हिंदूंच्या इस्लामीकरणासाठी वापरण्यात येणारे डावपेच

सारणी


 

 

खिस्ती प्रचारकांप्रमाणे इस्लामी धर्मप्रचारकही हिंदूंच्या धर्मांतरासाठी विविध डावपेच आखतात. या डावपेचांची उदाहरणे, प्रसंग वा अनुभव पुढे दिले आहेत.

१. सर्वसाधारण डावपेच

अ. इस्लामविषयक पुस्तके विनाशुल्क वितरित करणे

मुसलमानांच्या ‘दारूर कुराण अल् सुदना’ या समुहाने कुराण अन् इस्लामी तत्त्वज्ञान यांचा प्रसार करणारी पुस्तके मराठी, गुजराती, हिंदी अन् इंग्रजी या भाषांमध्ये भाषांतरित करून मुंबईतील रेल्वेस्थानकांवर हिंदूंसाठी विनामूल्य उपलब्ध केली आहेत.

आ. डॉ. झाकीर नाईक आणि डॉ. शोएब सय्यद यांचे कार्यक्रम

‘इस्लाम अँड कंपॅरिटिव्ह रिलीजन’ या संस्थेचे डॉ. झाकीर नाईक आणि डॉ. शोएब सय्यद हे इस्लाम अन् हिंदु धर्म यांतील साम्यस्थळे दाखवण्याचे कार्यक्रम आयोजित करतात. त्यांच्या भाषणांतील काही सूत्रे पुढे दिली आहेत.

  • १. डॉ. नाईक यांनी ‘प्रभु श्रीराम हे मांसाहारी होते’, असा जावईशोध लावला. त्यासाठी त्यांनी अयोध्याकांडाच्या २० व्या, २६ व्या आणि ९४ व्या अध्यायांचा विपर्यास केला. स्वामी अभयानंद यांनी या विषयाचे शास्त्रशुद्ध खंडण केले.
  • २. ‘गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहादच सांगितला आहे’, असे सांगितले जाते.

र्इ. हिंदूंच्या धर्मगुरूंचे रूप घेऊन हिंदूंना इस्लाममध्ये धर्मांतर करण्यास उद्युक्त करणे

‘यू ट्यूब’ या संकेतस्थळावरील दोन खोटे शंकराचार्य असलेल्या चित्रफितीद्वारे इस्लामचा प्रसार करण्यात येतो. या दोघांपैकी एक जण
‘इस्लामची तत्त्वे कशी खरी आहेत’, हे आग्रहाने पटवून देतो, तर दुसरा ‘मी इस्लाम धर्मात का प्रवेश केला’, याचे स्पष्टीकरण देतो.’

२. प्रलोभने दाखवणे

१९८१ मध्ये हैद्राबाद येथे भरलेल्या ‘अखिल भारतीय जमात-ए-इस्लामी’च्या सहाव्या अधिवेशनात येत्या दशकात भारतातील मुसलमानांची संख्या २० कोटींवर नेण्यासाठी दलितांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्याचे उद्दिष्ट घोषित करण्यात आले. ‘यासाठी अरब देशांतून हवा तेवढा पैसा मिळेल’, असे आश्वासन या परिषदेत देण्यात आले.

अ. हिंदूंचे आमिषे, तसेच बळ यांद्वारे धर्मांतर केले जात असल्याचे उदाहरण

संभाजीनगरमधील सिल्लोड येथील पोलीस ठाण्यात बाळू सांडू मैद यांनी त्यांच्या दोन भावांचे मुसलमानांनी प्रारंभी आमिषे दाखवून आणि नंतर धमकी देऊन धर्मांतर केले, अशी तक्रार दाखल केली.

आ. मीनाक्षीपूरम आणि कुरायूर येथे प्रलोभन दाखवून शेकडो हिंदूंचे करण्यात आलेले धर्मांतर !

वर्ष १९८१ मध्ये इस्लामी संघटनांनी दिलेल्या प्रलोभनांमुळे मीनाक्षीपूरम येथील, तसेच मदुरा (तामिळनाडू) येथून ४० कि.मी. अंतरावरील कुरायूर गावातील शेकडो दलित हिंदूंनी इस्लाम धर्म स्वीकारला होता.

३. ‘लव्ह जिहाद’

अ. मुसलमानांनी हिंदु तरुणी अन् महिला यांना लक्ष्य करणे

हिंदु मुली अन् हिंदु विवाहित स्त्रिया यांना प्रेमात फसवून त्यांचे इस्लामीकरण करण्याचे ‘लव्ह जिहाद’, हे कारस्थान गेल्या १५ वर्षांपासून देशभरात सर्वत्र पद्धतशीरपणे चालू आहे.

आ. मुसलमान तरुणींनी हिंदु युवकांना लक्ष्य करणे

‘मुसलमान तरुणी हिंदु तरुणांचे धर्मांतर करण्यासाठी त्यांच्या प्रेमात पडल्याचे दाखवतात. प्रेमात अडकलेल्या तरुणाला विवाहानंतर इस्लाम धर्म स्वीकारण्याचा आग्रह या तरुणी अथवा त्यांचे कुटुंबीय धरतात.

४. वशीकरण करणे

मुसलमान वशीकरण विद्येचा वापर करून हिंदु मुलींचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवून आणत आहेत.

(टीप : मंत्र, यंत्र, भस्म आणि विविध प्रकारची औषधी द्रव्ये यांच्या साहाय्याने एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला वश किंवा मोहित करू शकणे आणि तिच्याकडून हवे ते करवून घेऊ शकणे, या तंत्रविद्येला ‘वशीकरण’ असे म्हणतात.)

अ. मुसलमान मांत्रिकाकडून वशीकरणाद्वारे हिंदु युवतीचे धर्मांतर आणि तिच्या कुटुंबियांकडून तिची सुटका

‘रत्नागिरी जिल्ह्यातील एका गावात एका हिंदु कुटुंबातील २२ वर्षीय युवतीला डोक्यात मुंग्या येणे, खांदा अन् मान दुखणे, असे त्रास वारंवार होऊ लागले. वैद्यकीय चाचण्यांमध्ये तिला कोणताही विकार झाल्याचे न आढळल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी गावठी औषधे देणार्‍या एका मुसलमान मांत्रिकाकडे (वय ५० ते ५५ वर्षे) तिला उपचारार्थ नेले. त्या मांत्रिकाने तिला उर्दू भाषेतील काही मंत्र मराठीत लिहून दिले अन् ते प्रतिदिन म्हणण्यास सांगितले, तसेच घरात नमाज पढण्यासही सांगितले. त्याप्रमाणे ती कृती करू लागली. या उपचारांमुळे आजार दूर होत असल्याचे तिला वाटू लागले. या काळात त्या मांत्रिकाने तिला कर्नाटक राज्यातील करोशी येथील एका दर्ग्यात एक-दोन वेळा नेले. पुढे या मांत्रिकाने त्या मुलीला गळ्यात घालण्यास एक ताईत, तसेच पिशवीत ठेवण्यासाठी सोनचाफ्याची दोन फुले लाल दोरा गुंडाळून दिली. या वस्तू स्वतःजवळ बाळगल्यावर तिच्या मनात ‘घरात राहू नये. आई-वडील अन् भाऊ यांचे तोंडही पाहू नये’, असे विचार येऊ लागले अन् एके दिवशी ती त्या मांत्रिकासह पळून गेली. जातांना घरी ठेवलेल्या चिठ्ठीत तिने ‘मी करोशीला दर्ग्यात जात आहे. माझा आजार दूर करण्याचा तोच एक उपाय आहे’, असे लिहिले होते. त्या मांत्रिकाने मुलीला मुसलमान वकिलाकडे नेऊन तिने मुसलमान धर्म स्वीकारल्याचे प्रतिज्ञापत्र बनवून घेतले. अशा प्रकारे ती हिंदु युवती त्या मांत्रिकाच्या जाळ्यात पूर्णपणे फसली.

पुढे तिच्या कुटुंबियांनी संघटित हिंदूंच्या साहाय्याने संघर्ष करून तिला तेथून घरी आणले. या युवतीची पत्रिका ज्योतिषाला दाखवल्यानंतर त्याने तिच्यावर वशीकरण केले असल्याचे सांगितले. वशीकरण उतरवण्याचा विधी केल्यानंतर ती युवती भानावर आली. तिने गळ्यातील ताईत अन् सोनचाफ्याच्या फुलांची पुडी काढली. उर्दू मंत्रांच्या वह्या तिने टाकून दिल्या. ‘मी कशी गेले, कुठे गेले, हेच मला कळले नाही. ईश्वरी कृपेने मी एका भयानक प्रसंगातून बाहेर पडले’, असे ती आता सांगत आहे.’ – श्री. संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती, रत्नागिरी. (२०११)

५. गुन्हेगारी वृत्तीच्या हिंदूंचे कारागृहात होणारे धर्मांतर !

‘कारागृहातील हिंदूंच्या धर्मांतराचे षड्यंत्र गेल्या शतकापासून अव्याहत चालू आहे. मुंबईतील आर्थर रोड कारागृहात विविध आमिषे दाखवून हिंदु बंदीवानांना धर्मांतराच्या जाळ्यात ओढायचे आणि कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्यांची पाठवणी मदरशांमध्ये करून त्यांना ‘जिहाद’चे धडे द्यायचे, असा प्रकार चालू आहे. वर्ष २००६ मध्ये तेथे अनुमाने २० ते २५ हिंदु बंदीवानांनी इस्लाम धर्म स्वीकारला.’ (दैनिक ‘सामना’ (३०.७.२००६)

अ. कारागृहांतील धर्मांतर संघटितपणे रोखणे आवश्यक !

अंदमानमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदूंचे धाकदपटशाने इस्लाम धर्मात केले जाणारे धर्मांतर रोखले होते. आताही कारागृहांतील  धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हायला हवे.

६. बळाचा वापर

अ. हिंदूचे बळाने धर्मांतर करून नंतर त्याला ठार मारणे

‘कर्नाटकातील दावणगेरे येथील चंद्रशेखर याचे मुसलमान तरुणीवर प्रेम होते. जुलै २०११ मध्ये तिच्याशी लग्न करू देण्यासाठी सलमानांनी चंद्रशेखर याला मुसलमान होण्याची अट घातली. चंद्रशेखरने ती मान्य करत धर्मांतर केले. तसे त्याने मुद्रांकावर (स्टँपपेपरवर) लिहूनही दिले. त्यानंतरही त्यांनी त्याचे त्या तरुणीशी लग्न होऊ दिले नाही आणि त्याला मारहाण करून विष पाजून मारून टाकले.’

७. धर्मांतर घडवण्यासाठी आतंकवाद्यांचे साहाय्य घेणे

‘हिंदूंनी मुसलमानांना पाकिस्तान देऊनही मुसलमानांचे समाधान झालेले नाही. त्यांना संपूर्ण भारताचे इस्लामीकरण करावयाचे आहे. त्यासाठी त्यांनी आतंकवादाचा आश्रय घेतला आहे.’ – श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.

अ. काश्मीरमध्ये हिंदूंचे करण्यात येत असलेले बलपूर्वक धर्मांतर !

जम्मू-काश्मीरमध्ये १९८९-९० मध्ये जिहादी आतंकवादाने परिसीमा गाठली. १९.१.१९९० या दिवशी रात्री १० वाजता काश्मीर खोर्‍यातील अनेक मशिदींतून आतंकवाद्यांनी काश्मिरी हिंदूंना ‘धर्मांतर करा अन्यथा काश्मीर सोडा किंवा मृत्यू पत्करा’, अशी धमकी दिली. त्यामुळे ४ लक्ष हिंदूंनी त्यांची मातृभूमी, शेतीवाडी, घरदार इत्यादींवर पाणी सोडून काश्मीर सोडले. जे हिंदू काश्मीरमधून परगंदा झाले नाहीत, त्यांचे एक तर बळाने धर्मांतर करण्यात आले किंवा त्यांना ठार मारण्यात आले. आजही तेथे हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्याच्या घटना घडत आहेत.

संदर्भ : ‘हिंदू जनजागृती समिती’ पुरस्कृत ग्रंथ ‘धर्मांतराच्या डावपेचांपासून सावधान !