देहलीमधील एका उड्डाणपुलावर अवैधरित्या बांधण्यात आली मजार !

नवी देहली – येथील आझादपूरमधील एका उड्डाणपुलावर अवैधरित्या छोटी मजार (इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी) बनवण्यात आल्याने वाहतुकीला समस्या निर्माण झाली आहे, असे वृत्त ‘टीव्ही९ भारतवर्ष’ या वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे. Read more »

‘कृष्णभक्ती’ करण्यासाठी हरियाणातील IPS अधिकारी भारती अरोरा घेणार स्वेच्छा निवृत्ती !

संत मीराबाईंप्रमाणे कृष्णभक्तीमध्ये जीवन व्यतीत करण्यासाठी हरियाणाच्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी भारती अरोरा यांनी स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी आवेदन दिले आहे. अरोरा यांना त्यांचे उर्वरित आयुष्य धार्मिक कार्यात व्यतीत करायचे आहे. यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. Read more »

अररिया (बिहार) येथील एका शाळेच्या धर्मांध मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

अररिया येथील महलगावातील एका शाळेचा मुख्याध्यापक रौशन जमीर याला एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. या विद्यार्थिनीला कपडे आणि अन्य वस्तू देण्याचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप जमीर याच्यावर करण्यात आला आहे. Read more »

केवळ एकच मूल जन्माला घातल्यास हिंदूच हिंदूंची लोकसंख्या न्यून करतील ! – विश्‍व हिंदु परिषद

जर कुटुंबामध्ये एकच मूल असेल, तर हिंदू स्वतःहून हिंदूंची लोकसंख्या न्यून करतील. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणावर विचार करतांना हिंदूंचे प्रभुत्व  कायम राहील, याचा विचार हिंदूंनी केला पाहिजे; कारण हिंदूंच्या लोकसंख्येच्या प्रभुत्वामुळे देशातील राजकारण, धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुता यांचे संचालन केले जात आहे, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना मांडले. Read more »

देशाला समान नागरी कायद्याची आवश्यकता असल्याने केंद्रशासनाने प्रयत्न करावेत ! – देहली उच्च न्यायालय

आपला देश आता धर्म, जातपात, समाज, समुदाय यांच्या जोखडातून मुक्त झाला आहे. जलद गतीने होणार्‍या या पालटांमुळे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे आता देशाला खर्‍या अर्थाने समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे, असे मत देहली उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना मांडले. Read more »

अयोध्येच्या विकासाच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्येच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘अयोध्या विकास प्राधिकरणा’ची २७ जून या दिवशी ऑनलाईन आढावा बैठक घेण्यात आली. Read more »

माजी क्रिकेटपटू हरभजनसिंह यांनी खलिस्तानी आतंकवादी जर्नलसिंह भिंद्रनवाले यास ‘हुतात्मा’ ठरवले !

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजनसिंह यांनी ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमांवर खलिस्तानी आतंकवादी जर्नल सिंह भिंद्रनवाले याच्या मृत्यूदिनाच्या निमित्ताने त्याला श्रद्धांजली अर्पण करत त्याला ‘हुतात्मा’ म्हटले आहे. यामुळे हरभजनसिंह यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका केली जात आहे. यावर हरभजनसिंह यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. Read more »

नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी प्रतिदिन घरामध्ये हवन करा ! – खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी

भाजपच्या खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांनी कोरोनाला पराजित करण्यासाठी प्रतिदिन घरामध्ये हवन करण्याचे आवाहन केले आहे. हवनामुळे नकारात्मक शक्ती दूर होते, असा दावा त्यांनी केला आहे. Read more »

बाललैंगिकतेचा प्रसार करणार्‍या ‘बॉम्बे बेगम्स’ वेब सीरिजवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समिती

‘या प्रकरणाची शासनाने गंभीर नोंद घेऊन ‘बॉम्बे बेगम्स’ या वेब सीरिजवर त्वरित बंदी घालावी, तसेच या वेब सीरिजचे निर्माते अन् प्रसारक ‘नेटफ्लिक्स’ यांच्यावरही ‘बाल न्याय अधिनियम २०१५’ कलम ७७ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा प्रविष्ट करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. यासाठी समितीने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, तसेच ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग’ यांच्याकडे ई-मेलद्वारे निवेदन पाठवले आहे. Read more »

कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर कोरोनाचा उल्लेख का केला जात नाही ? – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न

कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर कोरोनाचा उल्लेख का केला जात नाही ? जर सरकारने अशांच्या नातेवाइकांसाठी एखादी योजना लागू केली, तर त्यांना त्याचा लाभ कसा मिळेल ?, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​