गीताई – अध्याय १०

श्री भगवान् म्हणाले फिरूनि सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुज । राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो ॥ १ ॥ न देव जाणती माझा प्रभाव न महर्षि हि । सर्वथा मी चि देवांचे महर्षींचे हि मूळ की ॥ २ ॥ ओळखे जो अ-जन्मा मी स्वयं-भू विश्व-चालक । निर्मोह तो मनुष्यांत सुटला पातकांतुनी ॥ ३ … Read more

गीताई – (अध्याय ११)

अर्जुन म्हणाला करूनि करूणा माझी बोलिलास रहस्य जे । त्या थोर आत्म-विद्येने माझा हा मोह फेडिला ॥ १ ॥ उत्पत्ति-नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर । कळला तुजपासूनि अभंग महिमा तुझा ॥ २ ॥ तुझे ते ईश्वरी रूप मानितो सांगसी जसे । ते चि मी इच्छितो पाहू प्रत्यक्ष पुरूषोत्तमा ॥ ३ ॥ तू जरी मानिसी शक्य … Read more

गीताई – (अध्याय १२)

अर्जुन म्हणाला असे मिसळले कोणी तुज भक्त उपासिती । कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते ॥ १ ॥ श्री भगवान् म्हणाले रोवूनि मन माझ्यात भजती नित्य जोडिले । श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर मानितो ॥ २ ॥ परी अचिंत्य अव्यक्त सर्व-व्यापी खुणेविण । नित्य निश्चळ निर्लिप्त जे अक्षर उपासती ॥ ३ ॥ रोधिती … Read more

गीताई – (अध्याय १३)

श्री भगवान् म्हणाले अर्जुना ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते । जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्र-ज्ञ म्हणती तसे ॥ १ ॥ क्षेत्र-ज्ञ मी चि तो जाण क्षेत्रांत सगळ्या वसे । क्षेत्र-क्षेत्रज्ञ-भेदास जाणणे ज्ञान मी म्हणे ॥ २ ॥ क्षेत्र कोण कसे त्यात विकार कुठले कसे । क्षेत्र-ज्ञ तो कसा कोण एक थोड्यांत सांगतो ॥ ३ … Read more

गीताई – (अध्याय १४)

श्री भगवान् म्हणाले सर्व ज्ञानामधे थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा । जे जाणूनि इथे मोक्ष पावले सगळे मुनि ॥ १ ॥ ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्या चि सारखे । जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे ॥ २ ॥ माझे प्रकृति हे क्षेत्र तिथे मी बीज पेरितो । त्यांतूनि सर्व भूतांची उत्पत्ति मग होतसे … Read more

गीताई – (अध्याय १५)

श्री भगवान् म्हणाले खाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला । ज्याच्या पानांमधे वेद जाणे तो वेद जाणतो ॥ १ ॥ वरी हि शाखा फुटल्या तयास । ही भोग-पाने गुण-पुष्ट जेथे ॥ खाली हि मूळे निघती नवीन । दृढावली कर्म-बळे नृ-लोकी ॥ २ ॥ ह्याचे तसे रूप दिसे न येथे । भासे न शेंडा बुडखा … Read more

गीताई – (अध्याय १६)

श्री भगवान् म्हणाले निर्भयत्व मनःशुद्धि योग-ज्ञानी सुनिश्चय । यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप ॥ १ ॥ अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता । अ-लुब्धता दया भूती मर्यादा स्थैर्य मार्दव ॥ २ ॥ पवित्रता क्षमा तेज धैर्य अद्रोह नम्रता । हे त्याचे गुण जो आला दैवी संपत्ति घेउनी ॥ ३ ॥ दंभ मीपण अज्ञान क्रोध … Read more

गीताई – (अध्याय १७)

अर्जुन म्हणाला जे शास्त्र-मार्ग सोडूनि श्रद्धा-पूर्वक पूजिती । त्यांची सात्त्विक ती निष्ठा किंवा राजस तामस ॥ १ ॥ श्री भगवान् म्हणाले तिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी । ऐक सात्त्विक ती होय तशी राजस तामस ॥ २ ॥ जसा स्वभाव तो ज्याचा श्रद्धा त्याची तशी असे । श्रद्धेचा घडिला जीव जशी श्रद्धा तसा चि तो … Read more