श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यावर निर्बंध, ही हिंदूंची गळचेपी ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

प्रशासनाने अनेक जिल्ह्यांत श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी आवाहन केले आहे. यासह काही ठिकाणी वहात्या पाण्यात विसर्जन करण्यावर निर्बंध आणले आहेत, तसेच कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचे किंवा मूर्तीदान करण्याचे आवाहन केले आहे. केवळ वहात्या पाण्याच्या ठिकाणी गर्दी होते आणि कृत्रिम हौद आणि मूर्तीदान संकलन केंद्र यांठिकाणी गर्दी होत नाही, असे प्रशासनाला म्हणायचे आहे का ? Read more »

कोरोना प्रतिबंधक लसी फेकून दिल्याचे प्रकरण आणि त्यावरील अलाहाबाद उच्च न्यायालयाचा गंभीर दृष्टीकोन !

‘उत्तरप्रदेशमध्ये अलीगडच्या जमालपूर भागातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करणार्‍या नेहा खान या परिचारिकेने २९ कोरोना प्रतिबंधक लसी कचर्‍यात फेकून दिल्या होत्या. या प्रकरणी तिच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम १७६, ४६५, ४२७ आणि १२० (ब) या कलमांच्या अंतर्गत, तसेच ‘प्रिव्हेंशन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ॲक्ट’ आणि कोरोना नियंत्रणासाठी बनवलेला ‘पॅनेडेमिक ॲक्ट’ या आपत्कालीन कायद्यातील कलम ३ अन् ४ यांचे उल्लंघन झाल्याविषयी गुन्हे नोंदवण्यात आले. Read more »

गंगानदीच्या पाण्यामध्ये ‘कोरोना’चा विषाणू जिवंत राहू शकत नाही ! – संशोधकांचा निष्कर्ष

गोरखपूर येथील बी.आर्.डी. मेडिकल कॉलेजकडून करण्यात आलेल्या संशोधनानुसार कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये उत्तराखंडमधील हृषिकेशपासून ते उत्तरप्रदेशातील वाराणसीपर्यंत गंगानदीमध्ये कोरोनाचे विषाणू सापडले नाहीत. याच काळात लक्ष्मणपुरी येथील नाल्यांमध्ये कोरोनाचे विषाणू सापडले होते. Read more »

वेल्लोर (तमिळनाडू) येथे लसीकरण शिबिरासाठी आलेल्या पथकातील महिला ख्रिस्ती डॉक्टरकडून मंदिरात चपला घालून प्रवेश !

वेल्लोर येथील पोगोई गावामधील मुथलम्मन मंदिर परिसरात कोरोना लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यासाठी आलेल्या वैद्यकीय पथकातील ख्रिस्ती महिला डॉक्टर रेजिना यांनी ग्रामस्थांनी सांगनूही मंदिरात जातांना चपला काढल्या नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी लसीकरणासाठी आलेल्या पथकाचा विरोध करत लस घेण्यास नकार दिला. Read more »

कोलकाता येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीला २ तोळ्यांचा सोन्याचा ‘मास्क’ !

कोलकाता शहरामध्ये श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या तोंडाला २ तोळ्यांचा सोन्याचा ‘मास्क’ लावण्यात आला आहे. तसेच मूर्तीच्या हातांमध्ये निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करण्यासाठी लागणार्‍या वस्तू दाखवण्यात आल्या आहेत. मूर्तीच्या हातामध्ये मास्क, थर्मल गन (शरिराचे तापमान मोजण्याचे यंत्र), तसेच अन्य गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. Read more »

शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन !

कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचा जन्म १२ जानेवारी १९४० या दिवशी झाला होता. त्यांची श्री गजानन महाराज संस्थानच्या विश्वस्तपदी ३१ ऑगस्ट १९६२ नियुक्ती झाली होती. ते वर्ष १९६९ ते वर्ष १९९० पर्यंत ते संस्थानच्या अध्यक्षपदी होते. Read more »

चित्रपटांसाठी २४ घंटे चालणार्‍या वाहिन्या असू शकतात, मग शिक्षणासाठी का असू नये ? – मुंबई उच्च न्यायालय

कोरोनाच्या काळात अपंग आणि विशेष मुलांसह ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी स्वतंत्र शिक्षण वाहिनी का चालू नाही ? हे सरकारच्या का लक्षात येत नाही ? न्यायालयाला का सांगावे लागते ? Read more »

कोरोना रुग्णांसाठी गुणकारी ठरलेल्या अश्‍वगंधा औषधावर ब्रिटनमध्ये संशोधन !

भारतात अभ्यासाअंती ‘कोरोना झालेल्या रुग्णांना अश्‍वगंधापासून बनवण्यात आलेल्या आयुर्वेदाच्या औषधांचा चांगला लाभ झाला आहे’, हे सिद्ध झाले आहे. भारतातील या यशानंतर या औषधावर आता प्रथमच भारताबाहेर संशोधन होणार आहे. यासाठी भारत आणि ब्रिटन यांच्यात एक करार झाला आहे. Read more »

(म्हणे) ‘ओणम् सणाच्या वेळी गर्दी करू नका !’

ओणम् सणाच्या वेळी गर्दी करू नका, कार्यक्रमांचे आयोजन करू नका. शक्य होत असेल, तर नातेवाइकांना भेटणे टाळा, विशेषतः लहान मुलांना भेटणे टाळा, असा फुकाचा सल्ला केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी राज्यातील हिंदूंना कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर दिला आहे. Read more »

‘तुष्टीकरणा’चा संसर्ग !

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यात देशाला यश आले होते, तिथे केरळचे साम्यवादी सरकार मात्र या सर्वावर पाणी फिरवण्याचा प्रयत्न करत असल्याची चिन्हे आहेत. भारत कोरोना महामारीच्या तिसर्‍या लाटेच्या उंबरठ्यावर असतांना केरळच्या पिनराई विजयन् सरकारने ‘बकरी ईद’च्या निमित्ताने १८ ते २० जुलै या कालावधीत राज्यातील मुसलमान जनतेसाठी दळणवळण बंदीचे अनेक नियम शिथिल केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​