हडपसर (पुणे) येथे रिक्शामधून गोवंशियांच्या मांसाची वाहतूक, एकाच वेळेस २ ठिकाणी कारवाई !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांनाही अधून मधून मोठ्या प्रमाणात गोवंशियांचे मांस मिळणे, हे संतापजनक आणि प्रशासनासाठी गंभीर आहे. Read more »

मदर तेरेसा यांच्या संस्थेच्या परदेशी देणगी नियमन कायद्यानुसारच्या नोंदणीचे केंद्र सरकारकडून नूतनीकरण

परदेशी देणगी स्वीकारण्याविषयीचे संस्थेचे प्रमाणपत्र आता वर्ष २०२६ च्या अखेरपर्यंत वैध असणार आहे. या संस्थेची परदेशी देणगी नोंदणीचे नूतनीकरण करण्यास याआधी केंद्रीय गृहमंत्रालयाने नकार दिला होता. Read more »

वक्फ बोर्डाला असलेल्या अधिकारांप्रमाणे मठ, मंदिरे आणि आश्रमांना अधिकार नाहीत !

‘वक्फ कायदा १९९५’ या कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. ‘संसदेला वक्फ आणि वक्फची संपत्ती यांच्यासाठी ‘वक्फ कायदा १९९५’ बनवण्याचा अधिकार नाही, असा न्यायालयाने निर्णय द्यावा’, अशी या याचिकेद्वारे मागणी करण्यात आली आहे; कारण संसद न्यास (ट्रस्ट), न्यासाची संपत्ती आणि धार्मिक संस्था यांच्यासाठी कोणताही कायदा बनवू शकत नाही. Read more »

कर्नाटकातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणार ! – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची घोषणा

 कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्यातील सरकारीकरण झालेली सर्व मंदिरे मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे, अशी माहिती बोम्माई यांनी दिली. Read more »

(म्हणे) ‘कुणीही तलवारीच्या जोरावर कुणाचे धर्मांतर करत नाही, तर चांगल्या कामांकडे पाहून लोक धर्मांतर करतात !’ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचे विधान

 जे कुणी लोकांचे धर्मांतर करत आहेत ते तलवार वापरून, भीती दाखवून धर्मांतर करत नाहीत. एखाद्याचे चांगले काम आणि त्या धर्मातील व्यक्तींचे चारित्र्य इतरांना धर्मांतरित करण्यास प्रभावित करते. भेदभाव न करता मानवतेची सेवा करण्यास मिळावी, यासाठी एखाद्या विशिष्ट धर्मात लोक धर्मांतर करतात, असे फुकाचे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद Read more »

आसाममध्ये गोतस्करांची संपत्ती जप्त करणारे विधेयक संमत !

 आसामच्या भाजप सरकारने प्राण्यांविषयीच्या एका कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक संमत केले आहे. या विधेयकामुळे आता गोतस्कराच्या घरात प्रवेश करून शोध घेण्यासह गेल्या ६ वर्षांत त्याने अवैध पशू व्यापारातून मिळवलेली संपत्ती जप्त करण्याचाही अधिकार पोलिसांना देण्यात आला आहे. Read more »

कर्नाटक विधानसभेत धर्मांतरविरोधी विधेयक संमत !

राज्यातील भाजप सरकारने विधानसभेमध्ये धर्मांतरविरोधी विधेयक बहुमताने संमत केले. ‘हे विधेयक ‘लोकविरोधी’, ‘अमानवी’, ‘घटनाविरोधी’, ‘गरीबविरोधी’ आणि ‘कठोर’ आहे’, असे सांगत काँग्रेसने त्याला जोरदार विरोध करण्याचा प्रयत्न करत गोंधळ घातला; मात्र काँग्रेस हे विधेयक रोखण्यास अयशस्वी ठरली. Read more »

बडवानी (मध्यप्रदेश) येथे आदिवासी महिलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या ख्रिस्ती दांपत्याला अटक

बडवानी (मध्यप्रदेश) येथे विनामूल्य शिक्षण, औषधे आदींचे आमीष दाखवून आदिवासी महिलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या एका ख्रिस्ती दांपत्याला अटक करण्यात आली आहे. अनार सिंह जमरे (वय ३५ वर्षे) आणि त्याची पत्नी लक्ष्मी जमरे अशी या दांपत्याची नावे आहेत. Read more »

भारतात ईशनिंदा कायदा करावा ! – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची मागणी

देशात ईशनिंदा कायदा करण्यात यावा. या कायद्यानुसार प्रेषित महंमद पैगंबर, तसेच इस्लाम धर्माच्या पवित्र गोष्टींचा अनादर करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय परिषदेत केली. याखेरीज ‘समान नागरी कायदा हा भारतासारख्या धार्मिक वैविध्य असलेल्या देशात योग्य आणि उपयोगी नाही. Read more »

(म्हणे) ‘धर्मांतरविरोधी कायद्यामुळे कर्नाटकात अराजकता निर्माण होईल ! – आर्चबिशप रेवरेंड पीटर मचाडो

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करण्याची घोषणा नुकतीच केली होती. यास बेंगळुरूचे आर्चबिशप रेवरेंड पीटर मचाडो यांनी विरोध करून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​