Menu Close

‘श्री ज्ञानगिरी स्वामी महाराज ट्रस्ट’च्या जागेवरील ‘लँड जिहाद’चा प्रयत्न केला निष्फळ !

प्रशासकीय हस्तक्षेपाने अनधिकृत बांधकाम बंद करून जागा सीलबंद !
धर्मांधांनी संगनमताने नियमबाह्य करार करून बळकावली होती ट्रस्टची भूमी !
३० दिवसांत अतिक्रमण न हटवल्यास तीव्र आंदोलनाची चेतावणी !

श्री ज्ञानगिरी महाराज

मिरज (जिल्हा सांगली)– येथील धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या ‘श्री ज्ञानगिरी स्वामी महाराज ट्रस्ट’ यांच्या मालकीच्या शिवाजी रस्ता, प्लॉट क्रमांक ५७ वरील मोकळ्या जागेवर धर्मांध अल्ताफ गुलाम हुसेन मणेर याने संगनमताने आणि नियमबाह्य पद्धतीने अनधिकृत बांधकाम करून ‘लँड जिहाद’चा प्रयत्न चालवला होता. या संदर्भात हिंदुत्वनिष्ठ आणि विश्वस्त यांनी दिलेल्या कायदेशीर लढ्याला अंततः यश आले आहे. प्रशासनाने हस्तक्षेप करून हे अनधिकृत बांधकाम बंद पाडले आहे. कोल्हापूर येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयाने ही जागा ‘सील’बंद केली असून ३० दिवसांच्या आत हे बांधकाम काढण्याचे आदेश दिले आहेत.

बक्षीसपत्रातील अटींचा भंग करून भूमी हडपण्याचा कट !

सदर जागा वर्ष १९३४ मध्ये स्व. दौलतराव खरात यांनी बक्षीसपत्राद्वारे ट्रस्टला दिलेली आहे. या पत्रात ‘जागेचा वापर ट्रस्टच्या मूळ उद्देशांव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी करता येणार नाही’, अशी स्पष्ट अट असतांनाही काही दोषारोपित विश्वस्तांनी संगनमत करून ही जागा अल्ताफ मणेर याला भाडेकरारावर देण्याचा प्रयत्न केला. मणेर याने आनंदा देवमाने, रमेश कारंडे, महादेव कुरणे, बबन सातपुते आणि विशाल सातपुते यांच्याशी संगनमत करून ट्रस्टची ही जागा बळकावण्याचा गंभीर प्रकार चालू केला होता.

‘श्री ज्ञानगिरी स्वामी महाराज ट्रस्ट’च्या जागेवरील अनधिकृत बांधकाम

प्रशासकीय कारवाई आणि हिंदुत्वनिष्ठांचा विजय !

साहाय्यक धर्मादाय आयुक्त, कोल्हापूर यांनी या जागेवर कोणतेही बांधकाम न करण्याचा अंतरिम आदेश दिला होता. तरीही धर्मांधांकडून आदेशाचा अवमान करून बांधकाम चालूच ठेवण्यात आले होते. विश्वस्त श्री. अनिल सातपुते आणि धर्माभिमानी भक्त श्री. शिवप्रसाद सातपुते यांनी केलेल्या तक्रारीनंतर १३ मे या दिवशी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या निरीक्षक रागिणी खडके, सांगली-मिरज-कुपवाड महापालिका प्रशासन आणि पोलीस यांनी घटनास्थळी येऊन अनधिकृत बांधकाम बंद पाडले. या प्रकरणात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना घटनेची माहिती दिली. पाटील यांनी या प्रकरणी प्रशासनाला सहकार्य करण्याच्या सूचना केल्या. यामुळे पोलीस आणि प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली.

हिंदूंकडून तीव्र संतापाची लाट !

धर्मांधांच्या या कृत्यामुळे संपूर्ण हिंदु समाज, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, चर्मकार समाज आणि श्री ज्ञानगिरी महाराजांची भक्त मंडळी यांच्याकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘हे अनधिकृत बांधकाम ३० दिवसांच्या आत न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल’, अशी चेतावणी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री अनिल सातपुते, शिवप्रसाद सातपुते, सरदार सातपुते, राजू सातपुते, विनायक दबडे, श्रीकांत रायमाने आणि राजेंद्र पाटील यांच्यासह अनेक समाजबांधवांनी दिली आहे. ‘संबंधित दोषारोपित ट्रस्टी, तसेच आदेशाची कार्यवाही टाळणार्‍या काही अधिकार्‍यांची भूमिका संशयास्पद असून त्यांच्यावर कठोर विभागीय आणि कायदेशीर कारवाई व्हावी’, अशी समाजाची मागणी आहे. ‘धार्मिक ट्रस्टच्या मालमत्तेचे संरक्षण करणे, हे प्रशासनाचे दायित्व असून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर आणि तातडीची कारवाई होणे आवश्यक आहे’, अशीही मागणी करण्यात आली.

Read more on Land Jihad

Latest News