नोकरी किंवा व्यवसाय करतांना साधना होईल, असे करा !

यासंदर्भात थोडक्यात असे म्हणता येईल की, लायक आणि गरजू साधकांना, तसेच धार्मिक संस्थांना अल्प मूल्य घेऊन किंवा विनामूल्य साहाय्य करा. याची काही उदाहरणे येथे दिली आहेत.

१. शिक्षक : लायक आणि गरजू विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवणे
२. वैद्य : राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्‍यांवर विनामूल्य उपाय करणे
३. लेखापरीक्षक : संत, साधक, हिंदुत्ववादी, तसेच धार्मिक आणि आध्यात्मिक संस्था यांचे लेखा अहवाल विनामूल्य करणे. पुढे पैशांचा नाही, तर पाप-पुण्याचा हिशोब ठेवता आला पाहिजे.
४. अधिवक्ता : राष्ट्र आणि धर्म प्रेमींची, तसेच सात्त्विक जनांची बाजू मांडणे
५. साहित्यिक : राष्ट्र आणि धर्म यांचे वैचारिक हितरक्षण, तसेच यांसाठी कार्य करणार्‍या व्यक्ती, तसेच संघटना यांना वैचारिक पाठबळ मिळेल अशा साहित्याची निर्मिती करणे
६. व्यापारी : राष्ट्र आणि धर्म कार्य करणार्‍यांना लाभ न मिळवता वस्तू विकणे / अर्पण करणे किंवा धन अर्पण करणे
७. शेतकरी : राष्ट्र आणि धर्म कार्य करणार्‍यांना फळे, फुले आणि धान्य देणे