आदर्श व्यवस्थेसाठी प्रत्येकाने जागरूक राहून संविधानिक मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, समन्वयक, ‘सुराज्य अभियान’, हिंदु जनजागृती समिती

भारतात प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळी असलेली आदर्श व्यवस्था निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे समन्वयक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले. Read more »

हिंदुविरोधी प्रसिद्धीमाध्यमांच्या षड्यंत्राच्या विरोधात धर्माभिमान्यांचा #Hinduphobic_Media हा ट्विटर ट्रेंड !

प्रसिद्धीमाध्यमे आणि फेसबूक यांच्याकडून संघटितपणे एका षड्यंत्राद्वारे हिंदूंचे दमन करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. या षड्यंत्राच्या विरोधात हिंदु धर्माभिमान्यांकडून २७ जून या दिवशी  #Hinduphobic_Media नावाने हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला होता. तो राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ५ व्या क्रमांकावर होता. त्यावर ३६ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या. Read more »

हिंदु धर्मप्रेमींकडून हिंदुद्वेषी फेसबूकवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी ट्विटरवर ट्रेंड !

झाकीर नाईककडून हिंदु धर्म, देवता आदींचा अवमान करणारे फेसबूक पान चालवले जाते. यावर फेसबूककडून बंदी घालण्यात आलेली नाही; मात्र हिंदु धर्माचा प्रसार करणारी, तसेच हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या संघटनांची पाने फेसबूककडून बंद करण्यात आली आहेत. Read more »

‘फेसबूक’ला हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि मान्यवर यांच्या ‘पेज’वरील बंदी उठवण्यास भाग पाडा !

भारतीय लोकशाहीने दिलेल्या विचारस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा प्रकार आहे. ‘फेसबूक’कडून घालण्यात आलेली ही अन्याय्य बंदी उठवण्यास ‘फेसबूक’ला भाग पाडा, असे आवाहन पनवेल येथील धर्मप्रेमी श्री. गिरीश ढवळीकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केले आहे. Read more »

#Facebook_Targets_HJS हॅशटॅग राष्ट्रीय स्तरावर तृतीय स्थानावर !

 गेल्या काही मासांमध्ये फेसबूकने हिंदुत्वाचा प्रसार करण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न चालवला आहे. फेसबूकने आतापर्यंत सनातन संस्था, सुदर्शन टीव्ही, सुरेश चव्हाणके, भाजपचे आमदार टी. राजासिंह आदी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नेते यांच्या पानांवर बंदी घातली आहे. आता सनातन प्रभात, सनातन शॉप तसेच हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून राष्ट्र आणि धर्म यांसाठी चालवण्यात येणारी पानेही बंद करण्यात आली आहेत. Read more »

फेसबूककडून आता हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदी’ पानही बंद !

फेसबूककडून हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु अधिवेशन’, तसेच ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ‘सनातन प्रभात’ आणि सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादनांची विक्री करणारे ‘सनातन शॉप’ ही फेसबूक पाने बंद करण्यात आल्यानंतर या संदर्भात हिंदु जनजागृती समिती, सनातन प्रभात आणि सनातन संस्था यांच्याकडून पत्रे पाठवण्यात आली आहेत; मात्र याविषयी फेसबूककडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. Read more »

प्रसारमाध्यमांच्या गुलामी मानसिकतेने घातलेला सेक्युलरवादाचा बुरखा हटवणे आवश्यक ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन न्यूज’

पत्रकारितेमध्ये हिंदुत्वाची बाजू मांडणारे पत्रकार मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. हिंदूंवर झालेल्या अत्याचारांना सेक्युलरवादी प्रसारमाध्यमे ‘कायदा सुव्यवस्थेचे प्रकरण’ असे नाव देतात. देशात धर्मांधांनी गृहयुद्ध आधीच छेडले आहे. भीतीमुळे, गुलामी मानसिकता असलेल्या प्रसारमाध्यमांतील लोकांनी सेक्युलरवादाचा बुरखा घातला आहे. हा बुरखा हटवण्याची आवश्यकता आहे, असे रोखठोक प्रतिपादन ‘सुदर्शन न्यूज’चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले. Read more »

हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदू अधिवेशन’, तसेच ‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन शॉप’ यांच्या पानांवर बंदी !

 हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदू अधिवेशन’, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ‘सनातन प्रभात’ आणि सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची विक्री करणारे ‘सनातन शॉप’ ही फेसबूक पाने फेसबूककडून बंद (अनपब्लिश) करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन शॉप’ यांची पाने पूर्णतः काढून टाकण्यात आली आहेत. याविषयीची कोणतीही कल्पना किंवा कारण फेसबूककडून हिंदु जनजागृती समिती किंवा सनातन प्रभात यांना देण्यात आलेले नाही. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​