हिंदूंना धर्मांतरित करण्याचे अांतराष्ट्रीय षडयंत्र

सारणी


इतिहासात अरबांपासून इंग्रजांपर्यंत अनेक परकियांनी हिंदुस्थानवर आक्रमणे केली. साम्राज्यविस्तारासह स्वधर्माचा प्रसार, हाच या सर्व आक्रमणांचा गाभा होता. आजही या परकियांचे वारस तेच ध्येय ठेवून हिंदुस्थानात नियोजनबद्धरित्या कार्यरत आहेत. धर्मांतरासाठी मिळणारे परकीय अर्थसाहाय्य, खिस्त्यांची हिंदूंच्या धर्मांतरासाठीची राष्ट्रव्यापी सिद्धता, हिंदूंच्या इस्लामीकरणासाठी कार्यरत असलेली मुसलमानांची योजना, इत्यादींविषयी या ग्रंथात सविस्तर विवेचन केले आहे.

१. आर्थिक

‘जगभरातून प्रतिवर्षी हिंदुस्थानावर धर्मांतर करण्यासाठी १ लक्ष कोटी रुपये व्यय होतात.’ – श्री. के.बी. सुरेंद्रन, भारतीय विचार केंद्र.

अ. खिस्तीकृत धर्मांतरासाठी मिळणारे परकीय अर्थसाहाय्य !

 • १. ‘वर्ष २००८ च्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार पाद्री, धर्मप्रसारक आणि इतर धार्मिक कृती यांसाठी २ कोटी १० लक्ष डॉलर्सचे (भारतीय चलनानुसार अनुमाने ९० कोटी रुपयांचे) विदेशी साहाय्य मिळते.’ – श्री. पी.सी. डोग्रा, निवृत्त अधिकारी, भारतीय पोलीस सेवा.
 • २. ‘मार्च २००९ मधील केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार हिंदुस्थानात धर्मप्रसारासाठी काही खिस्ती स्वयंसेवी संस्थांना लक्षावधी डॉलर्सचे (कोट्यवधी रुपयांचे) परकीय साहाय्य मिळते.’
 • ३. ‘वर्ष २०११ मधील केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार गेल्या दशकात परदेशी संघटनांकडून २.५ अब्ज डॉलर्स (भारतीय चलनानुसार ११ सहदाा २५० कोटी रुपये) एवढा निधी खिस्ती संघटनांना मिळाला होता.
 • ४. अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, इटली आणि नेदरलँड हे पाच प्रमुख देश धर्मांतराच्या कामासाठी हिंदुस्थानात निधी पुरवतात.’ – फादर जॉन्सन, अमेरिका

आ. इस्लामपुरस्कृत धर्मांतरासाठी मिळणारा परकीय निधी !

 • १. दमाम (सौदी अरेबिया) येथे असलेली ‘इंडियन प्रâॅटर्निटी फोरम’ ही संस्था धर्मांतराच्या कामासाठी पैसा गोळा करते.’
 • २. अरब राष्ट्रांतून हिंदुस्थानात धर्मांतरासाठी पैसा येण्याची माध्यमे : ‘सौदी अरेबिया येथून ‘वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफर’च्या माध्यमातून हवालाद्वारे पैसा येतो. हिंदुस्थानातील काही दागिन्यांच्या व्यावसायिकांच्या आखाती राष्ट्रांमध्ये शाखा आहेत. त्यांच्याद्वारेही पैशाचे स्थलांतर केले जाते. हज यात्रेसाठी जाणार्‍या मुसलमान यात्रेकरूंच्या माध्यमातूनही पैशाचे स्थलांतर होते; कारण हज येथून
  येणार्‍या विमानांतील प्रवाशांची कडक पडताळणी होत नाही.’

२. राष्ट्रीय

अ. प्रतिवर्षी ८ लक्ष हिंदू धर्मांतरित होणे

प्रतिवर्षी अनुमाने साडेतीन लाख हिंदूंचे इस्लामीकरण, तर साडेचार लाख हिंदूंचे खिस्तीकरण, म्हणजेच ८ लक्ष हिंदूंचे धर्मांतर होत आहे. १९४७ या वर्षीच्या जनगणनेशी आजच्या लोकसंख्येची तुलना केली, तर खिस्त्यांची लोकसंख्या ५ पटीने आणि मुसलमानांची लोकसंख्या ८ पटीने वाढली आहे. देशातील हिंदूंच्या धर्मांतरासाठी अनुमाने १ लाख २० सहदाा इस्लामी आणि ३ लाख खिस्ती धर्मप्रचारक झटत आहेत. – दैनिक ‘तरुण भारत’ (२०.११.१९९९)

आ. खिस्त्यांची हिंदूंच्या धर्मांतरासाठीची राष्ट्रव्यापी सिद्धता !

 • हिंदुस्थानात धर्मांतरकार्य अव्याहतपणे करणारे खिस्त्यांचे धार्मिक दल ! : ‘१९९८ च्या ‘कॅथॉलिक डिरेक्टरी’नुसार हिंदुस्थानात १ लक्ष १९ सहदाा २५० मिशनरी, १५ सहदाा १०१ खिस्ती शिक्षणसंस्था अन् त्यांत शिक्षण घेणारे ४७ लक्ष विद्यार्थी आहेत. एवढ्या प्रचंड संख्येने खिस्ती धर्मांतराचे कार्य हिंदुस्थानात करत आहे.’
 • ‘हिंदुस्थानातील ७५ सहदाा ‘पिन कोड’च्या ठिकाणांवर खिस्त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.’ – फादर जॉन्सन, अमेरिका (१९)
 • हिंदूंच्या धर्मांतरासाठी हिंदुस्थानात कार्यरत विविध चर्च अन् संघटना !
  • अ‍ॅडव्हेंटिस्ट चर्च : ‘कॅनडाचे धर्मप्रसारक रॉन वॅट १९९७ मध्ये हिंदुस्थानात आले. तेव्हा ‘अ‍ॅडव्हेंटिस्ट चर्च’चे २ लाख २५ सहदाा सदस्य होते. ५ वर्षांमध्ये ही संख्या ७ लाखांवर पोहोचली. हे चर्च १० वा २५ गावांचा एक गट करून पास्टरच्या मार्गदर्शनाखाली धर्मांतराचे काम नियोजनबद्धतेने करते. स्थानिक कार्यकर्ते नंतर हे कार्य पुढे नेतात. १९९८ मध्ये १० गावांच्या १० गटांमधून ९ सहदाा ३३७ हिंदूंचे धर्मांतर झाले. १९९९ मध्ये ४० गटांतून ४० सहदाा हिंदूंनी बाप्तिस्मा घेतला.
  • मरांथा व्हॉलिंटर्स : या अमेरिकेच्या संघटनेने हिंदुस्थानात २०११ आणि २०१२ या दोन वर्षांत ७५० चर्च बांधण्याचे ठरवले आहे.
  • किजार्ली : या ‘ओरेगॉन’च्या संघटनेने दिवसाला १ याप्रमाणे १ सहदाा चर्च उभारण्याचे लक्ष्य ठरवले आहे.’ – फादर जॉन्सन, अमेरिका
  • अमेरिकेतील ६७ खिस्ती संस्था : ‘लप्रसी मिशन’, ‘बाप्टिस्ट बायबल फेलोशिप इंटरनॅशनल’, ‘दी बायबल लीग’, ‘वर्ल्ड व्हिजन’, ‘ट्रान्स वर्ल्ड रेडिओ’ इत्यादी ६७ अमेरिकी संस्था हिंदुस्थानात हिंदूंना बाटवण्याचे कार्य अत्यंत बिनबोभाटपणे करत आहेत.’ – मासिक ‘एकता’ (फेब्रुवारी २००५)

इ. हिंदूंच्या इस्लामीकरणासाठी १९८६ पासून कार्यरत असलेली मुसलमानांची योजना !

 • ‘अशिक्षित, अडाणी अन् दरिद्री हिंदू, विशेषकरून मागासलेले हिंदू यांना प्रलोभने दाखवून इस्लाम धर्मीय बनवणे
 • हिंदु स्त्रियांशी विवाह करणे अन् मुसलमानांची संख्या वाढवणे (या कटाद्वारे गेल्या १५ वर्षांत अनुमाने ५ लक्ष हिंदु स्त्रियांचे इस्लामीकरण करण्यात आले. याविषयी सविस्तर विवेचन ‘हिंदु जनजागृती समिती’च्या ‘लव्ह जिहाद’ या स्वतंत्र पुस्तिकेत करण्यात आले आहे. – संकलक)
 • सर्व भाषांतून इस्लामी वाङ्मयाचा प्रचार करणे (याच षड्यंत्राचा एक भाग म्हणून अलीकडे त्यांच्या धर्मग्रंथाच्या सर्व भारतीय भाषांतील प्रती विनाशुल्क सर्वत्र वितरित करण्यात येत आहेत. – संकलक)
 • जुन्या मशिदींचे नूतनीकरण करणे आणि नव्या मशिदी अन् मदरसे उबारणे
 • देशात ठिकठिकाणी इस्लाम धर्मियांची आंतरराष्ट्रीय संमेलने भरवणे’ – मासिक ‘समन्वय’ (मार्च-एप्रिल १९८६) आज हे कारस्थान नियोजनबद्धरित्या चालू असल्याचे हिंदू अनुभवत आहेत.

३. खिस्ती आणि इस्लाम पुरस्कृत धर्मांतराची प्रांतनिहाय भीषणता !

अ. उत्तर हिंदुस्थानातील हिंदी भाषिक राज्यांत हिंदूंच्या धर्मांतरासाठी जोशुआ प्रकल्प !

‘जगभरातील सर्व समुदायांमध्ये चर्चची घुसखोरी करण्यासाठी नेमलेले लोक आणि संघटना यांना साहाय्य करणे, हे ‘जोशुआ प्रकल्पा’चे मुख्य काम आहे. जोशुआ प्रकल्पाने उत्तर हिंदुस्थानातील हिंदी भाषिक राज्यांवर स्वतःचे सर्व लक्ष केंद्रित केले आहे.’ – फादर जॉन्सन, अमेरिका

आ. पंजाबमध्ये धर्मांतरामुळे खिस्त्यांचे लोकसंख्येतील प्रमाण १ टक्क्यापर्यंत वाढणे

‘शीख कडवे पंथाभिमानी असल्यामुळे अनुमाने १५० वर्षे खिस्ती धर्मप्रचारक शीख पंथापासून दूर होते; परंतु आता पंजाबात खिस्ती प्रचारक अतिशय आक्रमकपणे धर्मप्रसार करत आहेत. परिणामी स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळेला तेथील लोकसंख्येत ०.१ टक्क्याहूनही अल्प असलेले खिस्त्यांचे प्रमाण आता १ टक्का एवढे झाले आहे.’ – वैâ. मिलिन्द गाडगीळ, ज्येष्ठ युद्धपत्रकार, मुंबई.

इ. धर्मांतरामुळे स्वातंत्र्यापूर्वी २०० खिस्ती असलेली नागभूमी (नागालँड) देशातील सर्वांत मोठे खिस्ती राज्य होणे

१९४७ मध्ये नागभूमीत अवघे २०० खिस्ती होते. आता ते देशातील सर्वांत मोठे खिस्ती राज्य म्हणून उदयास आले आहे. वर्ष २००१ च्या जनगणनेनुसार तेथील ९०.०२ टक्के अर्थात १७ लाख ९० सहदाा ३४९ नागरिक खिस्ती आहेत. त्यांतील ७५ टक्क्यांहून अधिक खिस्ती ‘बाप्तिस्ट’ चर्चशी संबंधित असल्याने ‘जगातील बाप्तिस्टांचे एकमेव प्रमुख राज्य’ अशी त्याची ख्याती आहे. नागभूमीत आता केवळ ७.७ टक्के हिंदू शेष आहेत.

ई. नागभूमीच्या पाठोपाठ दुसरे मोठे खिस्ती राज्य झालेले मिझोरम !

खिस्ती मिशनर्‍यांनी केलेल्या आक्रमक धर्मप्रचारामुळे मिझोरममधील ९० टक्क्यांहून अधिक समाज खिस्ती झाला आहे. ‘प्रेसबायटेरियन’ हा तेथील खिस्ती समाजाचा प्रमुख पंथ आहे. इतर खिस्ती चर्चचेही राज्यात प्रस्थ आहे.

उ. हिंदुस्थानात खिस्तीबहुल झालेले तिसरे राज्य मेघालय !

स्वातंत्र्यानंतर मेघालय राज्यही खिस्तीकृत धर्मांतरांमुळे खिस्तीबहुल झाले. २००१ च्या जनगणनेनुसार तेथील लोकसंख्येत खिस्त्यांचे प्रमाण ७०.३ टक्के एवढे आहे. तेथे हिंदूंची लोकसंख्या आता केवळ १३.३ टक्के एवढी आहे. मेघालयमधील सर्व शासकीय समाजकल्याण योजना खिस्ती संघटनांच्या माध्यमातून राबवण्यात येतात.

ऊ. खिस्ती शाळांच्या माध्यमातून मणीपूरची खिस्तीकरणाकडे होत असलेली वाटचाल !

मणीपूर राज्यात खिस्तीकरण करणे सुलभ होण्यासाठी मिशनर्‍यांनी ‘लिटल फ्लॉवर स्कूल’, ‘डॉन बॉस्को हायस्कूल’, ‘सेंट जोसेप्âस कॉन्व्हेंट स्कूल’, ‘निर्मला बास हायस्कूल’ इत्यादी खिस्ती शाळा विसाव्या शतकात चालू केल्या. याचेच दृश्य फळ म्हणजे मणीपूरमध्ये ३४ टक्के लोक खिस्ती झाले आहेत. मइताय जमातीतील बहुतांश लोकांनी धर्मांतर केले आहे. मणीपुरी भाषेतील साहित्यामध्ये केवळ बायबल आणि खिस्त्यांशी संबंधित पुस्तके आहेत.

ए. ओडिशामधील कंधमल हा वनवासीबहुल जिल्हा खिस्तीबहुल होण्याच्या मार्गावर !

‘ओडिशामधील कंधमल हा वनवासीबहुल जिल्हा आहे. आज ६ लक्ष ४७ सहदाा लोकसंख्या असलेल्या कंधमलमध्ये खिस्त्यांची संख्या १ लक्ष ५० सहदााांहून अधिक आहे. १९७१ मध्ये ६ टक्के लोकसंख्या असलेले खिस्ती आता २७ टक्के झाले आहेत. कंधमलमधील लोकसंख्येत ८० टक्के ‘कंध’ जनजातीचे आणि २० टक्के ‘पाना’ जनजमातीचे लोक आहेत. कंध हे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास आहेत. ‘पाना’ जमातीचे मात्र मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे. कंधमलमधील धार्मिक वातावरण गढूळ होण्यात खिस्ती मिशनर्‍यांचाच हात आहे. ते येथील धर्मांतरित वनवासींना उर्वरित वनवासींनी धर्मांतर करावे, यासाठी त्यांच्यावर बळाचा वापर करण्याचा आदेश देतात. त्यानुसार हे नवखिस्ती सर्व शक्तीनिशी उर्वरित वनवासींवर आक्रमणे करतात. धर्मांतरित ‘पाना’ जमात या कार्यासाठी माओवाद्यांचीही साथ घेते.’

ऐ. गोवा राज्यात ‘बिलिव्हर्स’ संघटनेकडून सहदााो हिंदूंचे धर्मांतर !

‘राज्यातील चिंबल आणि मेरशी येथील झोपडपट्टीत ‘बिलिव्हर्स’ या संघटनेकडून १ सहदााांपेक्षा अधिक हिंदूंचे धर्मांतर करण्यात आले आहे. नवीन धर्मांतरित हिंदूंना प्रतिमहा १ सहदाा ३७५ रुपये दिले जातात.’

ओ. आंध्रप्रदेशमध्ये काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या

साहाय्याने प्रतिमास न्यूनतम १० सहदाा जणांचे धर्मांतर केले जाणे

‘अ‍ॅडव्हेंटिस्ट चर्च’ने आंध्रप्रदेशात धर्मांतरासाठी १० गावांचा एक आणि २५ गावांचा एक असे गट सिद्ध करून अशा ५० गटांचा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री वाय. सॅम्युएल राजशेखर रेड्डी यांच्या साहाय्याने ठेवले होते. तेथे प्रत्येक मासाला न्यूनतम १० सहदाा जणांचे धर्मांतर केले जाते. आता दिवसाला ५ सहदाा हिंदूंच्या धर्मांतराचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आंध्रप्रदेशात दिवसागणिक चर्चची संख्या वाढत आहे. तिरुपतीजवळही चर्च उभारण्याचा प्रयत्न आहे.’ – फादर जॉन्सन, अमेरिका

औ. केरळमध्ये हिंदू नामशेष होण्याच्या मार्गावर !

‘केरळमध्ये १९०१ मध्ये ६८.३६ टक्के इतकी असलेली हिंदूंची लोकसंख्या २००१ मध्ये ५६.२० टक्के झाली, म्हणजेच १२.१६ टक्के इतकी घटली. याउलट १९०१ मध्ये १७.२८ टक्के असलेली मुसलमानांची लोकसंख्या २००१ मध्ये २४.७० टक्के झाली, म्हणजेच ७.४२ टक्क्यांनी वाढली. तेथे १९०१ मध्ये १३.८२ टक्के असलेली खिस्त्यांची लोकसंख्या २००१ मध्ये १९.१० इतकी झाली, म्हणजेच ५.२८ टक्क्यांनी वाढली.’ – ‘केरळाथाईल हिंदु समूह नेरीदुना वेल्लूविलीकाल’ या संस्थेची पाहणी

(गेल्या १० वर्षांत ही परिस्थिती आणखी भयावह झाली आहे. – संकलक)

अं. तामिळनाडूत खिस्ती संघटनांकडून पैशाच्या बळावर ९७ सहदाा दरिद्री हिंदूंचे धर्मांतर !

‘तामिळनाडूतील खिस्ती संघटना अमेरिकेतून येत असलेल्या पैशाच्या बळावर हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. तामिळ भाषिक लोक दरिद्री आहेत. त्यांच्या आर्थिक साहाय्यासाठी खिस्ती संघटना पुढे येतात आणि त्यांचे धर्मांतर करतात. २०१० पर्यंत ९७ सहदाा हिंदूंना खिस्ती बनवण्यात आले.’

अ: अंदमान आणि निकोबार बेटांवर होणारे धर्मांतर !

‘केंद्रशासित प्रदेश असलेल्या अंदमान-निकोबार बेटांवरील दुर्गम भागातील लोकांच्या दारिद्र्याचा, अज्ञानाचा अन् लाचारीचा अनुचित लाभ खिस्ती मिशनरी घेतात. थेथील सहदााो आदिवासींचे धर्मांतर झाले आहे. प्रत्येक बेटावर ८ किंवा १० खिस्ती नन घोळक्याने आढळतात. त्या पांढर्‍या, निळ्या अशा वेगवेगळ्या रंगांच्या पेहरावात असतात. सद्यस्थितीत निकोबार बेट संपूर्ण खिस्ती झाले असून निकोबारी जातीसह अनेक जनजाती खिस्ती झाल्या आहेत.’ – श्री. भास्कर नागरे, नवी मुंबई.

४. आंतरराष्ट्रीय

अ. नेपाळ निधर्मी राष्ट्र झाल्यावर तेथे १० लक्ष हिंदूंचे खिस्त्यांकडून धर्मांतर !

‘नेपाळ हे निधर्मी राष्ट्र झाल्यानंतर तेथील कारागृहांमध्ये हिंदु वैâद्यांचे धर्मांतर करण्याचे प्रकार वाढले आहेत. नेपाळमध्ये राजेशाही शासन आणि ‘हिंदुराष्ट्रा’चे संविधान असतांना खिस्ती धर्मप्रसार करण्यावर, तसेच हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या खिस्ती धर्मप्रसारकांवर कारवाई होत असे. आता नेपाळमध्ये खिस्ती धर्म वाढत आहे. ‘नेपाळमधील २ कोटी ८० लक्ष लोकसंख्येपैकी १० लक्ष लोक खिस्ती आहेत’, असे अनुमान बिशप अँथनी शर्मा यांनी व्यक्त केले आहे.’

आ. अमेरिकेने आश्रय दिलेल्या नेपाळी वंशाच्या निर्वासित

हिंदूंच्या असाहाय्यतेचा लाभ घेऊन त्यांचे धर्मांतर करणारे खिस्ती !

‘२००९ मध्ये भूतानने हाकललेल्या नेपाळी वंशाच्या ६० सहदाा हिंदूंना अमेरिकेने आश्रय दिला. या िंहदूंचे अमेरिकेतील खिस्ती मिशनर्‍यांकडून धर्मांतर केले जात आहे. यासाठी खिस्ती मिशनर्‍यांनी भांद्रा राय या मूळच्या हिंदु असलेल्या; मात्र आता खिस्ती झालेल्या नेपाळी वंशाच्या निर्वासित हिंदूचे साहाय्य घेतले आहे. त्यांच्या साहाय्याने नेपाळी भाषेत येशूची माहिती सांगणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.’

इ. मलेशियात एकूण लोकसंख्येत ७ टक्के असलेल्या

हिंदूंच्या धर्मांतराचा घाट घालणारे इस्लामी शासन आणि खिस्ती मिशनरी !

 • १. मलेशियात इस्लामी शासनाकडून हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांमुळे त्यांचे वेगाने धर्मांतर होणे : ‘मानवाधिकारांसाठी कार्यरत असलेल्या अमेरिकेतील हिंदु संघटनेने मलेशियातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांसंबंधी संयुक्त राष्ट्र संघ आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघटना यांना पुढील अहवाल सादर केला आहे –
  • मलेशियात गेल्या २५ वर्षांत १ लक्ष ३० सहदाा हिंदूंचे धर्मांतर झाले.
  • तेथे हिंदूंना द्वितीय श्रेणीच्या नागरिकांचे जीवन जगण्यास भाग पाडण्यात येते.
  • तेथे त्यांना लहानसहान अपराधांसाठीही कडक शिक्षा देण्यात येते.
  • मलेशियात इस्लाम धर्म स्वीकारल्याविना हिंदूंना मुसलमान युवतींशी विवाह करता येत नाही. मुसलमानांना मात्र हिंदु युवतींशी विवाह करण्याची मुभा असल्याने तेथे ३३ सहदाा हिंदु मुलींचे विवाहाद्वारे इस्लामीकरण करण्यात आले.’
 • २. ‘वर्ष २००८ मध्ये खिस्ती मिशनर्‍यांनी पुढील ५ वर्षांत मलेशियातील हिंदूंच्या लोकसंख्येपैकी ७८ टक्के हिंदूंच्या धर्मांतराचा आराखडा बनवला.’

संदर्भ : ‘हिंदू जनजागृती समिती’ पुरस्कृत ग्रंथ ‘धर्मांतर अन् धर्मांतरितांचे शुद्धीकरण