-
पुरातत्व सर्वेक्षण विभागाचा २ सहस्र १०० पानांचा अहवाल इंदूर उच्च न्यायालयात सादर
-
गणेश-ब्रह्मा यांसह ९४ मूर्ती, संस्कृत भाषेतील शिलालेख सापडले !
केवळ भोजशाळाच नव्हे, तर भारतातील हिंदूंची अनेक मंदिरे आणि धार्मिक स्थळे पाडून तेथे मुसलमान आक्रमणकर्त्यांनी मशिदी बांधल्या. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने अशा सर्वच स्थळांचे सर्वेक्षण करून, सत्य बाहेर आणून ही स्थळे हिंदूंना सुपुर्द करणे आवश्यक आहे ! – संपादक

इंदूर (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील धार येथील भोजशाळा परिसरातील कमाल मौला मशिदीच्या संदर्भात २४ फेब्रुवारी या दिवशी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने वैज्ञानिक अहवाल इंदूर उच्च न्यायालयात सादर केला. या अहवालाच्या प्रती फिर्यादी, पक्षकार आणि सरकार यांना देण्यात आल्या असून यावर पुढील २ आठवड्यांत आक्षेप आणि मते नोंदवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, कमाल मौला मशीद प्राचीन मंदिरांचे अवशेष, स्थापत्य घटक, शिल्प आणि शिलालेख यांचे तुकडे वापरून उभारण्यात आली असून विद्यमान रचना अनेक शतकांनंतर संतुलन आणि एकसंध आराखडा न ठेवता उभी करण्यात आली.
The ASI’s 2,100-page report to the Indore High Court reveals that the Kamal Maula Masjid at Bhojshala was built over a Hindu temple, says Advocate @Vishnu_Jain1
94 vigrahas including Shri Ganesh and Brahma and Sanskrit inscriptions were found during the survey.
If Bhojshala… pic.twitter.com/rMyv9krb4j
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 24, 2026
१. २३ फेब्रुवारी या दिवशी या प्रकरणी इंदूर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती विजय कुमार शुक्ला आणि न्यायमूर्ती आलोक अवस्थी यांच्या खंडपिठाने नमूद केले की, ९८ दिवसांत सिद्ध करण्यात आलेला २ सहस्र १०० पानांचा आणि १० खंडांचा वैज्ञानिक सर्वेक्षण अहवाल सीलबंद लिफाफ्यातून आधीच उघडण्यात आला असून त्याच्या प्रती सर्व पक्षांना देण्यात आल्या आहेत.
२. न्यायालयाने यथास्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिले असून सध्या चालू असलेल्या पूजा आणि नमाज यांच्या व्यवस्थेत कोणताही पालट पुढील आदेशापर्यंत केला जाणार नाही, असे स्पष्ट केले. पुढील सुनावणी १६ मार्च २०२६ या दिवशी होणार असून त्या वेळी सादर करण्यात आलेल्या हरकती आणि सूचना यांवर विचार केला जाईल.
पूर्वी मंदिर शैलीतील वास्तूरचना अस्तित्वास असल्याचे मिळाले पुरावे !अहवालानुसार पुरातत्व विभागाच्या पथकाने एकूण ९४ मूर्ती आणि शिल्प यांचे अवशेष शोधले असून त्यामध्ये भगवान गणेश, ब्रह्मा, नरसिंह, भैरव, तसेच विविध प्राण्यांच्या आकृत्यांचा समावेश आहे. अनेक तुकड्यांवर संस्कृत भाषेतील शिलालेख आढळले असून ते १२ ते १६ व्या शतकातील असल्याचे मानले जाते. या निष्कर्षांवरून येथे पूर्वी मंदिरशैलीतील वास्तूरचना आणि कला अस्तित्वात असल्याचे संकेत मिळतात. |
काय आहे वाद ?
भोजशाळा वाद हा अनेक वर्षांपासून धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या संवेदनशील विषय राहिला आहे. हिंदु समुदाय या स्थळाला श्री वागदेवी मंदिर मानून पूजतो, तर मुसलमान पक्ष त्याला कमाल मौला मशीद म्हणतो. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर न्यायालयाच्या आदेशावरून पुरातत्व विभागाने येथे सर्वेक्षण केले आणि त्याचा अहवाला सादर केला.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात







