बांगलादेशात हिंदूंच्या मंदिरात कुराण ठेवण्याच्या प्रयत्नात असणार्‍या धर्मांधाला अटक

 येथील हबीबगंजमधील चौधरी बाजारातील हिंदूंच्या मंदिरात लपूनछपून कुराण ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या मीजान नावाच्या धर्मांध तरुणाला पोलिसांनी अटक केली. मंदिरात कुराण नेण्याच्या प्रयत्नामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. Read more »

बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा !

बांगलादेशात शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि ‘इस्कॉन’ मंदिरांवर आक्रमणे करणार्‍या, तसेच हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांड घडवणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले Read more »

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाच्या निषेधासाठी दिवाळीत भारतातील हिंदू काही वेळ दिवे बंद करतील, अशी आशा ! – तस्लिमा नसरीन

बांगलादेशातील बंगाली हिंदूंच्या एकजुटीसाठी आणि दुर्गापूजेच्या मंडपांच्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी, भारतातील हिंदू दिवाळीत काही वेळ दिवे बंद करतील, अशी आशा आहे, असे ट्वीट बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले आहे. Read more »

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या निषेधार्थ ‘इस्कॉन’कडून १५० देशांतील ७०० मंदिरांजवळ आंदोलने !

 बांगलादेशात धर्मांधांकडून हिंदूंवर केलेल्या आक्रमणांच्या विरोधात २३ ऑक्टोबर या दिवशी ‘इस्कॉन’ (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस) या संस्थेने १५० देशांतील त्यांच्या ७०० मंदिरांजवळ निषेध आंदोलने केली. या वेळी धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. Read more »

बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार आणि सीमा सुरक्षा दलाचे अधिकार !

‘वर्ष १९५० च्या जनगणनेप्रमाणे पूर्वी बांगलादेशमध्ये (तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानमध्ये) २४ टक्के हिंदू होते. आज त्यांची संख्या ८ टक्क्यांहूनही अल्प झाली आहे. वर्ष १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सैन्याने ३० ते ४० लाख हिंदूंना ठार मारले. Read more »

हिंदूंची मंदिरे आणि हिंदू यांवर आक्रमणे करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – नागेंद्रदास प्रभू, इस्कॉन

बांगलादेश येथे झालेल्या घटनेचा भारत सरकार, भारतातील हिंदू यांनी कठोर विरोध करावा आणि या विरोधात होणार्‍या आंदोलनांमध्ये सहभागी व्हावे. या प्रकरणी हिंदूंची मंदिरे आणि हिंदू यांवर आक्रमणे करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही भारत सरकारकडे करतो, असे आवाहन ‘इस्कॉन’चे श्री. नागेंद्रदास प्रभू यांनी केले. Read more »

बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडप आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी !

बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडप आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर आक्रमण करणार्‍या, तसेच हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांडे घडवणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा,  या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना २० ऑक्टोबर या दिवशी निवेदन देण्यात आले. Read more »

बांगलादेशमध्ये गेल्या ४० वर्षांत हिंदूंच्या लोकसंख्येत ५ टक्के घट !

गेल्या ४० वर्षांत बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या ५ टक्क्यांनी घटून ती आता ८.५ टक्के इतकी राहिली आहे. बांगलादेशी हिंदू मोठ्या संख्येने भारतात पलायन येत आहेत. पंतप्रधान शेख हसीना स्वत:ची ओळख ‘धर्मनिरपेक्ष’ अशी सांगून हिंदूंना संरक्षण देण्याचे आश्‍वासन देत आल्या आहेत; परंतु सध्याच्या हिंदूंवरील आक्रमणांच्या घटना रोखण्यास त्याना यश आलेले नाही. Read more »

बांगलादेश येथील दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई करा ! – बजरंग दलाचे मिरज येथे निवेदन

बांगलादेशातील अल्पसंख्यांक शीख आणि हिंदू यांवर आक्रमण करणार्‍या दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई होण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशा मागणीचे निवेदन बजरंग दलाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयात देण्यात आले. Read more »

बांगलादेशात हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा ! – नाशिक येथील हिंदुत्वनिष्ठांची मागणी

बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडप आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे येथील हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनाद्वारे केली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​