भारतात संविधान आणि कायदा अस्तित्वात असतांनाही उदयनिधी स्टॅलीन, प्रियांक खर्गे यांच्यासारखे मंत्री सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, एच.आय.व्ही. या रोगांशी तुलना करून सनातन धर्मच संपवण्याची अतिरेकी आणि अर्बन नक्षलवाद्यांची भाषा बोलत आहेत. सहिष्णुता, बंधुत्व आणि विश्वकल्याण यांच्यासाठी सुपरिचित असणारा सनातन धर्म नष्ट करण्यासाठी अर्बन नक्षलवाद्यांकडून सातत्याने षडयंत्रे चालू आहेत. सर्वाेच्च न्यायालयाने 28 एप्रिल 2023 या दिवशी दिलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, जर कोणी ‘हेटस्पीच’ करून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करेल, तर सरकारने तक्रारदाराची वाट न पहाता स्वतःच दखल घेऊन प्राथमिक तक्रार (FIR) दाखल केली पाहिजे. यात सरकारने विलंब केल्यास त्याला मा. सर्वाेच्च न्यायालयाचा अवमान मानले जाईल. इतका स्पष्ट आदेश असतांनाही या 100 कोटी समाज असणार्‍या सनातन धर्माच्या विरोधात वक्तव्य करणार्‍यांवर अद्याप गुन्हा दाखल का झालेला नाही ? त्यामुळे सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्ट करण्याविषयी ‘हेटस्पीच’ करणार्‍यांच्या विरोधात ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान सर्वत्र राबवण्यात येणार आहे.

धर्मद्रोह्यांचे ‘हेटस्पीच’

जे.एन.यु. मध्ये ‘भारत तेरे टुकडे होंगे’च्या देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या. त्यानंतर ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ नावाने हिंदुत्व संपवण्यासाठी परिषदा घेतल्या गेल्या. त्या वेळी विरोध झाल्यावर ‘आम्ही हिंदु धर्माच्या विरोधात नाही, तर राजकीय हिंदुत्वाच्या विरोधात आहोत’, असा खुलासा केला गेला; मात्र आता तर ‘सनातन धर्म’ संपवण्याचीच भाषा केली जात आहे. ओवैसीच्या 100 कोटी हिंदूंना संपवण्याच्या भाषेपेक्षा हे वेगळे काय आहे ? ‘हेटस्पीच’च्या खटल्यात, सर्वाेच्च न्यायालयातील प्रतिज्ञापत्रात महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी 30 गुन्हे नोंदवल्याचे सांगितले आहे. त्यातील बहुतांश गुन्हे सकल हिंदु समाजाच्या ‘हिंदु जनआक्रोश मोर्च्या’तील हिंदुत्ववादी वक्त्यांच्या विरोधात दाखल केले गेले आहेत. हे गुन्हे दाखल करण्याच्या मागे अर्बन नक्षलवाद्यांशी जोडलेल्या वामपंथी विचारसरणीच्या तिस्ता सेटलवाड यांच्या ‘सिटीझन फॉर जस्टिस ॲण्ड पीस’ या संघटनेचा हात आहे; मात्र याच संघटनेने स्टॅलिन, प्रियांक खर्गे, निखिल वागळे, आव्हाड इत्यादींच्या विरोधात ‘हेटस्पीच’चा एकही गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे एकूणच सनातन धर्म संपवण्याचे हे डाव्या विचारसरणीच्या अर्बन नक्षलवाद्यांचे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे हे षडयंत्र करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासह त्यांची ‘एन.आय.ए.’ कडून चौकशी करण्यात यावी, अशी हिंदु जनजागृती समितीची मागणी आहे.

अभियानामध्ये सहभागी व्हा !

डीपी लावा

‘मी सनातन धर्मरक्षक’ डीपी लावून जागरूकता निर्माण करा

1

गुन्हा दाखल करा

‘हेटस्पीच’ करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा

2

जागृती करा

सनातन धर्माचे महत्त्व सांगणारी व्याख्याने घेऊन सनातन धर्मियांत जागृती करा

3

निवेदन द्या

‘हेटस्पीच’ करणार्‍यांच्या विरोधात सरकारने प्राथमिक तक्रार (FIR) दाखल करण्यासाठी निवेदन द्या

सनातन धर्माच्या रक्षणासाठी बना

‘सनातन धर्मरक्षक’

फोटो गॅलरी

संबंधित वार्ता