(म्हणे) ‘शालेय अभ्यासक्रमात ‘श्रीमद्भगवद्गीते’चा समावेश करणार नाही !’

राज्यातील शालेय शिक्षणात श्रीमद्भगवद्गीता आणि संतसाहित्य यांचा समावेश करण्याची मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी राज्य सरकारकडे केली होती; मात्र शिक्षणमंत्र्यांनी ही मागणी फेटाळली आहे. Read more »

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा अस्तित्वात आणणार ! – पुष्करसिंह धामी, मुख्यमंत्री

मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर धामी यांनी ‘आमचे सरकार समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आराखडा सिद्ध करणार असून त्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे’, असेही सांगितले. Read more »

देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवली जावी !

भावी पिढीवर योग्य प्रकारचे संस्कार व्हावेत, यासाठी महाराष्ट्रातील शाळांमध्ये शैक्षणिक पाठ्यपुस्तकांत श्रीमद्भगवद्गीता शिकवली जावी, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत २२ मार्च या दिवशी केली. Read more »

हरियाणा शासनाकडून धर्मांतरबंदी कायदा संमत : काँग्रेसचा सभात्याग

या कायद्यानुसार आता बळजोरी, प्रलोभन किंवा कोणत्याही फसव्या मार्गाने धर्मांतर करणे गुन्हा ठरणार आहे. या गुन्ह्यानुसार आरोपीला १ ते ५ वर्षांपर्यंत कारागृहाची, तसेच १ लाख रुपयांहून अधिक रकम भरण्याच्या शिक्षेचे प्रावधान आहे. यापूर्वी हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांनी धर्मांतरबंदी कायदा संमत केला आहे. Read more »

नदिया (बंगाल) येथे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून परतणार्‍या भाजपच्या खासदाराच्या वाहनावर बाँबफेक

नदिया (बंगाल) येथील भाजपचे खासदार जगन्नाथ सरकार यांनी आरोप केला की, ते येथे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून घरी परतत असतांना त्यांच्या वाहनावर बाँब फेकण्यात आला. वाहन वेगात असल्याचे हा बाँब गाडीच्या मागे पडल्याने आम्ही बचावलो. यात कोणतीही हानी झाली नाही. Read more »

गुजरातमध्ये शालेय अभ्यासक्रमात श्रीमद्भगवद्गीतेचा समावेश !

गुजरात सरकारने पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात शिक्षणमंत्री जितू वाघानी यांनी ही घोषणा केली. Read more »

वाई (जिल्हा सातारा) येथे चित्रपट प्रदर्शित करावा ! – भाजपची चित्रपटगृह व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे मागणी

‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काश्मीर येथील हिंदूंवर झालेल्या अत्याचारावर आधारीत सत्य परिस्थिती सांगणारा ज्वलंत ऐतिहासिक चित्रपट आहे. हा इतिहास भारतियांपासून लपवण्यात आला असून या इतिहासाची माहिती सर्वसामान्य जनतेला होणे आवश्यक आहे. Read more »

(म्हणे) ‘काश्मीरमध्ये ३९९ हिंदूंच्या, तर १५ सहस्र मुसलमानांच्या हत्या झाल्या !’

ज्यांनी काश्मिरी हिंदूंना लक्ष्य केले, ते आतंकवादी होते. वर्ष १९९० ते २००७ या १७ वर्षांच्या कालावधीत आतंकवादी आक्रमणात ३९९ काश्मिरी हिंदूंची, तर १५ सहस्र मुसलमानांची हत्या करण्यात आली, असे हिंदुद्वेषी ट्वीट केरळमधील काँग्रेसने त्यांच्या अधिकृत टि्वटर खात्यावरून केले. Read more »

मतदारसंघात मांसविक्रीची दुकाने आणि उपाहारगृहे दिसता कामा नयेत !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) अनुमतीखेरीज लोणी येथे एकही मांसविक्रीचे दुकान आणि उपाहारगृह दिसता काम नये; कारण येथे रामराज्य आहे, अशी चेतावणी लोणी येथील भाजपचे नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी सरकारी अधिकार्‍यांना दिली. Read more »

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करू ! – मावळते मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

उत्तराखंडमध्ये भाजपचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर समान नागरी कायदा राज्यात लागू करू, असे प्रतिपादन उत्तराखंडमधील भाजपचे मावळते मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​