श्रीकृष्ण जयंतीनिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात ‘ऑनलाईन’ प्रवचने

२५ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील देहली, गुरुग्राम, नोएडा आणि फरिदाबाद येथे ‘ऑनलाईन’ प्रवचने अन् भगवान श्रीकृष्णाचा सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले होते. Read more »

‘बालसंस्कार’ संकेतस्थळावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त राबवण्यात आली ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा !

विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा इतिहास लक्षात यावा, तसेच त्यांनी केलेला पराक्रम अन् शौर्य समजावे, यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बालसंस्कार’ या संकेतस्थळावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा उपक्रम घेण्यात आला. ही प्रश्नमंजुषा मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये घेण्यात आली. यामध्ये राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्याविषयी ज्ञान वाढावे, यासाठी २५ प्रश्न देण्यात आले होते. Read more »

‘भारतीय कायदा व्यवस्था : परिवर्तनाची आवश्यकता’ या विषयावर विशेष संवाद !

अधिवक्ता अंकुर शर्मा पुढे म्हणाले की, आजही देशात समान नागरी कायदा नाही, गोहत्या करणार्‍याला देहदंड वा जन्मठेपेची शिक्षा नाही, लोकसंख्या नियंत्रण, तसेच आतंकवादी विरोधी कठोर कायद्याला जोरदार विरोध केला जातो. अनेक कायदे असे आहेत की, ज्यात देशहित नाही, तरी ते आपण बदलू शकत नाही. Read more »

समष्टी साधना शिकण्याचा प्रयत्न, हाच युवकांच्या वेळेचा खरा सदुपयोग ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आजची युवा पिढी दूरचित्रवाहिनी आणि भ्रमणभाष यांच्यामध्ये व्यस्त असतांना युवकांनी कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन समष्टी सेवा शिकण्याचा प्रयत्न करणे, हे कौतुकास्पद असून हाच वेळेचा खरा सदुपयोग आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. Read more »

येणार्‍या आपत्काळात साधना केल्यानेच तणावमुक्त जीवन जगता येऊ शकेल ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

जीवनातील तणाव हा बाह्य कारणांमुळे केवळ १० टक्के, तर आंतरिक कारणांमुळे ९० टक्के असतो. यावर केवळ साधनेद्वारे मात करता येऊन खर्‍या अर्थाने आनंदी जीवन जगता येऊ शकते. येणार्‍या आपत्काळात साधना केल्यानेच तणावमुक्त जीवन जगता येऊ शकेल, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांनी केले. Read more »

विशाळगडावरील अतिक्रमणे हटवून तेथे जिवाची बाजी लावणार्‍या मावळ्यांचे भव्य स्मारक उभारण्याची आवश्यकता ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदवी स्वराज्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर १ सहस्र ६७२ किलोमीटर लांब अशा ७ राज्यांत स्थापन केले होते. त्यात गडकिल्ल्यांची महत्त्वाची भूमिका होती; पण आज त्याच गडकिल्ल्यांची दुरवस्था झाली आहे आणि त्यावर अतिक्रमण झाले आहे. विशाळगडावर झालेली अतिक्रमणे हटवून तेथे जिवाची बाजी लावणारे नरवीर बाजीप्रभु देशपांडे, फुलाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशिद यांचे भव्य स्मारक उभारण्याची आवश्यकता आहे Read more »

विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते आदरयुक्त होण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आवश्यक ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

सद्य:स्थितीत उत्तम शिक्षक होण्यासाठी स्वतःचे आचरण चांगले असायला हवे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते आदरयुक्त होण्यासाठी नैतिक मूल्यांची आवश्यकता आहे. यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले Read more »

‘देवभूमी उत्तराखंडच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

उत्तराखंडमध्ये हिंदूंच्या भूमींवर सुनियोजितपणे अतिक्रमणे केली जात आहेत. मुसलमानांकडून अनेक ठिकाणी हिंदूंच्या आणि सरकारी भूमी अवैधरित्या ताब्यात घेतल्या जात आहेत. अशा प्रसंगी वेळीच पोलीस-प्रशासनाकडे तक्रारी करून हे थांबवता येईल. उत्तराखंडमधील हिंदूंच्या भूमीवरील सुनियोजित अतिक्रमणे, ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. Read more »

परात्पर गुरुदेवांचा आदर्श समोर ठेवून ईश्वरी कार्यात सहभागी व्हा ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त स्वरक्षण प्रशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. Read more »

गुरु आणि शिष्य यांनी धर्मावर आलेले संकट परतवून धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याची अनेक उदाहरणे ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गुरु आणि शिष्य यांनी धर्मावर आलेले संकट परतवून धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिंदु धर्माची महानता जगात प्रस्थापित करणारे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात रामकृष्ण परमहंस गुरु म्हणून आले आणि त्यांच्याकडून महान कार्य करवून घतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून समर्थ रामदासस्वामी यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​