लाल बहादूर शास्त्री

लालबहादूर शास्त्री (२ ऑक्टोबर, १९०४ – ११ जानेवारी, १९६६) हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली.

‘सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. या दैवी प्रवासामधे लाल बहादुर शास्त्री स्मारकाला भेट दिल्याची  माहिती प्रसिद्ध करत आहोत.’

१. लाल बहादुर शास्त्रीजींच्या घरी सात्त्विकतेमुळे पुष्कळ चांगली स्पंदने जाणवणे आणि तेथे भावजागृती होणे

आम्ही नेहरूंचे घर ‘तीन मूर्ती भवन’ बघितले. तेथे त्यांच्या वस्तू जतन केल्या आहेत. आम्ही इंदिरा गांधी यांच्या वस्तू जतन केलेले त्यांचे घर ‘इंदिरा गांधी स्मृती’ हेही बघितले; पण भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रीजींच्या घरासारखी ती घरे नाहीत. लाल बहादुर शास्त्रीजींचे घर पाहिले, तर भावजागृती होते. तेथे सात्त्विकतेमुळे पुष्कळ चांगली स्पंदने जाणवतात; कारण स्वतः लाल बहादुर शास्त्रीजीच सात्त्विक होते. त्यांचे साधे राहाणीमान आणि नीतीमानता यांमुळे तेथे पुष्कळ चांगले वाटले.

२. लाल बहादुर शास्त्रीजींचा साधेपणा

२ अ. पंतप्रधानपदी आरूढ झाल्यावरही कोणत्याही सुविधा न घेता साधेपणाने रहाणे

ते ९ जून १९६४ या दिवशी पंतप्रधान झाले; पण त्यांनी पंतप्रधानांना जे शासनाकडून मोठे घर मिळते, ते घेतले नाही. ते साधेपणाने त्यांच्या या स्वतःच्या घरीच राहिले. त्यांनी कोणत्याही सुविधा घेतल्या नाहीत.

भर पावसात जनतेला उद्देशून भाषण करतांना लाल बहादुर शास्त्री

२ आ. जनतेला उद्देशून भाषण करतांना पाऊस आल्यावर ‘माझी सर्व जनता पावसात उभी राहून

माझे भाषण ऐकत आहे, तर मी कसा काय छत्रीमध्ये रहाणार !’, असे म्हणून स्वतःसाठी छत्री घेणे नाकारणे

त्यांच्या साधेपणाविषयी तेथील एका माणसाने माहिती दिली ती अशी – ‘लाल बहादुर शास्त्री १५ ऑगस्ट या दिवशी लाल किल्ल्यावर जनतेसमोर भाषण करायला उभे राहिले. तेव्हा मोठा पाऊस पडू लागला. त्या वेळी शास्त्रीजींचे २ सेवक छत्री घेऊन धावले. तेव्हा शास्त्रीजी त्यांना म्हणाले, ‘‘माझी सर्व जनता पावसात उभी राहून माझे भाषण ऐकत आहे, तर मी कसा काय छत्रीमध्ये रहाणार !’’ असे म्हणून त्यांनी छत्री घेतली नाही आणि भर पावसात जनतेला उद्देशून भाषण केले. तेव्हा सर्व जनतासुद्धा तेवढ्या पावसात त्यांचे भाषण ऐकायला तशीच उभी होती.’ त्यांच्या या साधेपणामुळे, तसेच देशभक्तीमुळे जनतासुद्धा त्यांना पुष्कळ मान द्यायची.

लाल बहादुर शास्त्री यांचा जतन केलेला कोट

२ इ. थंड प्रदेशात जाण्यासाठी गरम कपडे नसणे आणि नेहरूंनी त्यांना त्यांचा कोट देणे

जेव्हा पं. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते, तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात लाल बहादुर शास्त्री गृहमंत्री होते. नेहरूंनी त्यांना सांगितले, ‘‘काश्मीरला एक बैठक आहे, तेथे तुम्ही जा.’’ शास्त्रीजी पटकन ‘हो’ म्हणाले नाहीत. त्यावर नेहरू म्हणाले, ‘‘तुम्ही ‘हो’ का म्हणत नाही ?’’ शास्त्रीजी म्हणाले, ‘‘काश्मीरला पुष्कळ थंडी असते. माझ्याकडे गरम कपडे नाहीत. त्यामुळे मी तेथे आजारी पडीन.’’ तेव्हा नेहरूंनी त्यांना स्वतःचा गरम कोट दिला. शास्त्रीजी जरा बुटके होते. त्यांनी तो कोट उंचीला छोटा करून घेतला. नेहरू त्यांना म्हणाले, ‘‘हा कोट तुमच्याकडेच ठेवा.’’ म्हणजे इतक्या मोठ्या पदावर असूनही त्यांच्याकडे गरम कपडे इत्यादी नव्हते. त्यांच्याकडे २ – ३ खादीचे कपडे होते. तेवढेच ते काटकसरीने वापरायचे. पूर्वीच्या ‘युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएत रशिया’मधील उझबेकिस्तान येथे ‘ताष्कंद करार’ झाला, त्या वेळी तेथेच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. तेव्हा तो कोट त्यांच्या अंगात होता. त्यामुळे तो कोट ऐतिहासिक ठरला. तो कोटही त्यांच्या घरी जतन केला आहे.

३. लाल बहादुर शास्त्रीजींची तत्त्वनिष्ठता

लाल बहादुर शास्त्री यांनी वापरलेली चारचाकी गाडी

३ अ. सचोटी

पंतप्रधान झाल्यावरही शास्त्रीजींनी कधी लालसेने किंवा भ्रष्टाचाराने पैसे गोळा केले नाहीत. आहे तेवढ्या पैशातच त्यांनी संसार चालवला.

३ आ. पंतप्रधान झाल्यावरही चारचाकी गाडीचे कर्ज चुकते करण्याचा प्रयत्न करणे

लाल बहादुर शास्त्रीजींकडे कित्येक वर्षे चारचाकी गाडी नव्हती. पंतप्रधान असतांना त्यांनी गाडीसाठी कर्ज काढले. त्यांतील थोडे थोडे पैसे ते चुकते करत होते. त्यांचा देहत्याग झाल्यानंतरसुद्धा कर्जाचे ३ हप्ते फेडायचे शिल्लक होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने १ हप्ता कसाबसा दिला. शेवटी त्या मोटार आस्थापनाच्या मालकानेच ते कर्ज माफ केले.

४. शास्त्रीजींच्या धर्मपत्नी ललिता शास्त्री

४ अ. ललिता शास्त्री यांनी पतींचे केलेले आज्ञापालन !

त्यांच्या पत्नी ललिता शास्त्री या पतिव्रता होत्या. वर्ष १९३१ मध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीच्या वेळी शास्त्रीजी अलाहाबादला कारागृहात होते. तेव्हा त्यांची अत्यंत गरीब परिस्थिती होती. ललिताजीही स्वातंत्र्यचळवळीत भाग घेत. सततचे राष्ट्रकार्य आणि अपुरा आहार यांमुळे ललिताजी आजारी पडायच्या. तेव्हा शास्त्रीजींनी त्यांना प्रकृती सुधारण्यासाठी प्रतिदिन १ पेला दूध प्यायला सांगितले; पण गरिबीमुळे त्यांच्याकडे पेलाभर दूध प्यायला पैसे नव्हते. त्यामुळे त्या अगदी छोटा पेला दूध प्यायच्या आणि शास्त्रीजींचे आज्ञापालन करायच्या.

४ आ. विदेशी वस्तूंविरुद्धच्या चळवळीत पतिव्रता असूनही

स्वतःच्या हातांतील विदेशी बांगड्या काढून टाकणे आणि तत्त्वनिष्ठतेचा आदर्श सर्वांसमोर ठेवणे

वर्ष १९३० मध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीत विदेशी वस्तूंविरुद्ध असहकार आंदोलन आरंभ झाले. विदेशी वस्तू लोक वापरायचे नाहीत. या आंदोलनात ललिता शास्त्री सहभागी व्हायच्या. तेव्हा त्या एका दुकानात गेल्या होत्या आणि दुकानदाराला सांगत होत्या, ‘तूसुद्धा विदेशी वस्तू वापरू नकोस.’ त्या वेळी दुकानदाराने ललिताजींच्या हातांतील बांगड्या पाहिल्या. त्या विदेशी होत्या. तेव्हा दुकानदार हे त्यांच्या लक्षात आणून देत म्हणाला, ‘‘माजी, आपल्या हातांतील बांगड्या विदेशीच आहेत.’’ ललिताजींना स्वतःची चूक लक्षात आली. त्यांना ‘या बांगड्या विदेशी आहेत’, हे ठाऊक नव्हते. तेव्हा त्यांनी दुकानदारासमोरच त्या फोडल्या. एक पतिव्रता पती हयात असतांना हातांतील बांगड्या कधी फोडत नाही, तरीही त्यांनी फोडल्या. एवढी तत्त्वनिष्ठता त्यांच्यात होती. या बांगड्यासुद्धा लालबहादूर शास्त्रीजींच्या घरी जतन केल्या आहेत.

४ इ. शास्त्रीजींच्या पार्थिवाला स्नान घालून राहिलेले पाणी जतन करणे आणि पुढे ते प्रतिदिन त्यांचे ‘चरणतीर्थ’ म्हणून पिणे

त्यांची बायको इतकी पतिव्रता होती की, शास्त्रीजींचा देहत्याग झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला जेव्हा शेवटचे स्नान घातले गेले, तेव्हा त्या शेवटच्या स्नानाचे हंड्यात राहिलेले पाणी ललिताजींनी त्यांचे ‘चरणतीर्थ’ म्हणून आपल्याकडे जपून ठेवले. प्रतिदिन त्या जेव्हा केव्हा पाणी प्यायच्या, तेव्हा चरणतीर्थातील थोडे पाणी पेल्यातील पाण्यात मिसळत आणि ते पाणी त्या प्यायच्या. असे हे संस्कारीत लोक पूर्वी होऊन गेले; म्हणून त्यांच्या घरात पुष्कळ चांगले वाटले.

५. शास्त्रीजींच्या घराचे छायाचित्र काढू न देण्यामागे वाटलेले एक कारण

‘शास्त्रीजींच्या घराचे छायाचित्र काढू देत नाहीत; कारण तेथे पलीकडे एका व्यक्तीचे घर आहे आणि तिने पोलिसांना पत्र पाठवून सुरक्षेच्या कारणासाठी शास्त्रीजींच्या घराचे छायाचित्र काढू न देण्याची मागणी केली आहे. मला असे वाटते, ‘तिचा असाही एक उद्देश असणार की, लाल बहादुर शास्त्रीजींची महती कुठे पसरायला नको !’ आम्हाला ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’साठी छायाचित्रे काढण्याची परवानगी मिळाली.

लाल बहादुर शास्त्रीजींच्या समाधीजवळ असलेल्या झाडावर बसलेले गरूड

६. लाल बहादुर शास्त्रीजी आणि त्यांच्या पत्नी ललिताजी

यांच्या समाधीस्थानी झाडांवर दैवी पक्षी गरुड पुष्कळ संख्येने दिसणे

नीतीमान पंतप्रधान असल्यामुळे त्यांच्या घरी जसे पुष्कळ चांगले वाटले, तसे त्यांच्या समाधीस्थानीही चांगले वाटले. तेथे गेल्यावर त्यांच्या समाधीवर डोके ठेवून मी नमस्कार केला आणि प्रार्थना केली, ‘तुमच्यासारखी तत्त्वनिष्ठता आणि तुमचे गुण आमच्यामध्ये येऊ देत.’ त्या वेळी तेथे जवळच्या झाडावर इतके गरुड होते की, एवढे गरुड आम्ही अन्य ठिकाणी कुठेच पाहिले नाहीत.

तसेच ललिताजींच्या समाधीच्या ठिकाणीही आम्हाला पुष्कळ गरुड दिसले. इतरांच्या समाधीस्थळी कावळेच कावळे दिसले. गरुडांनाही चांगली स्पंदने कळतात, हे लक्षात आले.

संदर्भ : sanatan.org