पाकमध्ये ईशनिंदेच्या प्रकरणी ८ वर्षांच्या हिंदु मुलाला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता !

पाकमध्ये एका मदरशाच्या पुस्तकालयामध्ये लघवी केल्याच्या कथित आरोपावरून अटक करण्यात आलेल्या ८ वर्षांच्या हिंदु मुलाला ईशनिंदा कायद्याद्वारे फाशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ईशनिंदेच्या आरोपाखाली पाकच्या न्यायालयात विविध व्यक्तींवर खटले चालू असून या प्रकरणातील आरोपी असणारा सदर हिंदु मुलगा देशातील सर्वांत लहान वयाचा आरोपी ठरला आहे. Read more »

बांगलादेशातील खुलना जिल्ह्यात शेकडो धर्मांधांकडून हिंदूंच्या १० मंदिरांवर आक्रमण आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

धर्मांधांनी हिंदूंची ५६ घरे आणि अनेक दुकाने यांच्यावरही आक्रमण करत ती लूटली. धर्मांधांनी हिंदूंवर धारदार शस्त्रांनी आक्रमण करत त्यांना घायाळ केले. तेथील गायी आणि अन्य पाळीव प्राणी यांनाही पळवून नेले. या घटनेनंतर स्थानिक पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली. सध्या गावात मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. Read more »

पाक सरकार हिंदूंचे मंदिर जाळणार्‍या ३५० जणांवरील गुन्हे मागे घेणार !

गेल्या वर्षी येथे एक हिंदु मंदिर जाळल्याच्या प्रकरणी पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारने ३५० आरोपींवरील गुन्हा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने दावा केला आहे, ‘स्थानिक हिंदूंनी या आरोपींना क्षमा केल्याने त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात येत आहेत.’ Read more »

स्कॉटलंड येथे ‘एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय महोत्सवा’त सादर करण्यात येणार हिंदु देवतांचे विडंबन असणारे नाटक !

स्कॉटलंड येथील एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय महोत्सवात हिंदु देवतांचे विडंबन करणारे ‘हिंदु टाइम्स’ नावाचे नाटक सादर करण्यात येणार आहे. हा महोत्सव २० आणि २१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत होणार आहे. Read more »

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे एका साधूची दगडांनी ठेचून हत्या

मेरठ येथील बढला गावामध्ये साधू चंद्रपाल यांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ते येथील एका मंदिरात रहात होते. येथेच त्यांची दगडांनी ठेचून हत्या करण्यात आली आहे. ते गेल्या १० – १२ वर्षांपासून गावात रहात होते. Read more »

पुडुकोट्टई (तमिळनाडू) येथे अज्ञातांकडून प्राचीन शिवलिंग आणि भगवान शिवाच्या मूर्तीची तोडफोड

मंदिर चोल राजाच्या काळात बांधण्यात आले आहे. या मंदिरात श्री गणेश, पार्वतीदेवी, भगवान मुरुगन, भगवान श्रीकृष्ण आणि नंदी यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराचे दार नेहमीच उघडे ठेवलेले असते. त्यामुळेच अज्ञातांनी याचा अपलाभ घेतल्याचे म्हटले जात आहे. Read more »

बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील श्री हनुमान मंदिराच्या परिसरात ७० वर्षीय पुजार्‍याची धारदार शस्त्राने हत्या !

बाराबंकी  येथील खमौली गावातील श्री हनुमान मंदिरातील पुजार्‍याची मंदिराच्या परिसरात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. सुरेशचंद्र चौहान (वय ७० वर्षे) असे या पुजार्‍याचे नाव आहे. Read more »

दंतेवाडा (छत्तीसगड) येथील काँग्रेसच्या धर्मांध नेत्याकडून फेसबूकवर हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह पोस्ट

दंतेवाडा  येथील किरंदुल पोलीस ठाण्याच्या सीमेमध्ये काँग्रेसी नेता बबलू सिद्दकी याने सामाजिक माध्यमांतून हिंदूंच्या देवतांच्या विरोधात पोस्ट शेअर केल्याने त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सिद्दकी सध्या पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​