देहली दंगलीतील आरोपी शाहरुख पठाण याला ‘पॅरोल’वर सोडल्यावर मुसलमानांकडून त्याचे भव्य स्वागत

नवी देहली येथे वर्ष २०२० मध्ये झालेल्या दंगलीच्या वेळी पोलिसांवर बंदुक रोखणार्‍या शाहरुख पठाण याला कारागृहातून पॅरोलवर सोडण्यात आल्यानंतर त्याच्या घराजवळ मुसलमानांनी एखाद्या विजेत्यासारखे त्याचे भव्य स्वागत केले. Read more »

इस्लाम स्वीकार किंवा २ कोटी रुपये भर, नाहीतर शिरच्छेद करू !

हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेल्या बलविंदर या शीख तरुणाला न्यायालयाने इस्लाम स्वीकारण्याचा किंवा २ कोटी रुपये भरण्याचा आदेश दिला आहे. जर या दोन्ही गोष्टींपैकी कोणतीही एक गोष्ट केली नाही, तर ४ दिवसांत शिरच्छेद करण्यात येईल, असा आदेश दिला गेला. Read more »

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यांना २१ मार्चपर्यंत कारागृहात ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी.एम्.एल्.ए. (धनशोध निवारण अधिनियम) न्यायालयाने दिले आहेत. Read more »

हिंडलगा (बेळगाव) कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा हटवल्याने संताप : हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जाब विचारून पुन्हा नवी प्रतिमा लावली !

 हिंडलगा येथील कारागृहातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा कारागृह प्रशासनाने अचानक कोणतेही कारण न देता काढून टाकली. ही गोष्ट हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींना समजल्यावर त्यांनी कारागृह प्रशासनाला जाब विचारला आणि ठाम भूमिका घेत त्याच ठिकाणी दुसरी प्रतिमा लावण्यास भाग पाडले. Read more »

पाकमध्ये ईशनिंदेच्या प्रकरणी ८ वर्षांच्या हिंदु मुलाला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता !

पाकमध्ये एका मदरशाच्या पुस्तकालयामध्ये लघवी केल्याच्या कथित आरोपावरून अटक करण्यात आलेल्या ८ वर्षांच्या हिंदु मुलाला ईशनिंदा कायद्याद्वारे फाशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ईशनिंदेच्या आरोपाखाली पाकच्या न्यायालयात विविध व्यक्तींवर खटले चालू असून या प्रकरणातील आरोपी असणारा सदर हिंदु मुलगा देशातील सर्वांत लहान वयाचा आरोपी ठरला आहे. Read more »

ऑस्ट्रेलिया भारताच्या १४ मौल्यवान आणि प्राचीन कलाकृती परत करणार !

ऑस्ट्रेलिया त्याच्या राष्ट्रीय कला संग्रहालयात असलेल्या भारताच्या १४ मौल्यवान प्राचीन कलाकृती भारताला परत करणार आहे. या वस्तूत मूर्ती, चित्रे, छायाचित्रे आदींचा समावेश असून यांतील अनेक कलाकृती १२ व्या शतकातील आहेत. त्याची किंमत १६ कोटी रुपये असल्याचे समजते. Read more »

(म्हणे) ‘खोट्या आरोपाखाली मानवाधिकार कार्यकर्त्यांना कारागृहात टाकणे स्वीकारार्ह नाही !’

शहरी नक्षलवादी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात अटकेत असलेले ८४ वर्षीय फादर स्टेन स्वामी यांचे कारागृहात निधन झाले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार परिषद आणि युरोपीयन संघ यांनी दु:ख व्यक्त करत थयथयाट केला आहे. Read more »

फादर स्टेन स्वामी यांच्या निधनावर शोक व्यक्त करणारे इतर कैद्यांच्या स्वास्थ्याकडे लक्ष कधी देणार ? – हिंदु विधीज्ञ परिषद

त्यांच्या निधनानंतर राजकारण होत असेल, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. खरे तर यातून कारागृहातील अन्य कैद्यांच्या स्वास्थ्याचा मुद्दा ऐरणीवर येतो. फादर स्टेन स्वामी यांच्याप्रमाणे अन्य किती कैद्यांच्या प्रश्‍नाकडे हे तथाकथित पुरोगामी, सेक्युलर आणि नेतेमंडळी किती लक्ष देतात ? Read more »

इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी झालेल्या आणि आता अफगाणिस्तानच्या कारागृहात असलेल्या केरळच्या ४ महिलांना भारत परत आणणार नाही !

अफगाणिस्तानमध्ये जाऊन इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेत सहभागी झालेल्या ४ भारतीय महिलांना भारतात परतण्याची अनुमती दिली जाणार नाही. ही माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे. एका इंग्रजी दैनिकाने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या महिला सध्या अफगाणिस्तानमधील कारागृहामध्ये आहेत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​