मंदिरांच्या भूमी बळकावणार्‍यांना ‘गुंडा कायद्यां’तर्गत बेड्या ठोका ! – मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश

 ज्यांनी राज्यातील मंदिरांच्या भूमी बळकावल्या आहेत आणि निर्धारित वेळेच्या आत ते त्या भूमी मंदिरांना परत देण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यांना ‘गुंडा कायद्या’च्या अंतर्गत बेड्या ठोका, असा स्पष्ट आदेश मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू राज्याच्या ‘हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागा’ला (‘हिंदु रिलिजियस अँड चॅरिटेबल एन्डोमेंट्स डिपार्टमेंट’ला) दिला. Read more »

हिंदु राष्ट्राची मागणी करणे म्हणजे २ धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे नव्हे !

कोणत्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये हिंदु राष्ट्राची मागणी करणे, याचा अर्थ २ धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे, असे होत नाही. मी अत्यंत दायित्वतेने बोलत आहे की, जर न्यायालयाला वाटते की, ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करणे म्हणजे भारतीय दंड विधानाच्या कलम १५३ अंतर्गत गुन्हा आहे, तर मी आरोपीच्या जामिनासाठी याचिका प्रविष्ट करणार नाही Read more »

जेव्हा गायीचे कल्याण होईल, तेव्हाच देशाचे कल्याण होईल ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

गाय ही भारतीय संस्कृतीतील अविभाज्य घटक आहे. त्यामुळे गायीला ‘राष्ट्रीय प्राणी’ म्हणून घोषित केले पाहिजे. गायीला मूलभूत हक्क देण्यासाठी आणि राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यासाठी सरकारने संसदेत विधेयक आणावे. गायीला हानी पोचवणार्‍यांना शिक्षा करण्यासाठी कडक कायदे करावेत. जेव्हा गायीचे कल्याण होईल, तेव्हा देशाचे कल्याण होईल, असे मत अलाहाबाद उच्च न्यायालयाने मांडले आहे. Read more »

कोरोना प्रतिबंधक लसी फेकून दिल्याचे प्रकरण आणि त्यावरील अलाहाबाद उच्च न्यायालयाचा गंभीर दृष्टीकोन !

‘उत्तरप्रदेशमध्ये अलीगडच्या जमालपूर भागातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करणार्‍या नेहा खान या परिचारिकेने २९ कोरोना प्रतिबंधक लसी कचर्‍यात फेकून दिल्या होत्या. या प्रकरणी तिच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम १७६, ४६५, ४२७ आणि १२० (ब) या कलमांच्या अंतर्गत, तसेच ‘प्रिव्हेंशन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ॲक्ट’ आणि कोरोना नियंत्रणासाठी बनवलेला ‘पॅनेडेमिक ॲक्ट’ या आपत्कालीन कायद्यातील कलम ३ अन् ४ यांचे उल्लंघन झाल्याविषयी गुन्हे नोंदवण्यात आले. Read more »

ज्ञानवापी मशिदीमध्ये पूजा करण्याची अनुमती मिळावी ! – ५ महिलांकडून दिवाणी न्यायालयात याचिका

वाराणसी येथील काशी विश्‍वनाथ मंदिरासमोरील ज्ञानवापी मशिदीमध्ये श्री श्रृंगार गौरीदेवी, श्री गणेश आणि श्री हनुमान यांच्या मूर्ती ठेवून पूजा करण्याची अनुमती मिळावी, अशी मागणी येथील ५ महिलांनी दिवाणी न्यायालयामध्ये केली आहे. Read more »

अविवाहित तरुणींनी केवळ मजा मारण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्यापर्यंत भारतीय समाज पोचलेला नाही ! – मध्यप्रदेश उच्च न्यायालय

 भारत हा पुराणमतवादी समाज आहे. भारत अजून सामाजिक विचारसरणीमध्ये त्या स्तरावर पोचला नाही जिथे कोणत्याही धर्माची अविवाहित तरुणी केवळ मजा म्हणून तरुणांसमवेत शारीरिक संबंध ठेवेल. विवाहाचे किंवा भविष्यासंदर्भात काही आश्‍वासन दिले असेल, तर अशा गोष्टी घडू शकतात, असे मत भोपाळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुबोध अभ्यंकर यांनी एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी व्यक्त केले.  Read more »

नन आणि पाद्री यांच्या वेतनातून कर घेतला गेला पाहिजे ! – केरळ उच्च न्यायालयाचा आदेश

केरळ उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना, ‘राज्यघटनेच्या कलम २५ नुसार धर्माच्या आधारे कुणालाही कर सवलत दिली जाऊ शकत नाही. हे कलम धर्मस्वातंत्र्याचे हनन करत नाही. नन आणि पाद्री यांच्या वेतनातून टी.डी.एस्. (कर) कापणे आवश्यक आहे. आयकर अधिनियमाच्या अंतर्गत वेतन मिळत असेल, तर टी.डी.एस्. कापले गेलेच पाहिजे’, असे स्पष्ट केले. Read more »

‘सनबर्न’च्या आयोजकांनी वागातोर येथील ‘सनबर्न बीच क्लब’शी असलेला करार रहित केला

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने गत आठवड्यात ‘किनारपट्टी नियमन क्षेत्रा’चे (‘सी.आर्.झेड्.’- ‘कोस्टल रेग्युलेटरी झोन’चे) उल्लंघन करून वागातोर येथे ‘नो डेव्हलपमेंट झोन’मध्ये (बांधकाम करता न येणारा विभाग) बांधण्यात आलेला ‘सनबर्न बीच क्लब’ पाडण्याचा आदेश दिला आहे. Read more »

गणपति मंदिरावर आक्रमण करणार्‍यांना तात्काळ अटक करा आणि मंदिराची दुरुस्ती करा ! – पाकच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

गणपति मंदिरावरील आक्रमण करण्यासाठी ज्यांनी जमावाला भडकावण्याचे काम केले आणि ज्यांनी मंदिरावर आक्रमण केले त्यांना तात्काळ अटक करा. तसेच मंदिराची दुरुस्ती करा, असा आदेश पाकमधील सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे. Read more »

केवळ विवाहासाठी धर्मांतर करणे अयोग्यच ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

अकबर आणि जोधाबाई यांनी धर्मांतर न करता विवाह केला. त्यांनी एकमेकांचा सन्मान केला आणि धार्मिक भावनांचा आदरही केला. दोघांच्या नात्यात कधीही धर्म आड आला नाही. धर्म आस्थेचा विषय आहे आणि तो आपली जीवनशैली दर्शवतो. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​