साधनेत स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे याला कलियुगात प्राधान्य !

स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केले, तरच कोणत्याही साधनामार्गाने साधना करून जलद प्रगती करता येते. आधीच्या युगांत स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अधिक नसल्यामुळे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची आवश्यकता नव्हती. ते आपोआपच नष्ट होत.

‘वापरा आणि फेका’ हे तत्त्व वृद्ध आई-वडिलांच्या संदर्भात वापरणारी तरुण पिढी !

वापरा आणि फेका (Use and Throw)’ ही जी पाश्‍चात्त्यांची आधुनिक संस्कृती आहे, ती आता अनेक तरुणांंनीही आत्मसात केली आहे. त्यामुळे ज्या आई-वडिलांनी जन्म दिला, जन्मापासून स्वावलंबी होईपर्यंत सर्व तर्‍हेने काळजी घेतली, उदा. आजारपणात सर्व केले, शिक्षण दिले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता न वाटता हल्लीचे आंग्लाळलेले तरुण आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी ‘वापरा आणि फेका’ … Read more

सर्वसाधारण व्यक्ती, संत आणि पंचमहाभूते

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, हे सर्वसाधारण व्यक्तीच्या संदर्भात खरे असते; कारण त्यांचे कार्य पंचमहाभूतांच्या स्तरावरचे असते. याउलट संतांचे कार्य शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या स्तरावरचे असल्यामुळे त्याचा संबंध शब्द, स्पर्श, रूप… यांच्याशी नसतो.

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनो, मानवाचा मानवदेहधारी प्राणी बनवू नका !

व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली व्यक्तीस्वातंत्र्यवाले थयथयाट करतात. ते विसरतात की, प्राणी आणि मानव यांच्यात महत्त्वाचा भेद म्हणजे प्राणी व्यक्तीस्वातंत्र्यानुसार, म्हणजे स्वेच्छेने वागतात. याउलट मानवाने व्यक्तीस्वातंत्र्य विसरून टप्प्याटप्प्याने कुटुंब, समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचा विचार करून वागणे, म्हणजेच टप्प्याटप्प्याने स्वेच्छेऐवजी परेच्छेने वागणे आणि शेवटी ईश्‍वरेच्छेने वागणे त्याच्याकडून अपेक्षित असते. असे वागला, तरच … Read more

भुकेला अन्न नसतांना घर हवे, यासाठी आरडाओरडा करणे

आतंकवाद्यांमुळे हिंदूंच्या ऐक्याची नितांत आवश्यकता असतांना, तसेच देशापुढे अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला असता स्त्रियांच्या मंदिरातील प्रवेशावर आंदोलन करणे, म्हणजे भुकेला अन्न नसतांना घर हवे, यासाठी आरडाओरडा करणे !

कृतघ्न मानव

धान्य, कपडे, वीज, दूरभाष, प्रवास इत्यादी सर्वांसाठी पैसे द्यावे लागतात; पण फुकट मिळणारे सूर्यकिरण आणि हवा यांबद्दल मानवाला देवाप्रती कृतज्ञता वाटत नाही ! इतका मानव कृतघ्न आहे ! कोणी छोटेसे साहाय्य केले, तरी साहाय्य घेणारा थँक यू (आभारी आहे), असे म्हणतो; पण देवाने आपल्याला जन्म दिला, बालपणी संगोपन करायला आई-वडील … Read more

हिंदू बुद्धीप्रमाण्यावाद्यांचे अनुकरण करतात

आंधळ्यापाठून चालत जावे, तसे काही हिंदू बुद्धीप्रमाण्यावाद्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे आंधळा खड्ड्यात पडल्यावर त्याच्या पाठून जाणारे खड्ड्यात पडतात, तसे ते हिंदू बुद्धीप्रामाण्याद्यांबरोबर अधोगतीला जात आहेत !

देव नाही असे म्हणणे हास्यास्पद

अशिक्षिताने सूक्ष्म जंतू नाहीत, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी देव नाही असे म्हणणे हास्यास्पद आहे !