गेल्या अनेक शतकांपासून भारतात सुरू असलेल्या धर्मांतरणाची प्रमुख कारणे

सारणी


 

हिंदुस्थान आणि हिंदु धर्म यांवर काही शतकांपासून होत असलेले परधर्मियांचे धार्मिक आक्रमण म्हणजे धर्मांतराची समस्या आहे. इतिहासात अरबांपासून इंग्रजांपर्यंत अनेक परकियांनी हिंदुस्थानवर आक्रमणे केली. साम्राज्यविस्तारासह स्वधर्माचा प्रसार, हाच या सर्व आक्रमणांचा गाभा होता. हिंदुस्थानातील धर्मांतराचा इतिहास आणि हिंदूंचे धर्मांतर करण्यामागील अहिंदूंचा उद्देश हे या लेखात विशद केले आहे.

१. अर्थ आणि समानार्थी शब्द

अ. अर्थ : एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म दीक्षापूर्वक स्वीकारणे, याला धर्मांतर असे म्हणतात. केवळ परधर्माचा अभ्यास, मिश्र विवाह किंवा मद्यमांससेवन यांमुळे धर्मांतर होत नाही. प्रत्यक्षात मात्र ‘विविध आमिषे वा भीती दाखवून परधर्म स्वीकारण्यास
उद्युक्त करणे, म्हणजे धर्मांतर करणे’, असे आज म्हटले जाते.

आ. समानार्थी शब्द : धर्मपरिवर्तन, बाटणे, मतांतर

२. धर्मांतराचे सर्वसाधारण प्रकार

धर्मांतराचे सर्वसाधारण प्रकार पुढीलप्रमाणे आहेत –

अ. बुद्धीपूर्वक परधर्म स्वीकारणे

आ. धनादिकांच्या लोभाने तसे करणे

इ. अत्याचार अन् बलप्रयोग यांमुळे स्वतःच्या इच्छेविरुद्ध बाटवले जाणे

३. हिंदुस्थानातील धर्मांतराचा इतिहास

अ. इस्लामी आक्रमणापूर्वीचा काळ

खिस्ती धर्माच्या स्थापनेनंतर पहिल्याच शतकात (वर्ष ५२ मध्ये) सेंट थॉमस हा खिस्ती धर्मोपदेशक हिंदुस्थानातील केरळ प्रांतात आला आणि त्याने तेथे खिस्ती धर्माचा प्रसार चालू केला.

आ. इस्लामी राजवटीचा काळ

या काळात हिंदूंचे सर्वाधिक प्रमाणात धर्मांतर झाले. काश्मीर, पंजाब, उत्तरप्रदेश आणि दिल्ली या राज्यांसह त्या काळात हिंदुस्थानात असलेल्या अन् नंतर स्वतंत्र देश झालेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, कंबोडिया आणि ब्रह्मदेश येथील हिंदूंना धर्मांतराचा सर्वाधिक फटका बसला. या काळात धर्मांतरासाठी पुढाकार घेणार्‍या काहींची नावे अन् दुष्कृत्ये पुढे दिली आहेत.

 • महंमद कासीम : ‘वर्ष ७१२ मध्ये हिंदुस्थानावर आक्रमण करणार्‍या या पहिल्या इस्लामी आक्रमकाची कारकीर्द म्हणजे सिंधच्या इतिहासातील काळाकुट्ट काळ, असे वर्णन यु.टी. ठाकूर या इतिहासकाराने केले आहे. या काळात सिंधमध्ये बलपूर्वक धर्मांतर, देवळांचा विध्वंस, गोहत्या आणि हिंदूंचा वंशविच्छेद यांनी परिसीमा गाठली. ‘सिंध प्रांतातील हिंदूंचे धर्मांतर बळानेच करण्यात आले’, असे सर्व प्राचीन आणि आधुनिक इतिहासकारांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
 • औरंगजेब : याने दिल्लीचा सत्ताधीश झाल्यावर हिंदूंना बाटवून त्यांना इस्लामची दीक्षा देण्याचे राजकीय धोरण आखले आणि त्यानुसार लाखो हिंदूंचे धर्मांतर केले. त्याने शिवछत्रपतींच्या नेताजी पालकर, जानोजीराजे पालकर आदी सरदारांना बाटवले. छत्रपती संभाजी महाराजांचेही इस्लामीकरण करण्याचा त्याने अखेरपर्यंत प्रयत्न केला; पण शंभुराजांच्या प्रखर धर्माभिमानामुळे तो निष्फळ ठरला. स्वातंत्र्यवीर सावरकर लिहितात, ‘औरंगजेबाने हिंदूंना शक्य ते उपाय योजून बाटवण्याचा प्रयत्न केला.’ त्याच्या राजवटीत प्रतिदिन किती हिंदूंचे धर्मांतर केले गेले, याची दिनांकवार नोंद ‘मा-असीर-ई-आलमगिरी’ या औरंगजेबकालीन बखरीत असून ती बंगालच्या ‘रॉयल एशिअ‍ॅटिक सोसायटी’ने प्रकाशित केली आहे.
 • टिपू सुलतान : ‘या दक्षिणेतील सुलतानाने सत्ता हाती येताच ‘सर्व काफिरांना (हिंदूंना) मुसलमान करीन’, अशी प्रतिज्ञा भर सभेत केली. त्याने गावोगावच्या मुसलमानांना लेखी कळवले, ‘सार्‍या हिंदु स्त्री-पुरुषांना इस्लामची दीक्षा द्या. स्वेच्छेने धर्मांतर न करणार्‍या हिंदूंना बलात्काराने मुसलमान करा किंवा हिंदु पुरुषांना ठार मारा अन् त्यांच्या स्त्रियांना मुसलमानांमध्ये वाटून टाका.’ पुढे टिपूने मलबार भागातील एक लक्ष हिंदूंना बाटवले. कर्नाटक स्वारीत त्याने एका दिवसाच्या आत ५० सहदाा हिंदू बाटवले. त्याने हिंदूंच्या धर्मांतरासाठी काही कडव्या मुसलमानांची विशेष टोळी उभारली. आक्रमक इस्लामी प्रचार केल्यामुळे त्याला ‘सुलतान’, ‘गाझी’, ‘इस्लामचा कर्मवीर’ इत्यादी उपाध्या देश-विदेशांतील मुसलमान आणि तुर्कस्थानचा खलिफा यांच्याकडून मिळाल्या.’ – जयेश मेस्त्री, मालाड, मुंबई.
 • सुफी फकीर : ‘या हिंदु साधूंप्रमाणे वागणार्‍या काही कथित मुसलमान संतांनी हिंदूंचे प्रचंड प्रमाणात धर्मांतर घडवले. ‘हिस्टरी ऑफ सुफीझम इन इंडिया’ या पुस्तकाच्या दोन खंडांत त्याची माहिती आहे.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
 • हैद्राबादचा निजाम : ‘याच्या अन्याय्य राजवटीत रझाकारी सैन्याने सहदााो हिंदूंची सुंता केली. धर्मांतरास नकार देणार्‍या असंख्य हिंदूंची हत्या करण्यात आली. ‘मारून-मुटकून मुसलमान करणे’, हा वाक्प्रचार येथील हिंदूंनी प्रत्यक्ष अनुभवला.’ – पत्रिका ‘हिंदूंनो, वाचा आणि थंड बसा’ (९.८.२००४)

इ. पोर्तुगिजांची राजवट

 • १. हिंदुस्थानात वास्को-द-गामाच्या पाठोपाठ खिस्ती मिशनरी येणे आणि त्यांनी छळ, बळ अन् कपट यांद्वारे हिंदूंचे धर्मांतर घडवणे ‘१४९८ मध्ये वास्को द गामाच्या नेतृत्वाखाली पोर्तुगिजांनी हिंदुस्थानात पाय ठेवले आणि खिस्त्यांच्या साम्राज्यवादी धर्ममताचा राजकीय प्रवास चालू झाला. वास्को द गामाच्या पाठोपाठ खिस्ती धर्मप्रसार करणारे मिशनरी आले. त्यानंतर ‘व्यापारी दृष्टीकोनातून राज्यविस्तार’ या तत्त्वापेक्षा ‘खिस्ती धर्मप्रसार’ हाच पोर्तुगिजांचा प्रमुख हेतू झाला. त्यातून बाटवाबाटवी चालू झाली. खिस्ती मिशनरी रात्रीच्या वेळी घरामागील विहिरीत पाव टाकत आणि सकाळी लोक ते पाणी प्यायले की, ‘तुम्ही खिस्ती झालात’, असे त्यांना सांगत. घाबरलेले हिंदू ‘आपण फसलो’, असे ओळखून खिस्ती धर्माप्रमाणे वागू लागत. १५४२ मध्ये पोर्तुगालच्या किंग जॉन दुसरा याने हिंदूंच्या खिस्तीकरणासाठी सेंट झेवियर या मिशनर्‍याला पाठवले. त्याच्या आगमनानंतर गोव्यात हिंदूंनी धर्मांतर करावे, यासाठी त्यांच्यावर खिस्ती मिशनर्‍यांनी अनन्वित अत्याचार केले.
 • सेंट झेवियरची धर्मांतराची रीत ! : सेंट झेवियर हा स्वतःची धर्मांतराची रीत सांगतांना लिहितो, ‘एका मासात मी त्रावणकोर राज्यात १० सहदााांहून अधिक पुरुष, स्त्रिया आणि मुले यांना बाटवून त्यांची नावे पोर्तुगीज केली. बाप्तिस्मा दिल्यावर या नवखिस्त्यांना मी त्यांचे देव आणि देवघर नष्ट करण्याचा आदेश दिला. अशा रीतीने मी एका गावाहून दुसर्‍या गावी जात लोकांना खिस्ती बनवले.’ – श्री. विराग श्रीकृष्ण पाचपोर
  असा अत्याचारी हिंदुद्वेष्टा झेवियर अर्थातच खिस्त्यांच्या संतपदी विराजमान आहे आणि दुर्दैवाने ज्यांच्या पूर्वजांवर त्याने अनन्वित अत्याचार केले, ते गोव्यातील धर्माभिमानशून्य हिंदू त्याच्या थडग्याच्या दर्शनासाठी रांगा लावतात. त्याच्या नावाने असलेल्या शाळा-महाविद्यालयांत शिकणे काहींना अभिमानाचे वाटते.
 • पोर्तुगिजांनी हिंदूंच्या धर्मांतरासाठी केलेल्या अत्याचारांचे प्रातिनिधिक उदाहरण : ‘१५६० मध्ये पोपच्या आदेशावरून खिस्ती साम्राज्य वाढवण्याच्या हेतूने पोर्तुगीज सेना गोवा येथे पोहोचली. तिने धर्मांतर न करणार्‍या हिंदूंवर अनन्वित अत्याचार करत सहदााो हिंदूंना ठार मारले. धर्मांतर न करणार्‍या हिंदूंना एका रांगेत उभे करून त्यांचे दात हातोडीने तोडणे, हे हिंदूंवर त्या वेळी झालेल्या अत्याचारांचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.’ – साप्ताहिक ‘संस्कृति जागृति’ (४ ते ११ जुलै २००४)
 • छत्रपती शिवाजी महाराजांनी बार्देश (गोवा) भागाच्या खिस्तीकरणाचे षड्यंत्र उदाळणे : आदिलशहाकडून गोव्यातील बार्देश प्रांत मिळवल्यानंतर पोर्तुगिजांनी तेथील हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केले. या धर्मांतरास नकार देणार्‍या ३ सहदाा हिंदूंना ‘आजपासून दोन मासांत धर्मांतर करा अन्यथा अन्यत्र जा’, असा आदेश पोर्तुगालच्या गोव्यातील व्हॉईसरॉयने काढला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर हे वृत्त पडताच त्यांनी व्हॉईसरॉयच्या आदेशावर कार्यवाही होण्यास दोन दिवस शिल्लक असतांना २० नोव्हेंबर १६६७ या दिवशी बार्देश भागावर स्वारी केली आणि या आदेशाला तलवारीने उत्तर दिले. महाराजांनी अनेक पोर्तुगिजांना पकडले, तसेच धर्मांतर करणार्‍या ४ पाद्र्यांना हिंदु धर्म स्वीकारण्यास सांगितले. त्यांनी त्यास नकार दिल्यावर शिवछत्रपतींनी त्यांची मुंडकी उडवून त्यांच्या व्हॉईसरॉयकडे पाठवली.
 • हिंदूंना फसवून खिस्ती बनवणार्‍या पोर्तुगीज पाद्र्यांना छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेला दणका ! : ‘छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्यात पोर्तुगिजांशी केलेले युद्ध राजकीय आणि धार्मिकही होते. हिंदूंना बाटवण्याचा, तसेच बाटण्यास नकार देणार्‍यांना जिवंत जाळण्याचा सपाटा लावणार्‍या पोर्तुगीज पाद्र्यांचे वरचे झगे काढून घेऊन आणि त्यांचे हात मागे बांधून शंभुराजांनी त्यांची गावातून धिंड काढली.’ – प्रा. श.श्री. पुराणिक (ग्रंथ : ‘मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर’ पूर्वार्ध़)

ई. इंग्रजांची राजवट

 • हिंदुस्थानातील हिंदूंचे खिस्तीकरण करण्याच्या इंग्रजांच्या योजनेचा जनक चार्ल्स ग्रँट ! : ‘१७५७ मध्ये ‘ईस्ट इंडिया कंपनी’चे राज्य बंगालमध्ये स्थापन झाले. त्यानंतर १८ व्या शतकाच्या शेवटी चार्ल्स ग्रँट या इंग्रजाने ‘हिंदुस्थानात खिस्ती धर्मप्रचार कसा करता येईल’, याविषयी प्रबंध बनवून तो ब्रिटीश संसदेत विल्यम विल्बरफोर्स, अन्य काही खासदार आणि कॅन्टरबरीचे आर्चबिशप यांच्याकडे पाठवला. चार्ल्स ग्रँटच्या या प्रस्तावावर ब्रिटिश संसदेत सतत आठ दिवस चर्चा झाल्यानंतर खिस्ती मिशनर्‍यांना धर्मप्रसाराची अनुमती मिळाली.’ – श्री. विराग श्रीकृष्ण पाचपोर
 • ‘१८५७ पूर्वी हिंदुस्थानात असलेल्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या राजवटीत मिशनर्‍यांकडून बळाने हिंदूंचे धर्मांतर करण्यात आले.’ – शंकर द. गोखले, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई.
 • १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर खिस्ती मिशनरी आणि ब्रिटीश साम्राज्यशाही यांचे हिंदूंच्या धर्मांतराविषयी झालेले संगनमत ! : ‘१८५७ च्हृाा स्वातंत्र्ययुद्धानंतर खिस्ती मिशनरी आणि ब्रिटीश साम्राज्यशाही यांचे नाते अधिक दृढ झाले. वर्ष १८५९ मध्ये ‘भारतात शक्य तितक्या लवकर खिस्ती धर्माचा जितका प्रचार आपण करू, तितके ते आपल्या साम्राज्यासाठी हिताचे आहे’, असे लॉर्ड पामरस्टनने कॅन्टरबरीच्या आर्चबिशपला सांगितले होते.’ – श्री. विराग श्रीकृष्ण पाचपोर
 • धूर्त इंग्रजांनी त्यांच्या राजवटीत सत्ता, शिक्षण आणि सेवा या माध्यमांतून धर्मप्रसार करून लोकांना खिस्ती बनवण्यासाठी प्रयत्न केले.’ – प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज (पूर्वाश्रमीचे पू. किशोरजी व्यास)
 • धर्मांतर हाच ब्रिटीश शिक्षणतज्ञ लॉर्ड मेकॉले याचा हिंदुस्थानातील शाळांच्या इंग्रजीकरणामागील हेतू ! : ‘इंग्रजांनी हिंदुस्थानात पाय रोवल्यानंतर ‘हिंदुस्थानी लोकांना कोणत्या भाषेत शिक्षण द्यावे’, यासंबंधी विचार चालू असतांना ब्रिटीश शिक्षणतज्ञ लॉर्ड मेकॉले याने कट्टर खिस्ती धर्मवादी आणि धर्मप्रसारक असलेल्या त्याच्या वडिलांना पत्रांतून कळवले, ‘इंग्रजी भाषेत शिक्षण घेतलेला हिंदू कधीही त्याच्या धर्माशी बांधील रहात नाही. असे अहिंदू पुढे ‘हिंदु धर्म कसा चुकीचा आहे आणि खिस्ती धर्म कसा श्रेष्ठ आहे’, याचा ठामपणे प्रसार करतात आणि त्यांच्यापैकी काही जण खिस्ती धर्म स्वीकारतात.’
 • धर्मांतर थांबवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी इंग्रजांशी केलेली संधी (तह) ! : ‘वर्ष १६८४ मध्ये मराठे आणि इंग्रज यांच्यात संधी झाली. त्या संधीत छत्रपती संभाजी महाराजांनी इंग्रजांना ‘माझ्या राज्यातून दास (गुलाम) बनवण्यासाठी वा खिस्ती धर्मात बाटवण्यासाठी माणसांना विकत घेण्याची अनुमती नाही’, अशी अट घातली़’ – डॉ. (सौ.) कमल गोखले (ग्रंथ : ‘शिवपुत्र संभाजी’)

उ. स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्योत्तर काळ

 • १. ‘मुस्लीम लीग’च्या ‘प्रत्यक्ष कृतीदिन योजने’च्या परिपत्रकात हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्याविषयी आज्ञा असणे ‘मुस्लीम लीग’ने १६.८.१९४६ या दिवशी कृतीत आणावयाच्या ‘प्रत्यक्ष कृतीदिन योजने’विषयी मुसलमानांना सांगणारे परिपत्रक काढले. त्यात मुसलमानांना दिलेल्या अनेक आज्ञांपैकी एक आज्ञा ‘हिंदु स्त्रिया आणि मुली यांच्यावर बलात्कार करा, तसेच त्यांना पळवून नेऊन त्यांचे धर्मांतर करा’, ही होती.’
 • नेहरूंच्या कारकीर्दीत खिस्तीकृत धर्मांतराला मिळालेला राजाश्रय
  • अ. स्वातंत्र्यानंतर खिस्त्यांना धर्मप्रसाराचे स्वातंत्र्य देणारे नेहरू ! : ‘देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी खिस्ती मिशनरी संघटनांना भारतीय घटनेच्या अनुच्छेद ‘२५ अ’नुसार धर्मप्रसाराचे स्वातंत्र्य बहाल केले. परिणामी स्वातंत्र्यापूर्वी भारतात खिस्त्यांची संख्या ०.७ टक्के एवढी होती, ती आज जवळजवळ ६ टक्के एवढी झाली आहे.’ – श्री. विराग श्रीकृष्ण पाचपोर
  • आ. गहू देण्याच्या बदल्यात खिस्त्यांना धर्मप्रसार करू देण्याची अट घालणारी खिस्ती अमेरिका आणि तिला अनुमती देणारे नेहरू ! : ‘स्वातंत्र्यानंतर देशात धान्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली. देशाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने रशियाने वस्तूंची देवाणघेवाण करणे (Barter System), या पद्धतीनुसार देशाला गव्हाचा पुरवठा केला, तर अमेरिकेने गहू विकत देण्याचे मान्य करतांना काही अटी घातल्या. त्यांतील एक अट ‘खिस्ती मिशनर्‍यांना हिंदुस्थानात धर्मप्रसार करण्यास सवलत द्यावी’, अशी होती. या अटीला पुष्कळ जणांचा विरोध झाल्याने नेहरूंनी न्या. भवानीशंकर नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली एक मंडळ नेमले. ‘प्रश्न केवळ धर्मप्रसाराचा नसून त्याद्वारे होणार्‍या धर्मांतराचेही सूत्र विचारात घेण्यासारखे आहे’, असे न्या. नियोगी यांनी सांगूनही गहू मिळवण्यासाठी ही अट मान्य करून कायद्याच्या ‘कलम ४८०’मध्ये त्यानुसार तरतूद करण्यात आली. तेव्हापासून खिस्ती धर्माचा प्रसार, म्हणजेच खिस्तीकृत धर्मांतर मुक्तपणे चालू आहे.’ – श्री. वसंत गद्रे
  • इ. ‘धर्मप्रचारामागे खिस्ती चर्च अन् मिशनरी संघटना यांचा राजकीय हेतू आहे’, असे पुराव्यांसह सांगणार्‍या शासननियुक्त समितीच्या अहवालाकडे दुर्लक्ष करणारे नेहरू ! : ‘खिस्ती मिशनरी संघटनांच्या कार्याच्या चौकशीसाठी १९५५ मध्ये तत्कालीन मध्यप्रदेश शासनाने न्या. भवानीशंकर नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने स्पष्टपणे ‘धर्मप्रचारामागे खिस्ती चर्च अन् मिशनरी संघटना यांचा राजकीय हेतू आहे’, असे अनेक उदाहरणे अन् पुरावे यांसह नमूद केले होते आणि ‘त्यांना मिळणारे विदेशी पैशांचे साहाय्य थांबवावे’, अशी सूचना केली होती. नेहरूंच्या शासनाने या अहवालास वाटाण्याच्या अक्षता लावल्या.’
 • इंदिरा गांधींच्या काळात अमेरिकेतील खिस्ती संस्थांनी धर्मांतराच्या कार्यास गती आणणे स्वातंत्र्योत्तर काळात इंदिरा गांधींनी ४२ व्हृाा घटनादुरुस्तीद्वारे घटनेत ‘निधर्मी’ हा शब्द आणला. तथाकथित निधर्मी तत्त्वाचा शासनस्तरावरून पुरस्कार झाल्यापासून अमेरिकेतील अनेक संस्थांनी हिंदुस्थानात खिस्ती धर्मप्रसार अन् धर्मांतर यांच्या कार्यास गती आणली.
 • सोनिया गांधी विद्यमान राजकारणात सर्वोेच्चपदी असल्याने धर्मांतराच्या कार्याला आणखी गती येणे ‘खिस्ती सोनिया गांधी राजकारणात सर्वोच्चपदी असल्यामुळेच हिंदुस्थानात खिस्त्यांकडून हिंदूंचे धर्मांतर व्हृाापक चळवळीप्रमाणे चालू आहेत. या कार्यासाठी देशातील विविध राज्यांत ४ सहदााांहून अधिक खिस्ती मिशनरी सक्रीय आहेत.’ – फ्रान्सुआ गोतीए, फ्रेंच पत्रकार

४. हिंदूंचे धर्मांतर करण्यामागील अहिंदूंचा उद्देश !

सांप्रत काळात हिंदुस्थानात खिस्ती, मुसलमान आणि बौद्ध धर्मीय हिंदूंचे धर्मांतर घडवत आहेत. त्यांचे हेतू सविस्तरपणे पुढे दिले आहेत.

अ. हिंदुस्थानचे खिस्तीकरण

हा खिस्ती धर्मियांचा धर्मांतर घडवण्यामागील मूळ हेतू आहे. यासाठीच हिंदुस्थानात खिस्ती मिशनरी आणि चर्च कार्यरत आहेत. याची ग्वाही देणारे काही विचार पुढे देत आहोत.

 • पोप जॉन पॉल दुसरे : ‘पहिल्या सहदााकात युरोपात खिस्ती पंथ रुजला. दुसर्‍या सहदााकात तो अमेरिका अन् आप्रिâका या खंडांत पसरला. तिसर्‍या सहदााकात उर्वरित जगात आणि हिंदुस्थानात खिस्ती पंथ रुजावा’, अशी आपण प्रार्थना करूया.’ – पोप जॉन पॉल दुसरे (१९९९ साली भारतीय दौर्‍यात काढलेले उद्गार)
 • मदर तेरेसा : ‘धर्मांतर करणे, हा खिस्ती मिशनर्‍यांच्या कार्यप्रणालीतील प्राण आहे. तो काढून घेतल्यास मिशनरी मृतवत होतील.’ – मदर तेरेसा अशा दृष्टीकोनातून भारतात सेवाकार्य करणार्‍या मदर तेरेसा यांना निधर्मी शासनाने ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च पुरस्कार दिला, हे लक्षात ठेवा !
 • फादर जॉन्सन : ‘आम्हा पाश्चात्त्यांवर जगाला खिस्ती करण्याचे दडपण असते. ‘ख्रिस्ती धर्म न मानणारे नरकात जाणार’, असे आम्ही मानत असल्याने खिस्ताचा संदेश सर्वदूर पोहोचवत असतो. ‘सर्व धर्म एकसमान आहेत’, असे हिंदू समजतात; म्हणून हिंदुस्थान धर्मांतरासाठी योग्य देश आहे.’ – फादर जॉन्सन
  भारतात १० वर्षे हिंदूंच्या धर्मांतराचे कार्य करणार्‍या अमेरिकी फादर जॉन्सनचा भारतातील अज्ञानी लोकांना एकुलत्या एका देवाच्या उपासनेस प्रवृत्त केल्याचे काम केले म्हणून केंद्रशासनाने सत्कार केला होता, हे लक्षात ठेवा !

आ. हिंदुस्थानचे इस्लामीकरण

‘दारुल इस्लाम’ (इस्लामी राष्ट्रांचे जग) आणि ‘दारुल हरब’ (इस्लामेतर राष्ट्रांचे जग) अशी मानवजातीची विभागणी इस्लामने केली आहे. ‘दारुल हरब’चे संपूर्ण इस्लामीकरण अर्थात ‘दारुल इस्लाम’ होईपर्यंत ‘जिहाद’, म्हणजे धर्मयुद्ध करण्याची इस्लामची शिकवण आहे.’
‘धर्मांतर हा प्रकारही इस्लामच्या दृष्टीने एक प्रकारचा जिहादच आहे. ‘दारुल-हरब’ असलेल्या हिंदुस्थानचे इस्लामीकरण करण्यासाठीच गेल्या १ सहदाा ३०० वर्षांपासून तलवार, बंदूक, खोटे प्रेम (लव्ह जिहाद) आदी माध्यमांतून हिंदूंचे धर्मांतर करणे चालू आहे.’ – साप्ताहिक ‘वङ्काधारी’ (१७.२.२०११)

इ. बौद्धमय भारताची निर्मिती

हिंदुस्थान हे बौद्धमय राष्ट्र व्हावे, यासाठी चीन आणि जपान या देशांच्या पैशांतून भारतातील मागास भागात ‘ड्रॅगन पॅलेस’ उभारले जात आहेत. त्या माध्यमातून हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. विशेषकरून दिल्ली, उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांत असे प्रयत्न केले जात आहेत. हिंदूंमधील कथित मागासवर्गीय जातींच्या मनात कथित उच्चवर्णियांविषयी द्वेष निर्माण करून त्यांना बौद्ध करण्याचा प्रयत्नही देशातील नवबौद्धांकडून चालू आहे. प्रत्यक्षात गौतम बुद्धाला हिंदु धर्माने नववा अवतारच मानले आहे.

संदर्भ : ‘हिंदू जनजागृती समिती’ पुरस्कृत ग्रंथ ‘धर्मांतर अन् धर्मांतरितांचे शुद्धीकरण