महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या इतिहासातील महान योद्धा, आदर्श राज्यकर्ता, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि लोककल्याणकारी विचारांचे अध्वर्यू असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून, भारताच्या अस्मितेचे व अभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या नावाचा अपूर्ण आणि एकेरी उल्लेख करणे हा त्यांच्या महान कार्याचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अवमानच करण्यासारखे आहे.
कृपया वरील बटणावर क्लिक करून मा. मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांना “शिवाजी विद्यापीठ”चे नाव बदलून “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” करावे या मागणीचे ईमेल पाठवा.
(टीप: ‘Send Email’ बटण केवळ मोबाईलवर कार्य करेल.)
‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ या नामकरणाच्या मागणीसाठी १७ मार्चला भव्य मोर्चा!

शिवछत्रपतींचा अवमान रोखण्यासाठी सर्व शिवप्रेमींनी १७ मार्चला एकत्र यावे!
दिनांक : सोमवार, १७ मार्च २०२५
वेळ : दुपारी ३ वाजता
मार्ग : दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
🚩’छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ या नामकरणाच्या मागणीसाठी १७ मार्चला भव्य मोर्चा! 🚩
🔸 सन्मान छत्रपतींचा,
स्वाभिमान महाराष्ट्राचा! 🔸🎥 संपूर्ण व्हिडिओ पहा. 👇🏻
शिवछत्रपतींचा अवमान रोखण्यासाठी सर्व शिवप्रेमींनी १७ मार्चला एकत्र यावे!
– श्री. सुनील घनवट… pic.twitter.com/vJVxv4aKIQ
— Sunil Ghanwat 🛕🛕 (@SG_HJS) March 2, 2025
नामांतरासाठी कायदेशीर व प्रशासकीय आधार
विद्यापीठाचे नाव बदलण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, 2016 मधील तरतुदींचा आधार घेता येतो.
- कलम 3 (8): विद्यापीठाच्या नावात बदल करण्याचा अधिकार राज्य शासनास आहे.
- कलम 4: शैक्षणिक संस्थांनी सामाजिक व ऐतिहासिक वारसा जपणे आवश्यक आहे.
शासनाने यापूर्वी घेतलेले ऐतिहासिक निर्णय
- 1996 मध्ये “व्हिक्टोरिया टर्मिनस” चे नामकरण “छत्रपती शिवाजी टर्मिनस” करण्यात आले.
- 2017 मध्ये “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस” असा संपूर्ण नावाचा उल्लेख करण्यात आला.
- ‘छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळा’चे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे केले,
- पूर्वी ‘औरंगाबाद’चे “संभाजीनगर’ असे नामकरण केले होते. आता ‘छत्रपती संभाजीनगर’ केले आहे.
संपूर्ण नावाचा वापर करण्याचा कायदेशीर आधार
- महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण नाव वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
- शासकीय दस्तऐवज, स्मारके, विमानतळ, रेल्वे स्थानके इत्यादींच्या नावांमध्ये त्यांचा पूर्ण उल्लेख केला जातो.
- असे असताना, एका प्रमुख शिक्षणसंस्थेच्या नावात त्यांचा अपूर्ण व एकेरी उल्लेख योग्य नाही.
सार्वजनिक भावनांचा आदर
- महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना आणि विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या एकेरी नावामुळे खंत, तसेच संताप वाटतो.
- भारतातील अन्य विद्यापीठांची नावेही संपूर्ण स्वरूपात असतात, उदा.”डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ”, “सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठ” इत्यादी. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठ ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नामकरण होणे आवश्यक आहे.
समाजमनातील स्थान
- छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण भारताचे राष्ट्रपुरुष आहेत.
- त्यांच्या नावाचा अपमान होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी शासनाने सुधारणा केल्या आहेत.
1962 साली दक्षिण महाराष्ट्रात विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा प्राचार्य एस्. आर्. तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” असे नाव सुचवले होते. मात्र त्या वेळी “शिवाजी विद्यापीठ” हे संक्षिप्त नाव ठेवण्याचा आग्रह धरला गेला. त्या काळातील सामाजिक व प्रशासकीय परिस्थिती लक्षात घेतल्यास, संक्षिप्त नाव ठेवण्याचा निर्णय तात्कालिक असू शकतो; परंतु आता समाजातील जनभावना, ऐतिहासिक महत्त्व आणि शासनाच्या आताच्या निर्णयांची दिशा लक्षात घेऊन हा बदल आवश्यक आहे. यापूर्वी अनेक ऐतिहासिक संस्थांची नावे सुधारली गेली आहेत. “व्हिक्टोरिया टर्मिनसचे ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’, तसेच ‘औरंगाबाद’चे ‘छत्रपती संभाजीनगर’, ‘उसन्मानाबाद’चे ‘धाराशीव’, अशी नावे बदलण्यात आली आहेत. त्यामुळे पूर्वीचा निर्णय अंतिम असू शकत नाही. त्या वेळेची कारणे आजही ग्राह्य धरता येणार नाहीत. छत्रपती ही पदवी म्हणजे केवळ “राजा” नव्हे, तर हिंदवी स्वराज्य संस्थापक, लोककल्याणकारी शासक आणि स्वराज्याचे संरक्षक यांचे प्रतीक आहे. त्यांच्या नावाचा संपूर्ण उल्लेखच योग्य सन्मान देईल.
आमच्या मागण्या
1. “शिवाजी विद्यापीठ”चे नाव बदलून “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” करावे.
2. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तातडीने हा प्रस्ताव संमत करण्यात यावा.
3. सर्व शासकीय दस्तऐवज, अधिसूचना व प्रमाणपत्रांमध्ये त्वरित सुधारणा करावी.
महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा भाग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपूर्ण उल्लेख करण्यासाठी सरकारने त्वरित योग्य निर्णय घ्यावा.
‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामकरणासाठी भव्य मोर्चा!
शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन : योग्य तो प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे कुलगुरूंचे आश्वासन!
🚩शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन : योग्य तो प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे कुलगुरूंचे आश्वासन!
🚩कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’ या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण उल्लेख असल्याने विद्यापीठाचे नाव अधिक सन्माननीय आणि पूर्ण… pic.twitter.com/JuKis63mkZ
— Sunil Ghanwat 🛕🛕 (@SG_HJS) March 6, 2025
दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ केंद्राचे सर्व साधक मोर्चात सहभागी होतील ! – पू. आबासाहेब मोरे
दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ केंद्राचे सर्व साधक मोर्चात सहभागी होतील ! – पू. आबासाहेब मोरे
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. अशा थोर महापुरुषांचा उल्लेख हा नेहमी आदरानेच घेतला गेला पाहिजे. त्यामुळे ‘शिवाजी’ विद्यापीठाचा नामविस्तार हा ‘छत्रपती शिवाजी… pic.twitter.com/vQxJ4WuoZT
— Sunil Ghanwat 🛕🛕 (@SG_HJS) March 4, 2025
पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांना आमंत्रण
🚩 सन्मान छत्रपतींचा, स्वाभिमान महाराष्ट्राचा ! 🚩
🔥 “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” नामकरणासाठी भव्य मोर्चा!!
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घणवत यांनी पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांना सादर आमंत्रित केले. गुरुजींनी हे आमंत्रण… pic.twitter.com/fiDjT69URl
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) March 4, 2025




