#Facebook_Targets_HJS हॅशटॅग राष्ट्रीय स्तरावर तृतीय स्थानावर !

 गेल्या काही मासांमध्ये फेसबूकने हिंदुत्वाचा प्रसार करण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न चालवला आहे. फेसबूकने आतापर्यंत सनातन संस्था, सुदर्शन टीव्ही, सुरेश चव्हाणके, भाजपचे आमदार टी. राजासिंह आदी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नेते यांच्या पानांवर बंदी घातली आहे. आता सनातन प्रभात, सनातन शॉप तसेच हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून राष्ट्र आणि धर्म यांसाठी चालवण्यात येणारी पानेही बंद करण्यात आली आहेत. Read more »

फेसबूककडून आता हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदी’ पानही बंद !

फेसबूककडून हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु अधिवेशन’, तसेच ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ‘सनातन प्रभात’ आणि सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादनांची विक्री करणारे ‘सनातन शॉप’ ही फेसबूक पाने बंद करण्यात आल्यानंतर या संदर्भात हिंदु जनजागृती समिती, सनातन प्रभात आणि सनातन संस्था यांच्याकडून पत्रे पाठवण्यात आली आहेत; मात्र याविषयी फेसबूककडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. Read more »

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांविरोधात लढण्यासाठी अधिवक्त्यांनी पुढाकार घ्यावा ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय

 समाजात सध्या चालू असलेले अपप्रकार, तसेच हिंदु धर्म, देवता यांचा विविध माध्यमांतून होणारा अवमान, हिंदूंवर कट्टरतावादी धर्मांधांकडून होणारी आक्रमणे या सर्वांच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करणे, प्रशासनाला निवेदने देणे आणि पोलिसांत तक्रारी प्रविष्ट करणे आदी सर्व गोष्टी अधिवक्त्यांच्या वतीने होऊ शकतात. यांसह दंगलग्रस्त भागातील पीडित हिंदू आणि गोरक्षक आदी सर्व हिंदू बांधवांना अधिवक्ते वेळोवेळी साहाय्य देऊ शकतात. अधिवक्ते करत असलेल्या कार्याला त्यांनी साधनेची जोड द्यायला हवी. ईश्‍वरावर निष्ठा असेल, तर अशक्यही शक्य होऊ शकते. राष्ट्र-धर्मावर होत असलेल्या आघातांविरोधात लढण्यासाठी अधिवक्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य आणि मुंबई उच्च न्यायालयाचे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी केले. Read more »

समाजात राष्ट्र आणि धर्म यांचे संस्कार करण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे ! – वैद्य सुविनय दामले, राष्ट्रीय गुरु, आयुष मंत्रालय

 उच्च, नीच, धर्म, जाती, गरीब, श्रीमंत असा कोणताच भेद नसलेले सर्वसमावेशक असे एक छत म्हणजे ‘सनातन संस्था’ आहे आणि तिचे मुखपत्र म्हणजे दैनिक ‘सनातन प्रभात’ होय. जसे अन्न, वस्त्र, निवारा या प्रत्येकाच्या प्राथमिक गरजा आहेत, तसेच राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम प्रत्येकामध्ये असणे आवश्यक आहे. हे राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम निर्माण करण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे, असे प्रतिपादन आयुष मंत्रालयाचे राष्ट्रीय गुरु आणि कुडाळ येथील प्रथितयश वैद्य सुविनय दामले यांनी केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​