कुठे आता कार्य उरले नसल्याने पृथ्वीवरील जीवनाचा कंटाळा आल्यासारखे वाटणारे प.पू. डॉक्टर, तर कुठे युगानुयुगे कार्य करणारा ईश्‍वर, सर्व देवता आणि अनेक ऋषी !

हिंदु राष्ट्राची, म्हणजे रामराज्याची स्थापना होणार, याची खात्री अनेक संत आणि नाडी भविष्य सांगणारे ऋषी यांनी मला दिली आहे. त्यामुळे आता करण्यासारखे काही कार्य उरले नसल्याने मला पृथ्वीवरील जीवनाचा कंटाळा आल्यासारखे झाले. तेव्हा विश्‍वाचा निर्माता ईश्‍वर, सर्व देवता आणि अनेक ऋषी यांनी सत्त्वप्रधान राज्याची स्थापना करण्यासाठी युगानुयुगे कार्य केले आहे, … Read more

वाचकसंख्या वाढावी यासाठी सनातन प्रभातमध्ये लेख आणि सदरे छापत नाहीत,…

वाचकसंख्या वाढावी यासाठी सनातन प्रभातमध्ये लेख आणि सदरे छापत नाहीत, तर वाचकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली व्हावी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यास त्यांना दिशा मिळावी, यांसाठी असतात.

म्हणून मी नेहमी आनंदात असतो.

मी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे प्रयत्न कर्मफलाची अपेक्षा न करता कर्मयोगाप्रमाणे करतो. कर्मफलाकडे ज्ञानयोगानुसार साक्षीभावाने पहातो, तर भक्तीयोगाप्रमाणे सर्व ईश्‍वरेच्छेने होते, हे ज्ञात असल्यामुळे कर्मफलाचे विचार करत नाहीत; म्हणून मी नेहमी आनंदात असतो.

इतर सर्व धर्मांचे संस्थापक आहेत; पण हिंदु धर्माचा कोणीच संस्थापक नसण्याची कारणे

बौद्ध, जैन, ईसाई, इस्लाम इत्यादी धर्मांचे (खरे तर संप्रदायांचे) संस्थापक आहेत; पण हिंदु धर्माचा कोणीच संस्थापक नाही. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. १. धर्म इतका अथांग आहे की, कोणी एक त्याची स्थापना करू शकत नाही. २. धर्मात कालमहात्म्यानुसार जो पालट होतो, तो सांगायला इतर धर्मांचे संस्थापक जिवंत नसतात. उलट हिंदु धर्मात … Read more

संत नेहमी आनंदी असतात

‘आपल्या मुलाचे पुढे कसे होणार ?’, ही काळजी त्याच्या आई-वडिलांना असते. याउलट ‘राष्ट्रातील सर्वजण आपलीच मुले आहेत’, या व्यापक भावामुळे संत नेहमी आनंदी असतात.’

खरी वास्तुशुद्धी !

१. सर्वसाधारण व्यक्ती : यांना आपण रहातो ती वास्तू, असे वाटते आणि तिच्यासाठी आवश्यक असल्यास ते वास्तुशुद्धी विधी करतात. २. व्यष्टी साधना करणारे : यांना शरीर, मन आणि बुद्धी ही आत्म्याची वास्तू वाटते आणि ते त्यांच्या शुद्धीसाठी प्रयत्न करतात. ३. समष्टी साधना करणारे : यांना राष्ट्र ही वास्तू वाटते आणि … Read more

श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी सनातन धर्म राज्याची स्थापना केली

श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी सनातन धर्म राज्याची स्थापना केली. ते अवतारी कार्य होते. आता हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना होणार आहे, ती कालमहिम्यानुसार होणार आहे. त्यामुळे त्याचे श्रेय कोणाला घेता येणार नाही.’