देहली येथे पाकिस्तानी आतंकवाद्याला अटक

देहली पोलिसांच्या विशेष शाखेने देहलीतून एका पाकिस्तानी आतंकवाद्याला अटक केली. महंमद अशरफ उपाख्य अली असे याचे नाव असून तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एके-४७ रायफल, १ हातबॉम्ब, २ अत्याधुनिक पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत. Read more »

(म्हणे) ‘आर्यन खान मुसलमान असल्याने त्याला त्रास दिला जात आहे !’ – मेहबूबा मुफ्ती

अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला यासाठीच त्रास दिला जात आहे कारण तो मुसलमान आहे, अशा आशयाचे ट्वीट जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. आर्यन खान याच्या जामिनाच्या अर्जावर १३ ऑक्टोबर या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे. Read more »

बागपत (उत्तरप्रदेश) येथील एका गावामध्ये गायींच्या शरिरावर ‘७८६’ लिहिल्याने तणाव !

अंगदपूर-जहौरी गावामध्ये गायींवर ‘७८६’ हा आकडा लिहिण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने येथे तणाव निर्माण झाला. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, काही धर्मांधांनी २-३ बेवारस गायींना पकडून त्यांच्यावर मेहंदीद्वारे ‘७८६’ आकडा लिहून त्यांना सोडून दिले. Read more »

लडाखमधून सैन्य माघारी घेण्याच्या भारताच्या मागणीला चीनचा नकार !

भारत आणि चीन यांच्या सैन्यांमध्ये लडाखमधील आपापले सैन्य माघार घेण्याविषयी १० ऑक्टोबर या दिवशी झालेल्या बैठकीमध्ये चीनने सैन्य माघार घेण्याचा प्रस्ताव नाकारला. चीन सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने याविषयी चीन सैन्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, भारताने अवास्तव मागण्यांवर जोर दिला होता. Read more »

भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आदींच्या सन्मानासाठी केंद्र सरकारने संसदेत कायदा करावा ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, तसेच रामायण, श्रीमद्भगवद्गीता, रामायण लिहिणारे महर्षि वाल्मीकि आणि महर्षि व्यास हे देशाच्या सांस्कृतिक वारशाचे अविभाज्य भाग आहेत. देशाच्या संसदेमध्ये यासंदर्भातील कायदा संमत करून त्यांना राष्ट्रीय स्तरावर सन्मान दिला गेला पाहिजे, अशी सूचना अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली. Read more »

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयातील विद्यार्थ्यांना वैदिक काळातील कायद्यांचे शिक्षण मिळणार !

सध्याच्या कायद्यांमधील पळवाटांमुळे गुन्हेगार सुटतात; पण प्राचीन भारतीय न्यायव्यवस्थेत असे होणे शक्य नव्हते. हे लक्षात घेऊन बनारस हिंदु विश्‍वविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना वैदिक काळातील कायदे शिकवण्यात येणार आहेत. Read more »

जम्मू-काश्मीर आणि कर्नाटक येथील इस्लामिक स्टेटच्या १८ ठिकाणांवर एन्.आय.ए.चे छापे

यांत इस्लामिक स्टेटच्या ‘व्हॉईस ऑफ हिंद’ या ऑनलाईन नियतकालिकाचा जुफरी जवाहर दामुडी याला अटक करण्यात आली. Read more »

बांगलादेशात नवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर अज्ञातांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची तोडफोड !

कुश्तिया शहरात श्री दुर्गादेवीच्या पूजेसाठी बनवण्यात आलेल्या मूर्तींची तोडफोड केल्याचे वृत्त बांगलादेशातील ‘ढाका ट्रिब्यून’ या दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. जिल्हा पूजा उत्सव समितीचे अध्यक्ष अधिवक्ता अनुप कुमार नंदी म्हणाले की, बुधवारी सकाळी आम्हाला मूर्ती तुटलेल्या स्थितीत आढळल्यानंतर आम्ही लगेच पोलिसांना कळवले. Read more »

‘बायजू’ या आस्थापनाने शाहरुख खान यांची विज्ञापने थांबवली !

शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यानंतर ‘बायजू‘ (बीवायजेयू) या शैक्षणिक आस्थापनाने शाहरुख खान यांची सर्व विज्ञापने थांबवली आहेत. Read more »

काश्मीरमध्ये हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांमागील कारण हे अतिक्रमणमुक्त होत असलेली हिंदूंची संपत्ती !

 गेल्या ४ दिवसांत श्रीनगरमध्ये २ हिंदू आणि २ शीख यांच्या जिहादी आतंकवाद्यांकडून हत्या झाल्यानंतर काश्मीरमध्ये पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. मुसलमानेतरांवरील या आक्रमणांच्या मागे हिंदूंच्या संपत्तीवर झालेले अतिक्रमण सोडवण्याचा चालू झालेला प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​