(म्हणे) ‘ॐ’ म्हटल्याने योग सामर्थ्यशाली होणार नाही !’ – काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी

‘ॐ’ म्हटल्याने ना योग सामर्थ्यशाली होईल आणि अल्लाचे नाव घेतल्याने ना योगाची शक्ती न्यून होईल’, असे ट्वीट काँग्रेसचे नेते आणि अधिवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांनी केले आहे. Read more »

आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांनी भाजपचा विरोध करण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याचा दिला होता प्रस्ताव !

श्रीराममंदिरासाठी २० कोटी रुपयांच्या भूमी खरेदीच्या प्रकरणावरून भाजप आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांचा विरोध करण्यासाठी आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्याकडून १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव आला होता, असा दावा येथील तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास यांनी केला आहे. Read more »

उत्तरप्रदेश पोलिसांचा ‘ट्विटर’, काँग्रेसचे नेते, पत्रकार आदी ९ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद

गाझियाबाद येथील पोलिसांनी लोणी बॉर्डरवर अब्दुल समद या वृद्ध  मुसलमान व्यक्तीला झालेल्या मारहाणीच्या आणि बलपूर्वक दाढी कापण्याच्या प्रकरणाला धार्मिक रंग दिल्यावरून ‘ट्विटर’सह ९ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. यात पत्रकार महंमद झुबैर आणि राणा आयुब यांनी याविषयी ट्वीट केल्याने त्यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Read more »

अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येविषयी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने सत्य लपवून का ठेवले आहे ? – सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस

अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर सचिन सावंत यांनी या प्रकरणाच्या अन्वेषणाविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहेत. Read more »

शत्रूराष्ट्राच्या पत्रकारासमोर काश्मिरी हिंदूंना अपमानित केले गेले !

शत्रूराष्ट्राच्या पत्रकारासमोर काश्मिरी हिंदूंना अपमानित केले गेले, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या भावजय रूबीना शर्मा यांनी सिंह यांच्या कलम ३७० वर पुनर्विचार करण्याविषयीच्या विधानावर संताप व्यक्त केला. रूबीना यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सिंह यांच्यावर टीका केली. रूबीना शर्मा या दिग्विजय सिंह यांचे धाकटे बंधू लक्ष्मण सिंह यांच्या पत्नी आहेत. Read more »

हिंदु धर्मादाय विभागाकडून हिंदूंव्यतिरिक्त अन्य धार्मिक स्थळांना आर्थिक साहाय्य देणे बंद ! – कर्नाटक शासनाचा आदेश

हिंदु धार्मिक संस्था, तसेच धर्मादाय विभाग यांच्याकडून गेल्या ३-४ दशकांपासून हिंदु धार्मिक संस्थांच्या व्यतिरिक्त अन्य धर्मियांच्या धार्मिक संस्थांना आर्थिक साहाय्य करण्यात येत असल्याचे उघड झाले होते. यास हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केला. त्यामुळे राज्यशासनाने अन्य धर्मियांना आर्थिक साहाय्य देणे बंद करण्याचा आदेश दिला आहे. याविषयीची माहिती धर्मादाय विभागाचे सचिव कोट श्रीनिवास पुजारी यांनी दिली. Read more »

पाकमधून विस्थापित होऊन आलेल्या हिंदु, शीख आदींचे लसीकरण न करणार्‍या राजस्थानमधील काँग्रेस सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले !

पाकमधून विस्थापित होऊन भारतात आलेल्या हिंदु, शीख आदी अल्पसंख्यांकांचे राजस्थान सरकारकडून लसीकरण होत नसल्याचे लक्षात आल्यावर राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपिठाने सरकारला यावरून फटकारले आहे. न्यायालयाने २८ मे या दिवशी लसीकरण करण्याचा आदेश देऊनही सरकारने त्याचे पालन का केले नाही ? याचे उत्तर न्यायालयाने सरकारकडे मागितले आहे. Read more »

जयपूर (राजस्थान) येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करून मुसलमान समाजसेवकाच्या अंत्यसंस्काराला १५ सहस्रांहून अधिक लोकांची उपस्थिती !

जयपूर  येथील समाजसेवक हाजी रफअत अली यांच्या अंत्यसंस्कारला सहस्रो लोकांनी सहभागी होऊन कोरोना नियमांचे उल्लंघन केले. या लोकांनी मास्क घातला नव्हता आणि सामाजिक अंतरही राखले नव्हते. पोलिसांनी या लोकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्यास धन्यता मानली. सत्ताधारी काँग्रेसचे २ नेतेही या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झाले होते. Read more »

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनी देश चालला असता, तर अमेरिकाही मागे पडली असती !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तीमत्त्व, विद्वत्ता, प्रतिभा इतकी उदात्त होती की, त्या वेळच्या कोणत्याही स्वदेशी नेत्यांच्या तुलनेत त्यांचे श्रेष्ठत्व प्रखर उठून दिसत होते. यामुळेच काँग्रेस आणि पाश्‍चिमात्य विचारांच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा मलीन करण्यात धन्यता मानली. आज स्वातंत्र्यवीर सावरकर असते आणि त्यांच्याकडे महत्त्वाचे पद असते, तर आज भारत निश्‍चितच अमेरिकेच्या पुढे असता, असा विश्‍वास भाग्यनगर येथील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापिठाचे कुलगुरु फिरोज अहमद बख्त यांनी व्यक्त केला. Read more »

दंतेवाडा (छत्तीसगड) येथील काँग्रेसच्या धर्मांध नेत्याकडून फेसबूकवर हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह पोस्ट

दंतेवाडा  येथील किरंदुल पोलीस ठाण्याच्या सीमेमध्ये काँग्रेसी नेता बबलू सिद्दकी याने सामाजिक माध्यमांतून हिंदूंच्या देवतांच्या विरोधात पोस्ट शेअर केल्याने त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सिद्दकी सध्या पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​