हिंदूंचे संघटन आणि
धर्मप्रेम जागृत करणारा

गणेशोत्सव

हिंदूंचे संघटन आणि धर्मप्रेम जागृत करणारा

गणेशोत्सव

JOIN HJS DONATE

‘गणेशोत्सव’ देशभरात मोठ्या थाटात आणि उत्साहाने साजरा केला जाणारा उत्सव आहे. अनेक वर्षांपासून गणेशोत्सव घरोघरी साजरा केला जात आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचा भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याशी एक अनोखा संबंध आहे. गणेशचतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचे सार्वजनिक पूजन लोकप्रिय करण्याचे श्रेय स्वराज्याचे महानायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जाते. त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्याला समाजाचा पाठिंबा मिळवून दिला आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे या चळवळीला आवश्यक असलेले आध्यात्मिक बळ मिळवले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरच्या दशकात गणेशोत्सवात अनेक अपप्रकार होत आहेत. या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समिती प्रयत्नशील आहे. समिती जनजागृती मोहिमेचे आयोजन आणि गणेशोत्सव मंडळांना आध्यात्मिक स्तरावर उत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहित करत असते. ‘सार्वजनिक गणेशोत्सवाचे’ स्वराज्य मिळवण्यात महत्त्वाचे योगदान होते. आता या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची वेळ आली आहे.

मातीपासून बनवलेली गणपतीची मूर्ती – ‘इको फ्रेंडली’ मूर्ती

मातीपासून बनवलेली मूर्ती पाण्यात विरघळते आणि चिखलात रूपांतरित होते. त्यामुळे नदीचा प्रवाह रोखला जात नाही.

पाणी प्रदूषित होत नाही. मानवी आरोग्यासाठी आणि जलचरांसाठी हानीकारक नाही.

पाणी आध्यात्मिक दृष्टीने शुद्ध करते, जे पर्यावरण तसेच मानवासाठी लाभदायक आहे.

गणेशोत्सव विरोधी प्रचार

(कागदी लगद्याच्या मूर्ती)

दावा

कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती पर्यावरणपूरक असतात.

वस्तूस्थिती

नॅशनल ग्रीन ट्रिब्यिुनल (NGT)च्या अहवालात म्हटले आहे, ‘कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींमुळे प्रदूषण होते आणि पर्यावरणाची हानी होते.

कागदाचा लगदा पाण्यातील प्राणवायू (ऑक्सिजन) शोषून घेतो आणि सजीवांसाठी हानीकारक असलेला मिथेन हा वायू उत्सर्जित करतोे.

कागदातील ‘लिग्निन’ घटक जैविक ऑक्सिजनची मागणी वाढवतात, जे जलचरांसाठी हानीकारक आहे.

कागदाचा लगदा लहान तुकड्यांमध्ये विघटित होतो, जे जलचरांसाठी हानीकारक आहे.

कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्ती पर्यावरणपूरक नाहीत. अशा मूर्ती घेऊ नका.

मूर्ती विसर्जन करण्याचे पर्यायी मार्ग

दावा

काही स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणवादी असा दावा करतात की, ‘गणेशमूर्तींचे नद्यांमध्ये विसर्जन केल्याने जलप्रदूषण होते.’ ते मूर्ती विसर्जनासाठी पुढील पर्याय सुचवतात.

कृत्रिम हौदांमध्ये मूर्तींचे विसर्जन करणे

स्वयंसेवी संस्थांना किंवा सरकारला
श्री गणेशमूर्ती दान करणे

अमोनियम बायकार्बोनेटमध्ये मूर्ती विरघळवणे

वस्तूस्थिती

दान केलेल्या मूर्तींचे दगडाच्या खाणीत टाकून तसेच नद्यांमध्ये फेकून विटंबना केली जाते.

गणेशमूर्ती विसर्जन केल्याचे आध्यात्मिक लाभ आहेत. मूर्ती रसायनात विसर्जित केल्यास हे लाभ होऊ शकत नाहीत.

‘देवतेची मूर्ती दान देणे किंवा स्वीकारणे’ हा देवतांचा घोर अपमान आहे; कारण मानवात देवतेच्या मूर्तींचे दान देण्याची किंवा स्वीकारण्याची क्षमता नाही.

अध्यात्मशास्त्रानुसार गणेशमूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करा !

ढोंगी पर्यावरणवादी

ढोंगी पर्यावरणवादी वर्षभर गाढ झोपेत आढळतात आणि केवळ हिंदू सणांच्या वेळीच जागृत होतात.
गणेशोत्सवाच्या कालावधीत या पर्यावरणवाद्यांना जलप्रदूषण होण्याची प्रचंड चिंता वाटते.

मी प्रतिज्ञा करतो की…

1

माती आणि नैसर्गिक रंग वापरून बनवलेली गणेशमूर्तीच घरी आणीन

2

विचित्र आणि मोठ्या आकाराची गणेशमूर्ती स्थापन करणार नाही

3

पारंपारिक पोशाख परिधान करीन आणि सात्त्विक भजने अन् मंत्रजप लावीन

4

गणेशमूर्तीचे विसर्जन अध्यात्मशास्त्रानुसार वाहत्या पाण्यात करीन

5

श्री गणेशाचे विडंबन करणार्‍या लोकांचा सनदशीर मार्गाने ‍विरोध करीन

6

खरा गणेशभक्त होऊन स्‍वराज्याचे सुराज्य बनवण्यासाठी प्रतिदिन १ घंटा देईन

गणेशोत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची मोहीम

मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी गणेशमूर्ती बनवणारे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळ यांमध्ये जागृती

आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी व्याख्याने आणि विशेष चर्चा यांचे आयोजन

हिंदूविरोधी प्रचाराचे खंडन करण्यासाठी युवकांसाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम

पोस्टर्स लावणे, प्रदर्शन भरवणे, आध्यात्मिक आणि शास्त्रोक्त माहिती असलेल्या पत्रकांचे वितरण

‘कृत्रिम तलावात गणेशमूर्ती विसर्जन करणे आणि मूर्तीदान करणे’, अशा अशास्त्रीय मोहिमांवर बंदी घालण्यासाठी सरकारी अधिकार्‍यांना निवेदन

समितीने तथाकथित इको-फ्रेंडली मूर्तींच्या संदर्भात एनजीटी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे मागवले अहवाल

समिती २००२ पासून प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (POP पासून) बनवलेल्या मूर्तींवर बंदी आणण्याच्या लढ्यात आघाडीवर

मूर्तींचे विसर्जन शांतपणे आणि सुरळीत होण्यासाठी समितीच्या स्वयंसेवकांकडून भाविक अन् पोलीस प्रशासन यांना साहाय्य

समितीचे स्वयंसेवक लोकांना शास्त्रीय पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी प्रवृत्त करण्यात यशस्वी

आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?

हे करा

  • सजावट सात्त्विक आणि नैसर्गिक सामूग्रीपासून करा
  • धर्मशास्त्रानुसार मूर्ती मातीची आणि नैसर्गिक रंगाची आणा
  • निवडक आरत्या भक्तीभावाने म्हणा. प्रार्थना आणि नामजप करा
  • नामजप करत आणि भाव ठेवून प्रसाद बनवा‍
  • विसर्जन मिरवणूक वेळेत चालू करून वेळेत संपवा. मिरवणुकीत नामजप करत चाला
  • गणेशमूर्तींचे विसर्जन वाहत्या पाण्यात करा

हे करू नका

  • महागडी रोषणाई आणि थर्माकोलची सजावट
  • प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, प्रचंड आकाराच्या आणि विचित्र पोशाखातील मूर्ती, नारळाच्या शेंड्या, केळी आणि भांडी इत्यादीपासून बनवलेल्या मूर्ती
  • आरती करतांना हसणे किंवा चेष्टा करणे, लांबलचक आरत्या म्हणणे, चित्रपट संगीताच्या चालीवर आरत्या म्हणणे
  • नेवैद्य बनवतांना अनावश्यक गप्पा मारणे
  • मिरवणुकीत चालतांना मद्य (दारू) घेणे, बीभत्स नाच करणे, बळजोरीने रंग लावणे, मिरवणूक अपरात्री संपवणे
  • मूर्तीदान करणे, अमोनियम कार्बोनेटमध्ये मूर्तीचे विसर्जन करणे, मूर्ती दर्‍याखोर्‍यात फेकणे

सामान्यत: विचारले जाणारे प्रश्न

श्री गणपतीच्या मूर्तींमध्ये चैतन्य असते. मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित केल्यावर पाणी शुद्ध होते. पाणी वाहते असल्याने हे चैतन्य दूरपर्यंत पोचते आणि अनेक जणांना त्याचा लाभ होतो. या पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे वातावरण सात्त्विक (सत्त्वप्रधान) बनते.

‘श्री गणेश मूर्तीचे विसर्जन वाहत्या पाण्यात किंवा जलाशयातच करावे’, असा शास्त्रात उल्लेख आहे; मात्र काही जण ‘मूर्तींचे विसर्जन वाहत्या पाण्यात केल्याने जलप्रदूषण, उपासमार होते असा अपसमज पसरवतात आणि काही हिंदूविरोधी लोक मूर्तींचे विसर्जन करण्याऐवजी दान करण्याचे हास्यास्पद आवाहन करतात. ‘मूर्तीदान करणे’, हा श्री गणेशाचा अपमान आहे. ‘मूर्तीदान करणे अशास्त्रीय का आहे ?’, याची कारणे पुढे दिली आहेत.

  • ‘मूर्तीचे विसर्जन करणे’, हा धर्मग्रंथानुसार धार्मिक विधी आहे.

  • ‘देवतांच्या मूर्तींचे दान करणे किंवा दान स्वीकारणे’, हा देवतांचा घोर अपमान आहे; कारण मानवात देवतांच्या मूर्तींचे दान करण्याची किंवा स्वीकारण्याची क्षमता नाही.

  • मूर्ती म्हणजे खेळणी किंवा शोभेची वस्तू नाही, जी एखाद्याची इच्छा किंवा आवड यांनुसार वापरून टाकून दिली जाते किंवा दान केली जाते.

काही प्रदेशांमध्ये विसर्जनासाठी पुरेसे पाणी असलेले जलाशय नाहीत. इतर काही ठिकाणी, पाण्याचे सर्व स्रोत प्रदूषित आहेत, ज्यामुळे ते मूर्ती विसर्जनासाठी अयोग्य आहेत. त्याचप्रमाणे एखाद्या ठिकाणी दुष्काळ किंवा आपत्ती आल्याने मूर्तीचे विसर्जन होऊ शकत नाही. अशी परिस्थिती पुढील दोन प्रकारे हाताळली जाऊ शकते:

  • मूर्तीला अभिषेक करण्याऐवजी, एक सुपारी ठेवा आणि त्याला गणपती चे प्रतिक मानून प्रतिकात्मकपणे पूजन करा. सुपारी लहान विहिरीत किंवा ओढ्यात विसर्जित करता येते.
  • चतुर्थी सणासाठी श्री गणपतीची नवीन धातूची मूर्ती विकत घ्या आणि अभिषेक केल्यानंतर तिची पूजा करा. जरी दैनंदिन पूजेमध्ये गणपतीची मूर्ती नेहमीच असते, तरीही नवीन मूर्ती आणण्याचे कारण पुढीलप्रमाणे आहे – श्री गणेश चतुर्थीला गणेश लहरी मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर येतात. जर त्या लहरींना आपल्या दैनंदिन उपासनेत आवाहन केले तर मूर्ती प्रचंड ऊर्जेने भारीत होईल. प्रचंड उर्जा असलेल्या अशा मूर्तीला वर्षभर ‍विधिपूर्वक पूजन करणे कठीण होईल; कारण याचा अर्थ कर्मकांडाच्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करणे. त्यामुळे नवीन धातूची मूर्ती खरेदी करावी. अशा मूर्तीला पाण्यात विसर्जित करण्याची गरज नाही. विसर्जनाच्या वेळी मूर्तीच्या तळहातावर थोडी अक्षता ठेवावी आणि मूर्ती उजव्या हाताने थोडी हलवावी. याबरोबरच मूर्तीतील तत्त्वाचेही विसर्जन होते. अशा मूर्तीची रोज पूजा करण्याची गरज नाही. पुढील वर्षी या मूर्तीचे पुन्हा अभिषेक करून पूजा करता येईल.

संबंधित बातम्या