पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना जामीन का नाही ?

दूरचित्रवाहिन्यांवरील अभिनेता पर्ल पुरी याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. वसई सत्र न्यायालयाने पुरी याला जामीन दिल्यामुळे पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांच्या भक्तांनी याविरोधात सामाजिक माध्यमांतून संताप व्यक्त केला आहे. Read more »

उत्तरप्रदेश पोलिसांचा ‘ट्विटर’, काँग्रेसचे नेते, पत्रकार आदी ९ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद

गाझियाबाद येथील पोलिसांनी लोणी बॉर्डरवर अब्दुल समद या वृद्ध  मुसलमान व्यक्तीला झालेल्या मारहाणीच्या आणि बलपूर्वक दाढी कापण्याच्या प्रकरणाला धार्मिक रंग दिल्यावरून ‘ट्विटर’सह ९ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. यात पत्रकार महंमद झुबैर आणि राणा आयुब यांनी याविषयी ट्वीट केल्याने त्यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Read more »

इन्स्टाग्रामने हिंदु देवतांची आक्षेपार्ह चित्रे हटवली !

 इन्स्टाग्राम वापरकर्त्यांनी पोस्ट केलेली हिंदूंच्या देवतांची आक्षेपार्ह चित्रे आम्ही काढून टाकली आहेत, अशी माहिती इन्स्टाग्रामकडून देहली उच्च न्यायालयात देण्यात आली आहे. न्यायालयाने या प्रकरणी इन्स्टाग्राम आणि त्याची मालकी असणार्‍या फेसबूकला नोटीस बजावून या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. ‘नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांचे पालन आस्थापनाकडून केले जात आहे कि नाही ?’ यासंदर्भातही न्यायालयाने विचारणा केली आहे. Read more »

‘फेसबूक’ला हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि मान्यवर यांच्या ‘पेज’वरील बंदी उठवण्यास भाग पाडा !

भारतीय लोकशाहीने दिलेल्या विचारस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा प्रकार आहे. ‘फेसबूक’कडून घालण्यात आलेली ही अन्याय्य बंदी उठवण्यास ‘फेसबूक’ला भाग पाडा, असे आवाहन पनवेल येथील धर्मप्रेमी श्री. गिरीश ढवळीकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केले आहे. Read more »

#Facebook_Targets_HJS हॅशटॅग राष्ट्रीय स्तरावर तृतीय स्थानावर !

 गेल्या काही मासांमध्ये फेसबूकने हिंदुत्वाचा प्रसार करण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न चालवला आहे. फेसबूकने आतापर्यंत सनातन संस्था, सुदर्शन टीव्ही, सुरेश चव्हाणके, भाजपचे आमदार टी. राजासिंह आदी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नेते यांच्या पानांवर बंदी घातली आहे. आता सनातन प्रभात, सनातन शॉप तसेच हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून राष्ट्र आणि धर्म यांसाठी चालवण्यात येणारी पानेही बंद करण्यात आली आहेत. Read more »

रेवाडी (हरियाणा) येथे १० वर्षांच्या मुलीवर ७ जणांकडून सामूहिक बलात्कार

रेवाडी येथे १० वर्षांच्या मुलीवर ७ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या ७ जणांपैकी केवळ १ जण १८ वर्षांचा असून अन्य सर्वजण १० ते १२ वर्षांचे आहेत. या आरोपींनी बलात्कार करतांना त्याचे चित्रीकरण करून व्हिडिओही बनवला. हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. Read more »

फेसबूककडून आता हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदी’ पानही बंद !

फेसबूककडून हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु अधिवेशन’, तसेच ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ‘सनातन प्रभात’ आणि सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादनांची विक्री करणारे ‘सनातन शॉप’ ही फेसबूक पाने बंद करण्यात आल्यानंतर या संदर्भात हिंदु जनजागृती समिती, सनातन प्रभात आणि सनातन संस्था यांच्याकडून पत्रे पाठवण्यात आली आहेत; मात्र याविषयी फेसबूककडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. Read more »

हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदू अधिवेशन’, तसेच ‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन शॉप’ यांच्या पानांवर बंदी !

 हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदू अधिवेशन’, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ‘सनातन प्रभात’ आणि सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची विक्री करणारे ‘सनातन शॉप’ ही फेसबूक पाने फेसबूककडून बंद (अनपब्लिश) करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन शॉप’ यांची पाने पूर्णतः काढून टाकण्यात आली आहेत. याविषयीची कोणतीही कल्पना किंवा कारण फेसबूककडून हिंदु जनजागृती समिती किंवा सनातन प्रभात यांना देण्यात आलेले नाही. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​