचे काही अवशेष आढळतात. पाण्याच्या टाक्यांमधील पाणी पिण्यासारखे नसल्याने पाणी जवळ असणे आवश्यक आहे. गडफेरी मारताना पुढे सपाटीवर एक गुहा आढळते यात कपार भवानीचं मंदिर आहे. बाकी गडावर पाहण्यासारखे काही नसल्याने आल्या मार्गाने खिंड गाठून एक तर मुल्हेरगडावर जावे नाहीतर मुल्हेर गावात जावे. गडफेरीस १ तास पुरतो.
राहण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : नाही.
भरतगड
यशवंतगड
अर्नाळा
पद्मगड
तळगड
नळदुर्ग