हिंदु भगिनींनो, नवरात्री निमित्त

स्‍त्रीशक्‍ति जागृत करून रणरागिणी बना !

अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्रोत्सव सुरू होतो. हा आदिशक्तीच्या उपासनेचा सण आहे. आपण सर्वांनी आनंदी राहावे आणि आदर्श जीवन जगता यावे यासाठी देवाने सणांची निर्मिती केली आहे; परंतु सध्या सण आणि उत्सवांकडे केवळ मौजमजेचे रूप म्हणून पाहिले जाते. त्याचबरोबर त्यात गैरप्रकार देखील वाढले आहेत. त्यामुळे देवीतत्व जागृत करणाऱ्या नवरात्रोत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. नवरात्रोत्सव म्हणजे आपल्यात असलेल्या दुर्गादेवीची शक्ती जागृत करणे. सध्या स्त्री कमकुवत असल्याने तिच्यात प्रतिकार करण्याची क्षमता कमी झाली आहे; त्यामुळे महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. आपणही आपल्यातील देवीतत्त्व भक्तीने जागृत करून स्वतःच्या आणि राष्ट्राच्या रक्षणार्थ सिद्ध व्हायला हवे. चला तर मग नवरात्रोत्सवातील गैरप्रकारांना आळा घालून या सणाचे पावित्र्य जपण्याचा संकल्प करून देवीची कृपा संपादन करूया. आपल्यातील क्षात्रवृत्ती जागृत करून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध होऊया. हाच खरा नवरात्रोत्सव आहे.

हिंदू बांधवांनो, नवरात्रोत्‍सव आदर्शरित्या साजरा करा !

नवरात्रोत्‍सवात हे नसावे !

वर्गणीसाठी बळाचा वापर (सक्ती)
‘प्लास्टर ऑफ पॅरीस’ची अशास्त्रीय अन्‌ अवाढव्य मूर्ती
कृत्रिम सजावट, भव्य मंडप आणि विद्युत झगमगाट
मंडपामध्ये जुगार आणि मद्यपान, अभिरूचीहीन गीते
फटाके अन्‌ चित्रपटगीते यांमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण
मिरवणुकीत हिडीस नाच, मद्यपान अन्‌ गुलालाचा अतिरेक

नवरात्रोत्‍सवात हे असावे !

ऐच्छिक स्वरूपाची वर्गणी
शाडूची आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेली लहान मूर्ती
नैसर्गिक सजावट, लहान मंडप आणि दिव्यांची सजावट
मंडपात अनुशासन आणि पावित्र्य, भजने अन् भक्तीगीते
आरती आणि नामजप यांमुळे वातावरणात सात्त्विकता
जयघोष आणि नामजप करत अनुशासनबद्ध मिरवणूक

तुम्ही काय करू शकता ?

नवरात्रोत्सव मंडळ आणि गरबा आयोजक

अहिंदू आणि ‘लव्ह जिहाद्यां’ना या सणापासून दूर ठेवा, हिंदू युवती आणि महिलांचे रक्षण करा !

अहिंदूंना गरब्यात प्रवेश करण्यास बंदी घाला
प्रत्येक गरबा स्थळी लव्ह जिहादविषयी जनजागृती करणारे फलक लावा
गरबा स्थळाच्या प्रवेशद्वारावर बंदोबस्त तैनात करा
गरब्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड तपासा
गरबा स्थळाच्या आत जाताना प्रत्येक पुरुषाला टिळा लावा.

हिंदु युवतींनो, स्वतःतील शक्तितत्त्व जागृत करा !

अश्लीलता, विकृत पाश्चात्त्य प्रथा यांसारखी आक्रमणे संघटितपणे रोखा !
धर्म-परंपरांवरील पुरोगाम्यांचे आघात रोखण्यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करा
धर्मांध तरुणांच्या ‘लव्ह जिहाद’पासून रक्षण होण्यासाठी धर्मशिक्षण घ्या !
महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !

आज देशात विविध ठिकाणी बलात्कार, हिंसा, आतंकवादी आक्रमण यांसारख्या अनेक अप्रिय घटना वाढत आहेत. अशा अप्रिय घटना होत असताना अन्य कोणावरही निर्भर न राहता स्वत:च आपले रक्षण करा !

समाजाच्या रक्षणासाठी आपल्या भागामध्ये नि:शुल्क ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग’ चालू करा !

7738233333

‘लव्ह जिहाद’ची वास्तविकता जाणा !

हिंदु युवतींना जाळ्यात ओढून, फसवून, धर्मांतर करून त्यांचे शोषण करणाऱ्या या गुप्त जिहाद विषयी हिंदु जनजागृती समिती एक दशकांहून अधिक काळ जागृती करत आहे. लव्ह जिहाद वर आधारित समितीचा ग्रंथ अनेक घरांपर्यंत पोहचला आहे आणि अनेक युवतींना लव जिहादला बळी पडण्यापासून वाचवले आहे.

हिंदुंनो, स्वत: वाचा आणि अन्‍यांना पण सांगा

हिंदु जनजागृती समितीचा ग्रंथ ‘लव्ह जिहाद’