भगवंताने परिपूर्ण अशा हिंदु धर्मात जन्म दिल्याबद्दल कृतज्ञता वाढत गेली !

हिंदु धर्माचा जितका अभ्यास करत गेलो, तितकी भगवंताने परिपूर्ण अशा हिंदु धर्मात जन्म दिल्याबद्दल कृतज्ञता वाढत गेली.’

गुरु-शिष्य नाते

ज्या नात्यात भांडणे होत नाहीत, असे एकच नाते जगात आहे आणि ते म्हणजे गुरु-शिष्य नाते.

कुठे बालवाडीप्रमाणे असलेले आणि संशोधन करणारे पाश्‍चात्त्यांचे विज्ञान, तर कुठे लाखो वर्षांपूर्वीच परिपूर्णता गाठलेले हिंदु धर्मातील विज्ञान !

‘येथे दिलेल्या खगोलशास्त्रातील एका उदाहरणावरून हे सूत्र लक्षात येईल. आकाशातील ग्रहांबद्दल विज्ञान जो शोध घेते, तो केवळ भौतिक दृष्टीने आहे. याउलट हिंदु धर्मातील विज्ञान ग्रहांच्या भौतिक माहितीसोबत ‘ग्रहांचा परिणाम काय होतो ? कधी होतो ? आणि दुष्परिणाम होणार असले, तर त्यावर उपाय काय ?’, असे सर्व सांगते. आधुनिक विज्ञानाच्या सर्वच शाखांच्या संदर्भात असेच आहे.’

आरक्षणाची मागणी करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

आरक्षणाची मागणी करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या ! ‘छ. शिवाजी महाराज, पेशवे, राणी लक्ष्मीबाई इत्यादी आरक्षणाने नव्हे, तर स्वकर्तृत्वाने मोठे झाले होते.’

पाश्‍चात्त्य वैद्यकीय प्रणाली कधी परिपूर्ण उपाय करू शकेल का ?

व्यक्तीची प्रकृती वात, पित्त कि कफ प्रधान आहे, तिचे प्रारब्ध काय आहे, हे ज्ञात नसणारी पाश्‍चात्त्य वैद्यकीय प्रणाली कधी परिपूर्ण उपाय करू शकेल का ?

स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्‍वरेच्छा

आपल्या इच्छेने जे करतो, ते योग्य कि अयोग्य, हे आपल्याला कळत नाही; म्हणून स्वेच्छा नको, तर साधनेत पुढे गेलेल्यांच्या मार्गदर्शनानुसार, म्हणजे परेच्छेने सर्व करावे. त्यातूनच पुढे ‘ईश्‍वरेच्छा म्हणजे काय’, हे कळते आणि प्रत्येक पाऊल ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने पडते.

मोक्षप्राप्ती व्हावी’, असे वाटणे आणि ‘धर्मकार्य करण्यासाठी पुन: पुन्हा जन्म मिळावा’, असे वाटते !

साधना करणारे ‘पुढचा जन्म नको साधना करून याच जन्मात मोक्षाला जाऊया’, अशी इच्छा बाळगतात, तर राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना ‘धर्मकार्य करण्यासाठी पुन: पुन्हा जन्म मिळावा’, असे वाटते. ही स्वेच्छा म्हटली, तरी ‘पुढचा जन्म नको’ हीदेखील स्वेच्छाच ठरते !

जेव्हा सनातन (हिंदु) धर्म अस्तित्वात आला, तेव्हापासून लाखो वर्षे इतर पंथ (धर्म) अस्तित्वातच नव्हते.

सनातन (हिंदु) धर्मात इतर धर्मियांप्रमाणे (पंथियांप्रमाणे) ‘इतर धर्मियांना (पंथियांना) आपल्या धर्मात आणणे’, असे नाही; कारण जेव्हा सनातन (हिंदु) धर्म अस्तित्वात आला, तेव्हापासून लाखो वर्षे इतर पंथ (धर्म) अस्तित्वातच नव्हते.

हिंदूंच्या मागच्या पिढ्यांनी सर्व धर्मसंपत्ती मातीमोल केली आहे

एका अब्जाधिशाच्या मुलाने त्याची सर्व संपत्ती उधळून टाकावी, तशी हिंदूंच्या मागच्या पिढ्यांनी सर्व धर्मसंपत्ती मातीमोल केली आहे !

भक्तीयोगात होत असलेली समष्टी साधना !

बर्‍याच जणांना वाटते की, भक्तीयोगात फक्त व्यष्टी साधना होते. प्रत्यक्षात तसे नसून भक्ताकडे इतर आकर्षिले जातात आणि त्याच्या मार्गदर्शनानुसार साधना करायला लागतात. त्यामुळे त्याची समष्टी साधनाही होते.