ईश्वरापासून दूर असलेला मानव म्हणजे आदिमानव !

ईश्वरापासून दूर असलेल्याला आदिमानव (जंगली मानव) म्हणतात. विविध युगांत मानवाची स्थिती पुढीलप्रमाणे होती.
१. सत्ययुग : अखंड साधनारत असल्याने देवाशी एकरूप असे.
२. त्रेतायुग : साधना थोडी अल्प होऊ लागल्याने वेद, उपनिषदे इत्यादींच्या माध्यमांतून ज्ञानयोगानुसार अध्यात्म आणि साधना शिकवावी लागली.
३. द्वापरयुग : ज्ञानयोगानुसार अध्यात्म समजणे आणि साधना करणे कठीण झाल्यामुळे पुराणांच्या माध्यमातून भक्तीयोग समजवावा लागला.
४. कलियुग : कलियुगात अधोगती होण्याची पुढील कारणे आहेत.
अ. ‘देवच नाही’, असे विज्ञानवादी आणि अंधश्रद्धा निर्मूलनवाले म्हणतात.
आ. व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांना आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) घातलेली बंधने चालतात; पण स्वेच्छेच्या आड येतात; म्हणून साधनेतील बंधने चालत नाहीत.
वरील दोघांच्या शिकवणीमुळे मानव अध्यात्म आणि साधना यांच्यापासून बराच दूर गेल्यामुळे खर्या अर्थाने कलियुगातील मानवच आदिमानव (जंगली मानव) होत आहे !

Leave a Comment