हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या अहिंदूंना राेखण्याचे वैध मार्ग

धर्मांतर ही समाजविरोधी, राष्ट्रविरोधी अन् धर्मविरोधी गोष्ट असून त्याला सर्वत्रच्या हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने विरोध  करायला हवा. हा विरोध पुढील प्रकारे करता येईल

१. अहिंदू प्रचारकांच्या डावपेचांना बळी पडत असलेल्या हिंदूंना सतर्क करा !

२. अहिंदू प्रचारकांचे हिंदूंच्या धर्मांतराचे विविध डाव संघटितपणे हाणून पाडा !

३. आपल्या भागात अहिंदू धर्मप्रसारक आल्याची चाहूल लागताच त्यांच्या धर्मांतरविषयक हालचालींवर संघटितपणे लक्ष ठेवा. त्यांच्याकडून हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्यास त्यांना संघटितपणे खडसावा !

४. हिंदु धर्मावर टीका करणार्‍या, खोटे चमत्कार करणार्‍या, तसेच छळ, कपट, प्रलोभन इत्यादींद्वारे हिंदूंचे धर्मांतर करणार्‍यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवा !

५. हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या उद्देशाने अहिंदूंकडून ‘प्रार्थना सभा’, ‘आशीर्वाद सभा’, ‘इस्लाम परिचय’ इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी केले जाते. अशा कार्यक्रमांतून धर्मांतर होण्याची शक्यता असल्यास त्याविषयी पोलिसांत गार्‍हाणे नोंदवणे, वैध मार्गाने आंदोलन करणे आदी माध्यमांतून विरोध करा !

६. धर्मांतराचा वेग जास्त असलेले भौगोलिक क्षेत्र, तसेच जाती निश्चित करा. अशा क्षेत्रात धर्मजागृतीसाठी पूर्णकालीन वा अंशकालीन कार्यकर्ते म्हणून जा !

७. खिस्ती संघटनांचे सेवाकार्य, शाळा, रुग्णालये इत्यादींना देणग्या देऊ नका !

८. आपल्या भागातील लोकप्रतिनिधी आणि मंत्री यांना संघटितपणे निवेदने देऊन ‘धर्मांतरबंदी दंडविधान (कायदा)’ करण्याची आग्रही मागणी करा अन् तिचा पाठपुरावाही करा !

संविधानातील २५ वा अनुच्छेद आणि धर्मांतर

१. संविधानातील २५ वा अनुच्छेद

याचे नाव ‘Freedom of conscience and free profession, practice and propagation of religion’ म्हणजे ‘सद्सद्विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण अन् प्रचार’, असे आहे.

2. कोणत्याही देशाच्या संविधानात नसलेला आणि खिस्त्यांना अनुकूल ठरणारा ‘प्रपोगेट’ (प्रचार करण्याचा) अधिकार भारताच्या संविधानानुसार असणे

‘संविधान लिहितांना धर्मस्वातंत्र्यविषयक अनुच्छेदात ‘प्रपोगेट’ (प्रचार) हा शब्द घुसडण्यात आला. संविधान समितीतील सभासद आणि
नामांकित कायदेतज्ञ श्री. कन्हैय्यालाल मुन्शी यांनी संविधान मसुदा समितीच्या वतीने बोलतांना प्रतिपादन केले होते, ‘धर्मस्वातंत्र्यात प्रचाराच्या अधिकाराच्या समावेशासाठी खिस्ती समुदाय आग्रही होता. ‘धर्मप्रचार हा खिस्ती धर्माचरणाचा प्रमुख भाग आहे’, असे खिस्ती समुदायाचे म्हणणे होते.’ नामांकित कायदेपंडित अलादीकृष्ण अय्यर यांनीही या संदर्भात स्पष्ट केले होते की, धर्मप्रचाराच्या अधिकाराविषयी अल्पजन समुदाय अत्यंत आक्रमक होता. कोणत्याही देशाच्या संविधानात ‘धर्मस्वातंत्र्याचा अधिकार असलेल्यांना
‘प्रपोगेट’ म्हणजे ‘प्रचार करणे’, हा अधिकार आहे’, असे नमूद केलेले नाही.

३. ‘प्रपोगेट’ शब्दाचा अयोग्य अर्थ काढून ‘धर्मांतर करणे, हा घटनादत्त अधिकार आहे’, असा युक्तीवाद करणारे खिस्ती !

डॉ. दुर्गादास बसू यांच्या ‘दी कॉन्स्टीट्यूशन ऑफ इंडिया’ या पुस्तकात पृष्ठ ११७ वर ‘ऑपरेशन’ (प्रचार) आणि ‘कन्व्हर्जन’ (धर्मांतर) यांसंबंधी विचार मांडले आहेत. ते म्हणतात, ‘खिस्ती नेते असा युक्तीवाद करतात की, संविधानातील ‘प्रपोगेट’ (प्रचार) या शब्दान्वये त्यांना कोणत्याही मार्गाने अन्य जनांचे धर्मांतर करण्याचा अनिर्बंध घटनात्मक अधिकार आहे; पण हे गृहितक पूर्णपणे चुकीचे आहे.’
– प्रा. स.म. गोलवलकर

४. ‘घटनेतील अनुच्छेद २५ (१) प्रमाणे धर्मस्वातंत्र्य म्हणजे दुसर्‍याचे धर्मांतर करणे, असे होत नाही’, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल !

‘१९९७ मध्ये मध्यप्रदेश शासनाने धर्मांतरविरोधी कायदा आणला. त्याच्या विरोधात रेव्ह. स्टेनिस्लॉस सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायमूर्ती ए.एन्. राय यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय पिठाने एकमताने निर्णय देतांना म्हटले, ‘कलम २५ (१) सर्व नागरिकांना आपापल्या सद्सद्विवेकाने वागण्याचे स्वातंत्र्य देते. कलम २५ (१) मध्ये कोठेही कोणालाही त्याच्या स्वतःच्या
धर्मातून दुसर्‍या धर्मात नेण्याचे स्वातंत्र्य नाही. धर्मस्वातंत्र्य हे केवळ स्वधर्माच्याच संदर्भात नसून ते दुसर्‍याच्या धर्माच्या संदर्भातही लागू होते; म्हणूनच ‘या अनुच्छेनान्वये दुसर्‍याला आपल्या धर्मात आणण्याचा (त्याचे धर्मांतर करण्याचा) मूलभूत अधिकार आपल्याला देण्यात आला आहे’, असा अपसमज कोणीही करून घेऊ नये. याव्यतिरिक्त ‘धर्मप्रसाराचे स्वातंत्र्य म्हणजे अन्य व्यक्तीला आपल्या धर्मात खेचून आणण्याचे स्वातंत्र्य आहे’, असाही याचा अर्थ होऊ शकत नाही.’

‘प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छेने धर्मांतर करू शकते; पण तिच्यावर मानसिक दडपण आणून वा तिचा विश्वासघात करून तिचे धर्मांतर करणे, हे अवैध ठरेल. धर्मांतरास अनियंत्रित स्वरूपात मुभा दिली, तर प्रत्येक धर्म त्याच्या प्रचाराची चळवळ चालू करील आणि सर्व आक्षेपार्ह मार्र्गांनी धर्मांतर घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहील. अशा अनिष्ट प्रथांना प्रतिबंध करून अशा कृत्यांत सहभागी झालेल्या व्यक्तींना शिक्षा करण्याचा राज्यशासनास पूर्ण अधिकार असेल, असे न्यायालयाने या वेळी म्हटले होते.’

संदर्भ : ‘हिंदू जनजागृती समिती’ पुरस्कृत ग्रंथ ‘धर्मांतर अन् धर्मांतरितांचे शुद्धीकरण’ एवं ‘धर्मांतराच्या डावपेचांपासून सावधान !


कायदेशीर साहाय्य

हिंदु फ्रन्ट फाॅर जस्टीस

पत्ता : ५ पार्क राेड (सिवील हाॅस्पिटल समाेर) लखनऊ

चेंबर क्र. : १२७ सर्वाेच्च न्यायालय

भ्रमणभाष क्र. : ९३३५९०७५६५, ८८२६९५७५६५

इमेल : [email protected]

            harishankarjain@gmail,com