श्रीकृष्ण जयंती

तिथी व इतिहास

           श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांना झाला.

महत्त्व

        या दिवशी श्रीकृष्णाचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी श्रीकृष्णाची उपासना करून श्रीकृष्णतत्त्वाचा जास्तीतजास्त फायदा मिळवणे, म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणे.

         आता आपण श्रीकृष्णाच्या उपासनाशास्त्राविषयी माहिती जाणून घेऊया.

कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।

प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ।।

अर्थ : सर्व दुःखांचे हरण करणार्‍या, भक्तांच्या पीडा, क्लेष दूर करणार्‍या, शरणागतांना अभय देणार्‍या अन् निस्सीम भक्तांना आनंद प्रदान करणार्‍या, वासुदेव कृष्णाला माझा नमस्कार असो !

         या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाची निरनिराळी गुणवैशिष्ट्ये स्मरून त्याला नमन केले आहे. असे केल्याने भक्ताचा भगवंताप्रती भाव निर्माण होऊन तो भगवंताच्या कृपेस पात्र होतो.

श्रीकृष्णाची वैशिष्ट्ये !

         कुशल राजनीतिज्ञ, महान तत्त्ववेत्ता, समाजरक्षण हेच ध्येय असणारा, सामाजिक कर्तव्यांबाबत दक्ष असणारा, सर्वकाही इतरांच्या कल्याणासाठीच करणारा, अन्याय सहन न करणारा, दुर्जनांचा नाश करणारा, ही श्रीकृष्णाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.

श्रीकृष्णाची पूजा कशी करावी ?

         भगवान श्रीकृष्णाच्या पूजेपूर्वी उपासकाने स्वतःला मध्यमेने, म्हणजे मधल्या बोटाने उभे दोन रेषांचे गंध लावावे किंवा भरीव उभे गंध लावावे. श्रीकृष्णाच्या पूजेत त्याच्या प्रतिमेला गंध लावण्यासाठी गोपीचंदन वापरतात. श्रीकृष्णाची पूजा करतांना त्याला करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावावे. श्रीकृष्णाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहावे.

या दिवशी श्रीकृष्णाचा नामजप करण्याचे महत्त्व

          या दिवशी `ॐ नमो भगवते वासुदेवाय ।‘ हा नामजप जास्तीतजास्त करावा. यामुळे नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या श्रीकृष्णतत्त्वाचा आपल्याला जास्त लाभ मिळतो.

         श्रीकृष्णाचा नामजप येथे ऐका !

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘श्रीकृष्ण’

गोकुळाष्टमीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा!

‘मधुराष्टकम्’ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा !

कृष्णाचा पाळणा ऐकण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment