बलात्कार

आयुष्य उद्ध्वस्त करणारे बलात्कार स्त्रीशक्तीला कलंकच !

रेल्वेगाडीतून प्रवास करणार्‍या अल्पवयीन मुलीवर बलात्कार होणे, हे भारतीय स्त्री कमालीची असुरक्षित झाल्याचे द्योतक !

९.८.२०१३ या दिवशी छत्तीसगडमध्ये कुर्ला-हावडा एक्स्प्रेसमधून प्रवास करणारी सात वर्षांची मुलगी मध्यरात्री लघुशंकेसाठी शौचालयात जात असतांना बलात्कार्‍यांनी तिला पकडले. त्यानंतर शौचालयात ढकलून आतून दरवाजा बंद करून तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार पहाटेपर्यंत चालू होता. त्या वेळी गाडीतील इतर प्रवासी झोपेत होतेे. बलात्कारानंतर या मुलीला बिलासपूर शहरातील बाजारपेठेजवळ फेकून देण्यात आले होते. (१३.८.२०१३)

विवाहित असूनही तरुणीवर बलात्कार करणारा वासनांध तरुण हिंदु समाजात निपजतो, हे दुर्दैवी !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोंदा येथील तुषार परब याचे पेडणे, गोवा तसेच अन्यत्र दुकान आहे. आरोंदा येथील युवती गेल्या दीड वर्षापासून त्याच्याकडे कामाला होती. प्रत्येक सोमवार आणि गुरुवार हे दोन दिवस ती मुलगी पेडणे, गोवा येथील दुकानात कामाला जात असे, तर उर्वरीत दिवशी आरोंदा येथील दुकानात काम करत असे. परब हा विवाहित असून या युवतीशी त्याने जवळीक साधली. माझ्यासमवेत लग्न केले नाहीस, तर अश्‍लील छायाचित्रे प्रसिद्ध करीन, अशी धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. (२१.९.२०१४)

बलात्कार रोखण्यासाठी आम्ही काहीतरी करत आहोत, असे दाखवण्याचा आप शासनाचा खटाटोप !

अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्‍या नराधमांना फाशी अथवा जन्मठेपेची शिक्षा देण्यासाठी आणि अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍या बालगुन्हेगारांची वयोमर्यादा न्यून करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात सुधारणा करता येईल का, याचा अभ्यास करण्यासाठी देहलीच्या आप पक्षाच्या शासनाने एका मंत्रीगटाची स्थापना केली. (२१.१०.२०१५)

उत्तरप्रदेशचे इस्लामीस्तान झाल्यामुळेच तेथे धर्मांध हिंदु मुलीची छेड काढून कपडे फाडतात आणि त्याविषयी खडसवणार्‍या मुलीच्या आई-वडिलांना मारहाण करतात !

मैनपुरी, उत्तरप्रदेश येथील मंदिरात देवपूजा करण्यासाठी जाणार्‍या एका हिंदु युवतीची धर्मांध मुसलमानांनी छेड काढून कपडे फाडले. या प्रकरणी पोलिसांनी निसार, जल्लाद आणि त्यांच्या सहकार्‍यांना अटक केली आहे. युवतीने घरी येऊन पालकांना झालेला प्रकार सांगितल्यावर तिचे आई-वडील त्या धर्मांधांना खडसवण्यासाठी गेले. तेव्हा त्या धर्मांधांनी युवतीच्या वडिलांना, तसेच निसारच्या पत्नीने युवतीच्या आईस मारहाण केली. (४.९.२०१४)

सात वर्षीय मुलीवर बलात्कार करणारा नराधम !

राजस्थानमध्ये अलवर येथे लग्नाच्या वरातीसमवेत आलेल्या एका सात वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मातूकी गावात घडली आहे. मुलीवर बलात्कार करून तिला सीकरी येथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात फेकून देण्यात आले होते. (१५.५.२०१३)

बलात्कार पीडित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न करणारा पोलीस अधिकारी जनतेचा रक्षक नव्हे, तर भक्षक !

दक्षिण भारतातील पीडित महिला देहली येथील मुखर्जीनगरमध्ये राहून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची सिद्धता करत असतांना एका खाजगी आस्थापनेत नोकरीही करत होती. या आस्थापनातील तीन कर्मचार्‍यांनी तिला कामाच्या बहाण्याने आग्रा येथे नेले. तेथे दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेच्या अनुषंगाने पीडितेने पोलीस अधिकार्‍याशी संपर्क केला; मात्र त्यानेच महिलेला अमली पदार्थ पाजून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. (१७.९.२०१४)

ख्रिस्ती संघटनेच्या अनाथालयात हिंदु मुलीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण दाबणारे पोलीस !

इंग्लंडमधील लाईट हाऊस मिनिस्ट्री या ख्रिस्ती संस्थेकडून समाजसेवेच्या नावाने गोव्यात चालवण्यात येणार्‍या अनाथालयातील (प्रत्यक्षात हे अनाथालय नसून गरीब कुटुंबातील हिंदु मुलांना धर्मांतरित करण्याचे केंद्र आहे.) एका गरीब हिंदु कुटुंबातील १५ वर्षीय मुलीवर तेथील विवाहित कर्मचार्‍याने बलात्कार केला; मात्र पोलिसांनी हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला आणि या प्रकरणाची चौकशी योग्य प्रकारे केली नाही. आरोपी लगेचच जामिनावर सुटला. घरातून स्वत:च्या मर्जीने आरोपीसमवेत पळाले होते, अशी अल्पवयीन पीडित मुलीची असत्य जबानी अनाथालय व्यवस्थापनाला आणि आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांनी लिहून घेतली. ११ वी इयत्तेत शिकणारी ही पीडित मुलगी १० आठवड्यांची गरोदर आहे, असे या वेळी लक्षात आले. (४.९.२०१४)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात