‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाला विरोध करणार्‍यांना पुढील प्रश्न विचारा !

भारतात ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होऊ देण्यास विरोध करणार्‍यांना ठणकावून विचारा की, तुम्हाला निष्पापांचे गळे चिरणारे, महिलांवर सामूहिक बलात्कार करणारे, तसेच महिलांना विक्रीची वस्तू ठरवणारे आसुरी ‘इस्लामी स्टेट’ हवे आहे कि पृथ्वीला ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ म्हणजे ‘संपूर्ण पृथ्वीला एक कुटुंब’ समजणार्‍या आणि ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।’ म्हणजे ‘या जगातील सर्वच जण सुखी आणि निरोगी होवोत’, अशी करणार्‍या हिंदूंचे ‘हिंदु स्टेट’ म्हणजेच ‘हिंदु राष्ट्र’ हवे आहे ?

अ. ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करून सर्व जातीपंथांचे परमकल्याण साधता येते, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्ध केले आहे. असे परिवर्तन ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्यासाठी होणार असेल, तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही !

आ. पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी १९९९ मध्ये भारताच्या दौर्‍यात केलेले ‘संपूर्ण भारत ख्रिस्तमय करायचा आहे’, हे वक्तव्य आजपर्यंत कोणीच घटनाबाह्य का ठरवले नाही ?

इ. अत्यंत पुढारलेला आणि लोकशाही देश असूनही इंग्लंड एक ‘ख्रिस्ती’ राष्ट्र आहे; मग ८० टक्के हिंदु धर्मीय असलेला भारत ‘हिंदु राष्ट्र’
का नाही ?

ई. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या राज्यघटनेत ‘इस्लामिक रिपब्लिक’ असे लिहिले आहे; मग भारत हा ‘हिंदु का असू नये ? इस्लामी
राष्ट्रात हिंदू राहू शकतात; मग ‘हिंदु राष्ट्रात मुसलमान आणि ख्रिस्ती लोक राहू शकत नाहीत’, असे कधी होऊ शकेल का ?

उ. स्वातंत्र्याच्या वेळी भारतात रहाणार्‍या तत्कालीन मुसलमानांनी स्वतःसाठी धर्मावर आधारित पाकिस्तान हे इस्लामिक राष्ट्र मागितले होते. त्यानुसार उर्वरित हिंदूंचा भारत ‘हिंदु राष्ट्र’च व्हायला हवे होते. हिंदूंनी हिंदु राष्ट्राची नैसर्गिक मागणी करणे, हा गुन्हा कसा असू शकेल ?

ऊ. उद्या ‘आयएस्आयएस्’च्या आतंकवाद्यांनी भारतावर आक्रमण करून त्याला ‘इस्लामिक राष्ट्र’ घोषित केले, तर हिंदू आश्रयासाठी जाणार कुठे ? जगात हिंदूंचा एकही देश नाही !’

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा